संजय निरुपमा, तुझं थोबाडं आवर आणि तू आणि तुझ्या उत्तर भारतीय बांधव यांनी महाराष्ट्रातून खरचं चालतं व्हावं……

संजय निरुपमा,

मुंबई-महाराष्ट्र आमच्या जीवावर चालतो, या उद्दाम आणि फुकाच्या वल्गना तू आता एकदम बंद कर… तुझं थोबाडं आवर आणि तू आणि तुझ्या उत्तर भारतीय बांधव यांनी महाराष्ट्रातून खरचं चालतं व्हावं…… बघूया, त्यामुळे, मुुंबईसह  असलेला “शिवबा-संतां”चा महाराष्ट्र, तुझ्या भाकिताप्रमाणे कोसळतो की, तुम्ही युपी-बिहारवाले भीकेला लागता, ते एकदाचे समजेल !!!

सालं, आमच्या जीवावर जगायचं आणि आम्हालाच लाथा घालायच्या???

का, तर म्हणे, एका लहानग्या मुलीवरच्या बलात्कारानंतर गुजराथमधून उत्तर भारतीयांना जबरदस्तीने हाकलून लावलं जात आहे, म्हणून…. आणि, त्याचा ‘खुन्नस’ महाराष्ट्राला द्यायचा?… वा रे वा, भले पठ्ठे शाब्बास!

स्वतःच्या राज्यांना अतिशय अनुकूल नैसर्गिक परिस्थिती लाभली असतानाही स्वतःच्या राज्यांचा सर्वांगीण विकास करायचा नाही. फक्त दहशतीची, गुन्हेगारीची, लुटालुटीची आणि जातीपाती-धर्माची बोगस व घातकी राजकारणं करायची. बेफाम वाढत्या लोकसंख्येला (राष्ट्रीय लोकसंख्यावाढीच्या सरासरी दराच्या दुपटीहूनही वाढीचा वेग अधिक) आवरायचं नाही. एकेका जोडप्याला सहासात, आठदहा पोरं…. मग, मोठी झाली की, पोसवत नाहीत, म्हणून देशभर पाठवायची, नोकरीच्या भिका मागत सगळीकडे! तुमचा उत्तर भारत वगळता बव्हंशी भारत देशानं (विशेषतः, महाराष्ट्रासह दक्षिणेतील राज्ये), लोकसंख्येला केव्हाचाच आवर घातलाय…. पण, तुम्हा उत्तर भारतीयांचं काय? अहो, भारताचा जो सरासरी लोकसंख्यावाढीचा दर आहे, तोही तुमच्याच मुळे ‘चढा’ आहे!

गुजराथी लोकं स्वहितासाठी सदैव कमालीची जागरुक असतात. तिथली राजकारणी नेतेमंडळी कशीही असोत; पण, राष्ट्रीयस्तरावरील प्रश्नांसंदर्भात किमानपक्षी, आपल्या गुजराथी लोकांच्या हिताचा जाणिवपूर्वक प्रथम कसोशीने विचार करतात आणि त्याप्रमाणे कृति करतात…. मराठी नेत्यांसारखे, आपल्याच भोळ्याभाबड्या मराठी जनतेला हातोहात फसवून परप्रांतीयांना आपलं राज्य ‘आंदण’ नाही देत!

१९७० नंतर महाराष्ट्रात, ज्या पद्धतीचं ‘व्यक्तिकेंद्री’ आणि ‘भावनाकेंद्री’ राजकारण ऊतूमातू जाऊ लागलं, त्यामुळे महाराष्ट्रात ‘आदेश-संस्कृती’ फोफावली. कधि ‘मराठीत्व’ तर, कधि उत्तर भारतीय मतांसाठी ‘हिंदुत्व’, अशी आपल्या राजकीय सोयीप्रमाणे ‘कोलांटीउडी’ मारणारं, ढोंगी ‘मराठी-नेतृत्त्व’ महाराष्ट्रानं आपल्या हृदयसिंहासनावर बसवलं, म्हणूनच “संजय निरुपम”सारखे महाराष्ट्राचे गद्दार त्यांच्याच हातून मोठे झाले आणि महाराष्ट्रात हातपाय पसरते झाले!

