जनाची नाहीतर मनाची तरी, ठेवा हो….

एखाद्या देशाचा पंतप्रधान, किती उठसूठ खोटं बोलणारा व देशाची सतत किती दिशाभूल करणारा असावा, याला काही मर्यादा…???

तामीळनाडू भेटीत, ज्या ‘कचाथीवू’ (Katchatheevu) बेटावरुन मनमोहनसिंग सरकारवर पं. नरेंद्र मोदींनी टीकेचं एकच मोहोळ उठवलं (अर्थातच, लोकसभा-निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुद्दामहूनच), ते ‘कचाथीवू’ बेट, हे श्रीलंकेतील एक निर्जन बेट.
१९२१ पासून या निर्जन बेटावर ब्रिटीश-सिलोनचे (आताची श्रीलंका) नियंत्रण होते. भारत सरकारचं त्यावर कधिही कुठलंही नियंत्रण नसतानाही, हे अगदी छोटेखानी बेट (क्षेत्रफळ अवघे २८५ एकर) भारत आणि श्रीलंका यांच्यात १९७४ पर्यंत विवादीत राहिले व त्यानंतर, भारताने या निर्जन-बेटावरील श्रीलंकेचे सार्वभौमत्व मान्य केले!

आता मजा बघा…याच नरेंद्र मोदी सरकारने वर्ष-१९४७पासून विवादीत असलेला भारत-बांगलादेश सीमातंटा संपुष्टात आणण्यासाठी, ६ जून-२०१५ रोजी जमीन सरहद्द करार (Land Border Agreement…LBA) करुन तब्बल १०,००० एकर सुपीक जमीन (ज्यावर फार मोठ्याप्रमाणावर लोकं रहात होती; म्हणजे, ‘कचाथीवू’ बेटासारखी, ती जमीन ‘निर्जन’ बिलकूल नव्हती) अधिकची बांगला देशाला ‘दान’ दिली (आपण बांगला देशाला १७,१७०.६३ एकर जमीन दिली आणि त्याबदल्यात, बांगला देशाने आपल्याला फक्त ७,११०.०२ एकर एवढीच जमीन, या LBA करारान्वये दिली)…पण, नरेंद्र मोदी त्याविषयी ब्र काढत नाहीत!
…ही अश्लाघ्य स्वरुपाची बेईमानी तर आहेच; पण, अशा वाईट-घृणास्पद रितीने काँग्रेस-सरकारला नाहक बदनाम करण्याची मोहिम सुरुच ठेवणे, ही अतिशय शरमेची बाब असून, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिष्ठा खाली आणणारी आहे.
लक्षात घ्या, याअगोदरच, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अटक प्रकरणावरुन व लोकसभा-निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची बँक-खाती गोठवणे वगैरे बाबींवरुन जर्मनी, अमेरिका, संयुक्त-राष्ट्रसंघ (UNI) आणि ॲम्नेस्टी इंटरनॅशनल यांनी भारतावर कडक टीका केलेली आहे. तशीच टीका, महिला-पहेलवानांवरील दिल्लीत झालेल्या अत्याचारांवरुन आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीनेही केली होती.
शिवाय भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया या देशांनी मिळून बनलेल्या ‘सामरिक सुरक्षा संवादा’तून (QUAD OR Quadrilateral Security Dialogue) भारताची हकालपट्टी करण्यात आल्याचं (सरकारी दुजोरा न मिळालेलं) वृत्त आहे. मात्र जशी गलवान खोर्‍यातील भारताची जवळपास ४००० चौ.कि.मी. जमीन चीनने घशात घातल्याची बातमी, या बदमाष ‘गोदी-मिडीया’ने दाबून टाकली (त्याविरोधातच, लडाखचे ख्यातनाम सामाजिक-कार्यकर्ते ‘सोनम वांगचुक’ यांनी नुकतंच २१ दिवसांचं उपोषण केलं होतं व ते आता या घटनेच्या निषेधार्थ, लडाख ते चीनने बळकावलेल्या गलवान-खोर्‍यापर्यंत पायी चालत जाणार आहेत)…तशाच, या महत्त्वपूर्ण बातम्या, ‘गोदी-मिडीया’तून नेहमीप्रमाणेच गायब आहेत!

आपल्याच दळभद्री-कर्मदरिद्री वृत्तीमुळे, आपणच आपल्यावर गेली सलग दहा वर्षे लादून घेतलेलं, हे फार मोठ्या दुर्दैवाचं ओझं…निदान, २०२४च्या लोकसभा-निवडणुकीच्या मतपेटीतून तरी, आपण आपल्या मनगुटीवरुन उतरवून, दूर फेकून देतो की, नाही…ते, येणारा काळच ठरवेल, धन्यवाद!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)