निसर्ग

काळाच्या घड्याळाची टिकटिक पुढे अशीच चालू राहील…

कधि, काश्मीरचं कलम ३७०, कधि बालाकोटचा सर्जिकल-स्ट्राईक; तर, कधि अयोध्येचं राममंदिर…. या पोकळ भावनिक हिंदोळ्यांवर झुलत, असंच सर्वसामान्यांचं आयुष्य, गुलामगिरी व जगण्याच्या कोंडीत वाया जात राहील !!! या जगात अशी कुठलीही व्यक्ति असू शकत नाही, असत नाही… कुठलाही धर्मग्रंथ वा अन्य, कुठलीही बाबही अशी असूच शकत नाही; की, जी कळीकाळालाही पुरुन उरु शकेल. विश्वाची पोकळी, …

काळाच्या घड्याळाची टिकटिक पुढे अशीच चालू राहील… Read More »

उरलंसुरलं ‘आरे’ वाचवण्यासाठी आपापल्या पद्धतीने धडपडणारा प्रत्येकजण हा, निसर्ग-पर्यावरणीय महासंकटे टाळण्याच्या जगभरातल्या अखेरच्या ‘प्रयत्न-मालिके’तला एक शिलेदारच होय!

असे, लाखो-करोडो शिलेदार उभं रहाणं, ही काळाची आजची तातडीची गरज आहेच आणि तसं होताना हळूहळू जगभर दिसायला लागलयं, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब असली तरीही……… मुळात, असल्या सगळ्या “कार्बन-केंद्री” विनाशकारी विकासाला, GDP आधारित अर्थव्यवस्थेला, बेबंद शहरीकरण व औद्योगिकीकरणाला आता ‘पूर्णविराम’ दिला नाही… जनसंख्या-जीवनशैली कठोरपणे रोखली नाही, वहातूक व्यवस्था, घरबांधणी (सिमेंट-लोखंडाचा वापर टाळणे), शेतीव्यवस्था (रासायनिक व …

उरलंसुरलं ‘आरे’ वाचवण्यासाठी आपापल्या पद्धतीने धडपडणारा प्रत्येकजण हा, निसर्ग-पर्यावरणीय महासंकटे टाळण्याच्या जगभरातल्या अखेरच्या ‘प्रयत्न-मालिके’तला एक शिलेदारच होय! Read More »

वाढदिवसाचं वगैरे मला फारसं सोयरसुतक नसतं

वाढदिवसाचं वगैरे मला फारसं सोयरसुतक नसतं अजिबात… पण, खिशाला अजिबात परवडत नसलं; तरीही, हल्ली सगळ्याचाच उत्सव साजरा करणाऱ्या, उत्सवी मराठी मंडळींना त्याचं फार अप्रूप…. म्हणून, लोकाग्रहास्तव का होईना; त्यानिमित्ताने, निदान व्यक्तिगत संपर्काचा संसर्ग व्हावा, हा या संदेशामागचा उद्देश! “एक अकेली छत्री में जब आधे आधे भीग रहे थे आधे सूखे, आधे गिले, सुखा तो मैं …

वाढदिवसाचं वगैरे मला फारसं सोयरसुतक नसतं Read More »

२०५० पर्यंत “शून्य कार्बन-ऊत्सर्जना”ची टोकाची स्थिती गाठावीच लागेल…

खनिज तेल उत्पादनात जगात अग्रेसर असलेल्या ‘सौदी अरेबिया’ने, मार्गात अनेक अडथळे उभे केलेले असतानाही, संयुक्त राष्ट्रसंघाच्या “जलवायू परिवर्तनासंबंधी आंतरराष्ट्रीय-सरकारांतर्फे नेमलेल्या चमू”च्या  (IPCC… Intergovernmental Panel On Climate Change) अहवालावर बॉन (जर्मनी) पर्यावरणीय परिषदेत सखोल चर्चा… औद्योगिकीकरणानंतरच्या काळात, संभाव्य १.५° सेंटिग्रेड एवढ्या मोठ्या जागतिक-तापमानवाढीविषयक, अत्यंत गंभीर स्वरुपाच्या अहवालाची या ‘बॉन’ (जर्मनी) येथील पर्यावरण परिषदेत गांभीर्याने संपूर्ण आढावा …

२०५० पर्यंत “शून्य कार्बन-ऊत्सर्जना”ची टोकाची स्थिती गाठावीच लागेल… Read More »

जागो, सजग हो जाओ…. अभी नहीं, तो कभी नहीं !!!