मित्रहो, महाराष्ट्राची ‘मराठी-अस्मिता’ फक्त ‘बोलघेवडी’ आहे… चुलतसेनांच्या ढोंगी-दलालीच्या राजकारणाच्या जात्यात पुरती भरडून, घर्षण होऊन ती गुळमुळीत, मृतवत आणि मलिन झालेली आहे! तर, गुजरातची “गुजराथी-अस्मिता” अजूनही जागी आहे, अगदी टोकदार आहे. या ‘गुजराथी-अस्मिते’चं धगधगत उदाहरण म्हणून सांगतो… पंजाब-हरियाणाच्या अनेक शेतकरी शीख-हरयाणवी बंधूंनी गुजराथच्या कच्छसारख्या वाळवंटात नापीक जमिनी कवडीमोलाने विकत घेऊन, अखंड परिश्रम करुन फुलवल्या होत्या. पण, त्यानंतर गुजराथी पोलिस, प्रशासन, स्थानिक राजकारणी आणि गुंडपुंड यांनी संगनमताने, त्यांना स्वतःच्या कसत्या जमिनीतून पंजाबात दादागिरी करुन पिटाळून लावले (जसं, आज ते यूपी-बिहार मजुरांना पिटाळून लावतायत) आणि नरेंद्र मोदींच्या २०१४ च्या हरयाणा-पंजाबमधल्या प्रचार सभांमध्ये याचसंदर्भात, नरेंद्र मोदींना पंजाबी-हरयाणवी लोकं, “आमच्या जमिनी आम्हाला परत देणार की, नाही”, असा खड्या सुरात प्रश्न विचारायचे. त्या जमिनी त्यांना परत देण्याचं भले, २०१४ च्या निवडणूक प्रचार मोहिमेत मोदींनी आश्वासन दिलं असेल… पण, मला खात्री आहे की, १५ लाख प्रत्येकाच्या खात्यात भरण्याच्या खोट्या आश्वासनासारखीच त्याची गत झाली असेल.

क्रिकेटचे सामने आणि थोड्याफार प्रमाणात हिंदी सिनेमांचा ‘अपवाद’ वगळता, भारत कधिही एकसंध राष्ट्र नव्हता आणि कधिही नसेल! आता, भारतीयत्वाला मुरड घालून सर्वच राज्यांकडून (अगदी यूपी-बिहारसह) ‘स्थानिकत्व’ जपलं जाणं… ही काळाची गरज आहे, अन्यथा भारतभर नजिकच्या भविष्यात मोठा उद्रेक माजेल. शिवछत्रपतींनी स्वराज्य उभारणी करताना मांडलेला ‘स्थानिकत्वा’चा विजिगीषू विचार, हा केवळ खरा ‘राष्ट्रीय’ विचार आहे, असचं नव्हे; तर, निसर्ग-पर्यावरणाच्या संरक्षण-संवर्धनाच्या व शाश्वत-जीवनशैलीच्या संदर्भात “स्थानिकत्व, म्हणजे ‘वैश्विकत्व’च होय.!” एवढं त्याचं महात्म्य आहे…

भारतीय राज्यघटनेतल्या “आव जाव तुम्हारा घर”, अशा तरतुदींनी महाराष्ट्राचा घात झाला! महाराष्ट्रात चहुबाजूने परप्रांतीय आक्रमण झालं आणि महाराष्ट्रातल्या सामान्य मराठी-माणसाचा श्वास कोंडला गेला… जगण्याची कोंडी झाली!

म्हणूनच, महाराष्ट्रासह दक्षिणेतल्या सर्वच राज्यांनी “राष्ट्रांतर्गत राष्ट्र”, अशा “स्वायत्तते”चा आग्रह धरायलाच हवा…. तरच, उत्तर भारतीय आपल्या ऐतिहासिक चुकांचं सिंहावलोकन करुन सुधारतील आणि त्यातून अवघा भारत सुखासमाधानात नांदू शकेल !!!

तेव्हा, संजय निरुपमा, ….तुला “धर्मराज्य पक्षा”चं तुला आव्हान आणि आवाहन आहे की, तुला ज्यांचा पुळका आलाय, त्या तुझ्या सगळ्या उत्तरभारतीय बांधवांना, महाराष्ट्रातून तर परत तू घेऊन जाच… पण, जाता जाता ज्या गुजराथी भाषिकांवर तू आज एवढा संतप्त आहेस, त्यांनाही महाराष्ट्रातून घेऊन जा…. महाराष्ट्राचं काय करायचं, ते बघायला आम्ही समर्थ आहोत!”

 || जय महाराष्ट्र || जय हिंद ||

 …. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)