दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्ली महापालिका निवडणुका पुढे ढकलल्याबद्दल भाजपावर हल्ला चढवला आणि खुलं आव्हान देताना, ‘‘भाजपा, स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणवतो; पण, त्यांना दिल्लीतील एका छोट्या पक्षाची भीती वाटते… भाजपाने वेळेवर या निवडणुका घेतल्या आणि त्या जिंकल्या तर, ‘आम आदमी पार्टी’ राजकारण सोडेल’’, असं अरविंद केजरीवाल यांनी दंड थोपटत म्हटलंय..
- अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले की, ‘‘महापालिकेची निवडणूक पुढे ढकलणे, हा इंग्रजांना देशातून हाकलून, देशात लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी बलिदान देणाऱ्या भगतसिंगांसारख्या हुतात्म्यांचा अवमान आहे… दिल्लीतील तिन्ही महानगरपालिका (North Delhi Municipal Corporation, South Delhi Municipal Corporation, East Delhi Municipal Corporation) एकत्र करायच्या आहेत; म्हणून, निवडणुका भाजपा पुढे ढकलायचं कारण देत आहे… फक्त, यासाठी निवडणुका पुढे ढकलता येतात का? उद्या ते गुजरातची निवडणूक हारणार असतील म्हणून, ते ‘गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र करणार आहेत’, अशी काहीबाही कारणं देऊन लोकसभा निवडणुका टाळू शकतील काय??’’, असाही धक्कादायक सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केल्याचं समजत…
- मित्रहो, महत्त्व अरविंदजींच्या शेवटच्या उद्गारांचं (ते, ‘‘गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र करणार आहेत’’…हेच ते विखारी उद्गार) आहे. ‘‘अरविंद केजरीवाल मारवाडी तर, नरेंद्र मोदी आणि अमित शहा, ही जोडगोळी गुजराथी’’!
- महाराष्ट्राच्या भ्रष्ट व घातकी ‘बोलबचन’ राजकारण्यांचा हात धरुन महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर हळूहळू महाराष्ट्राची जवळपास ७५% साधनसंपत्ती बळकावणार्या जैन-गुजराथ्यांच्या मनात, ‘स्वतंत्र महाराष्ट्र राज्या’चा सल आजही कायम आहे. अभावितपणे, तेच अरविंदजींच्या मुखातून सत्य स्वरुपात बाहेर पडलंय इतकंच…
- अरविंदजी काय किंवा मोदी-शहा आणि त्यांचे गुज्जू-मारवाडी बगलबच्चे काय, यांनी नीट ध्यानात ठेवावं की, तुमच्या मनातल्यासारखं ‘‘गुजराथचा वरचष्मा असलेलं महाराष्ट्र आणि गुजराथचं एकीकरण’’ होणं सोडाच, उलटपक्षी, आजचं ‘स्वतंत्र महाराष्ट्र राज्य’, नजिकच्या भविष्यात ‘संघराज्यवादा’च्या (federalism) शंभर नंबरी तत्त्वानुसार ‘‘राष्ट्रांतर्गत राष्ट्र… स्वायत्त-महाराष्ट्र राज्य’’ होणार आहे (धर्मराज्य पक्ष, हा महाराष्ट्रातील एकमात्र राजकीय पक्ष होय की, ज्याने, ‘‘संयुक्त महाराष्ट्रानंतर ‘स्वायत्त-महाराष्ट्र’… राष्ट्रांतर्गत राष्ट्र, स्वायत्त-महाराष्ट्र’’, हा महत्त्वपूर्ण धोरणमुद्दा, आपल्या स्थापनेपासून मुळातूनच लावून धरलेला आहे). भाजप केंद्र शासनाच्या लोकशाही पायदळी तुडवणार्या दंडेली व हडेलहप्पीवृत्तीमुळे काळाच्या दट्ट्यामुळे आजच त्याची सुस्पष्ट लक्षणं दिसू लागलीयत… महाराष्ट्रातील दुकानेच काय, शाळा आणि महाविद्यालये, विद्यापीठांच्या पाट्यासुद्धा ‘मराठी भाषे’तच हव्यात, असे एकापाठोपाठ एक राज्य सरकारी फतवे निघतायत, हे कशाचं निर्दशक आहे? अरविंदजी, हा शिवबा-संतांचा महाराष्ट्र आहे… गुज्जू-मारवाड्यांचा नव्हे!
- महाराष्ट्र नुसताचं शेतात, कारखान्यात घाम गाळत नाही; तर, भारताच्या सरहद्दीवर ‘मराठी रक्ता’चे सडेच्या सडे आजवर शिंपले गेलेत… जिथे, जैन, गुजराथी, मारवाडी रक्ताचा थेंबसुद्धा कधि सांडला गेला नसेल!
तेव्हा, अरविंदजी काय नी मोदी-शहा काय, तुम्हाला आम्ही सांगून ठेवतो… तुम्ही तुमचं काय ‘राजकारण’ करायचं असेलं ते करा; ते आम्ही पाहून घेऊच… पण, शिवछत्रपतींचा मराठी बाणा आणि कुसुमाग्रजांचं ‘मराठीपण’ आजही धमन्यांतून धगधगत असणाऱ्या महाराष्ट्राबद्दल, अशा अर्वाच्च तर्हेनं ‘ब्र’सुद्धा काढायची हिंमत करु नका!!!
|| जय महाराष्ट्र, जय हिंद ||
… राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष… ‘‘संयुक्त महाराष्ट्रानंतर ‘स्वायत्त-महाराष्ट्र’… राष्ट्रांतर्गत राष्ट्र, स्वायत्त-महाराष्ट्र’’)