नुकताच (४ मार्च-२०१९) प्रकाशित झालेला संयुक्त राष्ट्रसंघाचा (यूनो) सहावा ‘‘जागतिक पर्यावरणाचा आढावा’’ (6th Global Environment Outlook) हा, संपूर्ण जगताला अत्यंत गंभीर इशारा देऊ पहातोय! ‘‘शाश्वत स्वरुपाच्या विकासा’’चं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व त्याद्वारे, निसर्ग-पर्यावरण संवर्धन व संरक्षण करण्यासाठी पॅरिस करारात नमूद केलेल्या सर्व उपाययोजना कुठलीही हयगय न करता, युध्दपातळीवरुन अंमलात आणाव्या लागतील, असा हा अहवाल म्हणतोय. …

जागो, सजग हो जाओ…. अभी नहीं, तो कभी नहीं !!! Read More »

आजची ‘भिती’ उद्याचं ‘भविष्य’ ठरेल…

“जर, इंग्लंड नांवाचं छोट्याश्या बेटासारखं एकच राष्ट्र, आपल्या अनैसर्गिक-अशाश्वत स्वरुपाच्या औद्योगिक उत्पादनांमुळे आणि त्यांचा बेगुमान वापर करण्याच्या बेबंद जीवनशैलीमुळे…. मानवी-शोषणासह निसर्ग-पर्यावरणविषयक एवढ्या मोठ्या समस्या जगापुढे निर्माण करु शकत असेल…. तर, भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या खंडप्राय देशाने, तोच विनाशकारी ‘पाश्चात्य विकासाचा मार्ग’ निवडला तर काय अनर्थ ओढवेल, याची कल्पनाच केलेली बरी. इंग्लंड-युरोपच्या आर्थिक साम्राज्यवादाने आज, जगातल्या मानवीसमूहांना …

आजची ‘भिती’ उद्याचं ‘भविष्य’ ठरेल… Read More »

जागतिक हवामान बदलाचा एक दृष्य परिणाम

“जागतिक तापमानवाढ आणि त्यातून अटळपणे उद्भवलेल्या अनाकलनीय जागतिक हवामान बदलाचा एक दृष्य परिणाम” म्हणून, संपूर्ण पूर्व युरोपच्या अवकाशात ‘मंगळ ग्रहा’ सारखं ‘भगवे’मय वातावरण!!! रशियाच्या सोचि प्रदेशातील पर्वतशिखरांवर, जाॅर्जियातील अद्झारिया भागात आणि रुमानियाच्या(गलाटी) डान्यूब बंदरातील परिसरात, सध्या (मार्च २७-२०१८)  ‘भगव्या’ रंगाच्या बर्फाची चादर, सर्वत्र पसरलेली दिसतेयं! शेकडो मैलांचं अंतर कापून घडलेल्या, सहारा वाळवंटातील वालुकामय तप्त वारे …

जागतिक हवामान बदलाचा एक दृष्य परिणाम Read More »

इतिहास हा, कोळशासारखा असतो…..

“तप्त-गरम असताना तो हात भाजून काढतोच; पण, थंड असताना हातात धरला, तरी हात काळा केल्याखेरीज रहात नाही!” त्यामुळेच, तो “जो थांबला, तो संपला”…. या न्यायाने, “जो इतिहासात बुडाला, त्याचं भविष्य बुडालं!” इतिहास, हे केवळ डोळ्यात घातलं जावं असं ‘अंजन’ मात्र आहे…. त्यातून बोध जरुर घ्यायचा. पण, दिवसाचे चोवीस तास त्याचा ‘पाताळशोध’ नाही घ्यायचा की, त्याला …

इतिहास हा, कोळशासारखा असतो….. Read More »

टोकाची ‘आर्थिक-विषमता’ ही, केवळ सापाच्या ‘विषा’समानच नव्हे; तर, तो ‘काळसर्प’च आहे….

टोकाची आर्थिक-विषमता, हे भारतीय-समाजातील एक अत्यंत खळबळजनक, धोकादायक आणि प्रस्थापित ‘रक्तपिपासू-शोषक’ राजकीय-व्यवस्थेला अतिशय अडचणीचं ठरणारं उघडंनागडं ‘सत्य’ आहे! त्यामुळेच, ‘गरिबी-हटाव’चा ‘नारा’ सद्यस्थितीत महत्त्वाचा नसून ‘आर्थिक-विषमते’वर युद्धपातळीवरुन हल्लाबोल करणं, ही काळाची गरज आहे… तरीही, तारस्वरात ‘गरिबी-हटाव’चेच नारे देशात दिले जातायतं….. ‘धर्मराज्य पक्ष’ वगळता एकही राजकीय पक्ष, या मुद्द्यावर ना गांभीर्याने विचार करताना…. ना कुठली कृति करताना, …

टोकाची ‘आर्थिक-विषमता’ ही, केवळ सापाच्या ‘विषा’समानच नव्हे; तर, तो ‘काळसर्प’च आहे…. Read More »