‘ट्रिपल-इंजिन’वाल्या सरकारच्या ‘त्रैभाषिक’ (ट्रिपल-लँग्वेज) धोरणानुसार पहिल्या इयत्तेपासून महाराष्ट्रात शिकवली जाणार; एवढ्यापुरतचं, सध्याच्या ‘बीजेपी’ने सडवलेल्या भारतीय राजकारणात ‘हिंदी’चं अप्रूप नव्हे…तर, ‘‘भारत-पाकमध्ये मीच मध्यस्थी केली’’, असं एकूण चौदा वेळा जाहीरपणे सांगून आपली चांगलीच ‘गोची’ करणाऱ्या डोनाल्ड ट्रंप यांना; त्यांना न कळणार्या ‘हिंदी’ भाषेतच, ‘‘कुणा त्रयस्थाची मध्यस्थी स्विकारणार नाही’’, असं मोदी सुनावतात…’’नरेंदर सरेंडर’’ या ‘‘आपल्यावरच्या कडव्या टिकेचा साप भी मरे और ट्रंप-दोस्ती की लाठी भी न टूटे’’, असा हा ‘विश्वामित्री पवित्रा’ म्हणायचा…है ना बात पते की!
…पण, गोलमाल ‘ऑपरेशन-सिंदूर’बाबत मात्र, हिंदी-गायपट्ट्यातल्या बिहारी प्रचारसभेत चक्क टेलिप्राॅम्टरवरच्या खणखणीत इंग्रजीतून जगाला मोदी थेट इशारा देतात…आपल्या गलिच्छ, हिणकस, देशविघातक स्वार्थी राजकारणासाठी ‘हिंदी, हिंदुत्व किंवा हिंदुराष्ट्रा’चा कसा कधि बेमालूम वापर करायचा, ते ‘बीजेपी’वालेच जाणो!
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)