काश्मीरची नव्हे आणि बदलापूरची तर नव्हेच नव्हे….तर, अगदी ताजी घटना आहे ही झारखंडची!

झारखंडची राजधानी रांचीच्या मोराबादी मैदानावर भाजपा युवा मोर्चातर्फे ‘आक्रोश-रॅली’ आयोजित करण्यात आली होती. त्यादरम्यान, झालेल्या हिंसाचारात भाजपा-युवा मोर्चावाल्यांनी अट्टल दंगेखोरांसारखी खुलेआम पोलिसांवर तूफान दगडफेक करत त्यापैकी अनेक पोलीसांना गंभीर जखमी केलंय…
बदलापुराच्या घटनेतील छुटपुट दगडफेकीचं निमित्त साधून समस्त बदलापूरकर-आंदोलकांना, मोठी पोलिसी-कार्यक्षमता दाखवत (जी एरव्ही, अंबरनाथ-बदलापुरच्या गुंड राजकारण्यांकडून दिवसाढवळ्या सर्रास गुन्हे घडत असताना पेंड खात असते), जेरबंद करणारे भाजपावाले यावर काही प्रतिक्रिया देणार का?
…एवढंच नशीब समजायचं की, त्या बदलापूरच्या शाळेत लहानग्यांवर लैंगिक-अत्याचार करणारा कुणी ‘मुस्लिम’ नव्हता आणि बदलापूर-स्टेशनमध्ये रेल-रोको करणारेही कुणी ‘मुस्लिम’ नव्हते…तसं काही दुर्दैवाने असतं; तर मग, सगळे गुजराथी ‘बँकबुडवे मोदी’ परदेशात पळाले, तसं त्या शाळा-संस्थाचालकाला पळून जाण्यास भाजप-सरकारने ‘छुपी मदत’ केली असती व महाराष्ट्राची विधानसभा-निवडणूक वेड्यावाकड्या पद्धतीने जिंकण्यासाठी महाराष्ट्रभरात दंगलप्रवण वातावरण ‘भाजपा आयटी-सेल’ व ‘अंधभक्तां’करवी निर्माण केलं असतं…आणि समजा, त्या दंगलीच्या भांडवलावर निवडणूक जिंकलीच असती; तर, जिंकल्यापश्चात “शाळेत CCTV न लावणाऱ्या व मुलींच्या सुरक्षिततेची अजिबात काळजी न घेणाऱ्या” त्या संस्थाचालक ‘नरपुंगवा’ला, निवडणूक जिंकण्यासाठी निमित्त बहाल केल्याबद्दल ‘बक्षिसी’ म्हणून, कुठलातरी शैक्षणिक क्षेत्रातला वगैरे ‘नरवीर’ बनवून ‘पद्मश्री’ बहाल केली असती (सध्या ‘राज्यसभा-सदस्यत्व’ किंवा ‘मानवाधिकार-आयोगा’चं अध्यक्षपद रिक्त नसल्याने केवळ, ‘पद्मश्री’वरच भागवावं लागलं असतं)!

…राजन राजे

https://youtu.be/5XyGb-Fznew?si=qAFvI3V6KvDHLOwN