Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##6

“डोक्यावर केसाने तलवार टांगलेलीच आहे…Danger is lurking!”

“हॅलो, मारो प्रिय मित्र ट्रंप…हू तो तारो गुलाम छू नै? मारी जग्याऐ पेलो ‘राहुल गांधी’ आवशे, तो तारु शुं हाल थसे?”…दिल्लीतून एक फोन वाॅशिंग्टनला (व्हाईट-हाऊस) जातो; आणि, तत्काळ, मूळ कराराच्या दस्तावेजात दडून ठेवलेल्या; ज्या बाबी, एकेक करत नंतर उलगडण्यात आल्या; त्या या एका फोननंतर लागलीच मागे घेण्यात आल्यात!

डाळी, काही शेतकी-उत्पादने, डिजिटल सर्व्हिस टॅक्स आणि मुख्य म्हणजे, पुढील पाच वर्षात ५०० अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन वस्तू वा उत्पादने भारताने सक्तिने आयात करण्याची मूळ अट शिथील करण्यात आल्याचं दिसतंय…पण, मलेरियाचे जंतू, जसे आपल्या यकृतात दबा धरुन बसलेले असतात; तशाच, या सगळ्या ट्रंपकृत अटीशर्ती, दबा धरलेल्या स्थितीत असून कुठल्याही कमजोर क्षणी, त्या पुन्हा कार्यान्वित होतीलच. भारतात केवळ अमेरिकन शेतमालावर आयात-करच जास्त होता, असं नव्हे; तर, अमेरिकेतील मका आणि सोयाबीन, ही पिके जनुकीय-परावर्तित (GM) असल्याने भारतात आयात करण्यास त्याला बंदी होती (भारतात जेव्हा, सोयाबीनचे दर अस्मानाला भिडले होते; तेव्हा, प्रासंगिक उपाययोजना म्हणून केवळ, त्याची आयात केली गेली; तेव्हा, सोयाबीनचे दर फटक्यात एकतृतीयांश खाली आले आणि सोयाबीन पिकवणार्‍या शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या)…तसेच, मोठ्या आयातकरासह मांसाहारी पदार्थ अन्नाद्वारे दिले ‘न’ जाणाऱ्या जनावरांचंच दूध विकण्याची भारतात परवानगी होती…अमेरिकेत दुधाळ जनावरांचं अधिक प्रोटिनयुक्त दूध मिळावं, म्हणून त्यांच्या चार्‍यात मोठ्याप्रमाणावर कृत्रिमरित्या प्रजनन केलेले विशिष्ट कीटक मारुन टाकले जातात.

अमेरिकेतून-न्यूझीलंडमधून सफरचंद येणार, इतर शेतमाल येणारच; बाकी दुग्धजन्य पदार्थ येणार (सध्यातरी, आम्ही द्रवरुप दूध आयात करणार नाही, असं ‘फेकू’ सरकार म्हणतंय), कारण, हे शेटजी-भटजींचं भाजप-संघीय सरकार, भांडवलदारांचं कायमच उघड उघड ‘बटीक’ होतं व आहे, त्यांचीच ‘दलाली’ करण्याचं, त्यांचं आजवरचं राजकीय ‘भांडवली-सूत्र’ आणि ‘भांडवली-चारित्र्य’ राहिलेलं आहे;याचा अर्थ, तो तेवढा आयात अमेरिकन-माल, भारतीय बाजारपेठेतील स्थानिक भारतीय-शेतकऱ्यांना तेवढ्या प्रमाणात उध्वस्त करत जाणार…जसे ‘ब्रिटीश तयार माला’ने गावोगावचे लाखो भारतीय यंत्रमाग बंद पडले व ब्रिटीश-वसाहतवादाचं भारतात यशस्वी रोपण झालं; तोचं काळा-इतिहास पुन्हा नव्याने लिहीला जाणार आहे. तेव्हाही, या भाजप-संघीयांचे पूर्वसुरी ब्रिटीश-सरकारची तळी उचलत होते; आता, अमेरिकन-सरकारची उचलतील!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष) (क्रमशः)