गंगा-यमुना संगमी हजारो कोटींच्या ‘कुंभमेळ्या’चं (खरंतरं, ‘दंभमेळ्या’चं) आयोजन करणारे, हे कसले ‘हिंदुत्ववादी’…हे फक्त, कसलेले ‘सत्तावादी व भांडवलवादी’!
कुंभमेळ्याचं आयोजन…हे केवळ, कुंभस्थळी अव्यवस्थेमुळे चेंगराचेंगरीत मरणाऱ्या शेकडो भाविकांच्या सरणावरच नव्हे; तर, जाज्वल्य साधुसंतांच्या बलिदानाच्या पापांच्या राशीवर कसं घडतं गेलंय…ते तपासून पहाणं, भारतीय-अध्यात्माचा सच्चा पाईक असलेल्या, प्रत्येक खऱ्याखुऱ्या ‘धार्मिक’ (दांभिक नव्हे) हिंदुचं ‘धर्मकर्तव्य’च होय!
गंगामातेच्या शुद्धीकरणासाठी व तिचं अस्तित्व टिकवण्यासाठी स्वामी आत्मबोधानंद, स्वामी गोपालदास, आयआयटीतील प्राध्यापक प्रो. जी. डी. अग्रवाल ऊर्फ स्वामी ज्ञानस्वरुप सानंद, बाबा नागनाथ योगेश्वर आदि पूजनीय संतमंडळींनी आजवर ‘महाबलिदान’ केलयं; तरीही, “गंगा मैली” होतेच आहे…. ही संतमंडळी नेमकी कोण होती? खचितच ती, यमुनातिरीचा जैववैविध्यपूर्ण निसर्ग उध्वस्त करणाऱ्या श्री श्री रविशंकरांसारखी वा सर्वोच्च न्यायालयापुढे आपलं नाक रगडावं लागलेल्या ‘पातंजली-उद्योगपती’ रामदेव स्वामींसारखी, व्यवस्थेच्या पालखीचे भोई असणारी ‘सरकारी-संतमंडळी’ नव्हती (त्यामुळेच, या महाबलिदानाकडे ‘गोदी-मिडीया’च्या प्रसिद्धीचा झोत, कसा काय वळेल?)!
….ती होती, भारतीय आध्यात्मिक-परंपरेशी नातं सांगणारी खरीखुरी जातिवंत संतमंडळी. जशी, आपण हल्ली सर्वत्र पसरलेली पहातो (विशेषतः, महाराष्ट्रात), तशी ती ‘वारसाहक्का’ने आपल्याच घराण्यात धर्मसंप्रदायाची ‘परंपरा’ चालवणारी “आध्यात्मिक-उद्योगपती” मंडळी नव्हतीच!
अयोध्येपासून हाकेच्या अंतरावर गंगातिरी, संतशिरोमणी असलेले हे पुण्यात्मे…गंगामातेसाठी प्राणार्पण करत असताना; आज ‘कुंभ’ नावाच्या ‘दंभमेळ्या’चं आयोजन करणारी, हीच तथाकथित हिंदुत्ववादी मंडळी, सरळ बेपर्वाईने हात बांधून बसली होती. साधुसंतांचे बलिदान व्यर्थ जाऊ देताना व वरुन त्यावर नक्राश्रू ढाळताना, आम्ही या ढोंगी लोकांना उघड्या डोळ्यांनी पाह्यलं.
…तेव्हा, ‘नाॅन बायाॅलाॅजिकल गंगापुत्र’, गंगा वाचवणं तर राहीलं बाजुलाच, उलट त्यांच्या ‘गांधीवादी’ आमरण उपोषणाकडे साफ दुर्लक्ष करुन त्यांना मरणाच्या दारात नेऊन सोडत होते… आणि, अंति घडतही तसंच गेलं! …वानगीदाखल सांगायचं तर, गंगेचं शुद्धीकरण तसेच, जागोजागी बांधलेल्या छोट्यामोठ्या धरणं-बंधाऱ्यांमुळे गंगेचा कुंठीत झालेला, आक्रसून गेलेला मुळचा धो धो वहाणारा नैसर्गिक-प्रवाह, पुन्हा खळाळता करत गंगामातेला अनैसर्गिक मानवी-बंधनातून मुक्त करु पहाणाऱ्या…स्वामी ज्ञानस्वरुप सानंद यांनी तब्बल १२२ दिवसांच्या आमरण-उपोषणाअंति ११ ऑक्टोबर-२०१८ रोजी प्राणत्याग केला! अत्यंत संतापजनक बाब ही की, गंगामातेच्या आरोग्यासाठी-पुनरुज्जीवनासाठी बलिदान देणाऱ्या स्वामी ज्ञानस्वरुप सानंदसारख्या ‘पुण्यात्म्या’ला…हे तथाकथित नीच हिंदुत्ववादी लोक, अमेरिकेच्या CIA चा दलाल (एजंट) म्हणून यथेच्छ बदनाम करते झाले होते (जेव्हा, हे स्वतःच तसे ‘एजंट’ असल्याचं अलिकडेच अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रंप प्रशासनाने USAID प्रकरणी उघड केलंय)
…तेव्हा, हे कसले ‘हिंदुत्ववादी’? ते फक्त, पाशवी ‘सत्तावादी आणि भांडवलवादी’ आहेत, बस्स्! पैशातून सत्ता आणि सत्तेतून पुन्हा पैसा…शिवाय, हाती EVM चं आणि Pre-Poll व Post-Poll व्यवस्थापनाचं हुकमी तंत्र आहेच, सोबतीला…धन्यवाद!
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)
https://youtu.be/1Rzoj9kUuJk?si=aKvWg9d3fWBwJdCs