अतिशय स्वागतार्ह तसेच, आनंदाश्चर्याची बाब ही की, आपल्या मुस्लिम समाजात आणखी एक, एपीजे अब्दुल कलामांच्याही शंभर पावले पुढे, असा अलौकिक प्रतिभेचा पदार्थविज्ञान-शास्त्रज्ञ तयार होत आहे…बिहार सीमेलगतच्या उत्तर प्रदेशातल्या देवरिया जिल्ह्यातील ‘सारिम खान’ हा, मोहसीन खान आणि झिन्नत खान, या मुस्लिम-दांपत्याचा ११ वर्षाचा अत्यंत तीक्ष्ण बुद्धीचा मुलगा, सध्या भल्याभल्यांना आपल्या बौद्धिक-आविष्काराने तोंडात बोटं घालायला लावतोय!
मुस्लिम समाज, मदरशांमधून नव्हे; तर, अशा बौद्धिक मशागतीतूनच पुन्हा प्रगतीपथावर येऊ शकेल आणि आपल्यातल्या अनिष्ट रुढीवादी धर्ममार्तंडांना-दुढ्ढाचार्यांना शह देऊन…जगभरातील झाकोळलेल्या मानवतेला नव्याने झळाळी प्राप्त करुन देऊ शकेल व जगभराला भेडसावणाऱ्या ‘जागतिक तापमानवाढी’सारख्या प्रलयंकारी पर्यावरणीय महासंकटांना, त्यातूनच सुटकेचा मार्ग सापडू शकेल!
आमच्या मुंबई-ठाण्यापासून खेडोपाड्यात पसरलेल्या मराठी मुलामुलींनो, तुम्ही मात्र हळदीच्या डीजेवर वेडेवाकडे नाचत, सार्वजनिक पूजा-गणेशोत्सवाचे मंडप सजवत, गल्लीबोळात वा शेताडात (शेतीत हात काळे करण्याचे कष्ट न घेता) क्रिकेटचे सामने खेळत किंवा गणपती-दहीहंडीचे ढोल बडवत…महाग होत चाललेल्या धनवंतांच्या शहरात, निव्वळ तगून रहाण्यासाठी, तुटपुंज्या पगारावर ‘कंत्राटी-कामगार पद्धती’च्या चिखलात, म्हशीसारखे आनंदाने आकंठ लोळत-डुंबत रहा….
…भाजप-संघवाल्यांच्या धर्मविद्वेषी विखारी प्रचाराला बळी पडून ‘पंक्चर-पंक्चर’ म्हणून मुस्लिम-तरुणाईला हिणवणार्यांनो, तसंही या बदमाष मराठी राजकारण्यांनी भांडवली-व्यवस्थेशी गुन्हेगारी संगनमत करुन तुम्हाला, वरील सर्वप्रकारच्या फाजील उत्सवी-नशेच्या बेफाम नादी लावून…तुमचं ‘गुलामी-भविष्य’ निश्चित करुन ठेवलेलं आहेच!
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)