Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##7

“भारताच्या ‘सार्वभौमत्वा’चा नंतर ‘बळी’ जाईल…प्रथम, ‘स्वयंपूर्णते’चा जाईल!”
…लक्षात घ्या, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने हजारो एकरची शेती कसणार्‍या अमेरिकन शेतकऱ्यांवर एकूण कर्ज ६०० अब्ज डॉलर्सहून अधिक आहे; आणि म्हणूनच, राष्ट्रीय-सरासरीपेक्षा तेथील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण साडेतीन ते चार पट जास्त आहे. “आपला शेतमाल आता भारतात ‘निर्बंधमुक्त निर्यात’ होणार”, यामुळे तेथील शेतकरी ‘फासाचे दोर’ दूर सारुन शँपेनच्या पार्ट्या करु लागलेत…अमेरिकन शेतमालासोबतच, तिकडे आता बिनकामाचे झालेले ‘फासाचे दोर’, भारतात आयात होतील व भारतीय शेतकऱ्यांच्या बांधावर विसावतील!
“अमेरिका, हा फाईव्ह स्टार हाॅटेलमध्ये रहाणारा; पण, प्रत्यक्षात ‘भिकारी’ असलेला देश आहे”, असं एक नामवंत अर्थतज्ज्ञ काही वर्षांपूर्वी बोलून गेला होता किंवा ‘Democracy At Work’चे ‘रिचर्ड वोल्फ’ सातत्याने सांगत असतात की, “American Empire Is Dying!” कारण, आजच्या घडीला अमेरिकन राष्ट्रीय-कर्ज, हे ३९ ट्रिल्यन डाॅलर्स; म्हणजे, त्याच्या ‘GDP’पेक्षा (३१ ट्रिल्यन डाॅलर्स) कितीतरी जास्त आहे. आफ्रिकन देशांचा कर्जाच्या सापळ्यात अडकून श्वास गुदमरतो; पण, अमेरिकेचं तसं का होतं नसावं…याचं कारण, अमेरिकन डाॅलर, हे सध्याचं आंतरराष्ट्रीय-चलन असल्याने, निव्वळ अधिकच्या नोटा छापून (१९७०-७१मध्ये अमेरिकेने डाॅलर आणि सोन्याचा अर्थाअर्थी संबंध संपुष्टात आणला, म्हणूनच) अमेरिका आपल्या कर्जाची सव्याज परतफेड करु शकते. बरं, आफ्रिकन किंवा अन्य देश अन्नपदार्थांच्या बाबतीत ‘स्वयंपूर्ण’ होत, कर्जाच्या सापळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्नही करु शकत नाहीत. आफ्रिकन देशांनी त्यांच्या भौगोलिक स्थितीला अनुसरुनच इतरत्र न होऊ शकणारी पिके घ्यायची व ती कर्जफेडीच्या बदल्यात अमेरिकेला व अन्यत्र निर्यात करायची (उदा. आफ्रिकन कोको-उत्पादने). मात्र, यात काहीही गडबड केल्यास, संबंधित राष्ट्रावर निर्बंध लादून अमेरिका अन्नधान्याच्या पुरवठ्याविना उपासमारीद्वारे त्यांना जेरीस आणू शकते! वाचकहो, वरील अमेरिकन-षडयंत्री ‘स्क्रिप्ट’चे धागेदोरे, तुम्हाला होऊ घातलेल्या ‘American Trade-Deal’मध्ये कुठे दिसतायत का…जरा, “उघडा डोळे, बघा नीट”!
तेव्हा, बुडत्या अमेरिकन साम्राज्याच्या नौकेला वाचवण्यासाठी चाललेल्या ट्रंप यांच्या केविलवाण्या धडपडीत…गौतम अदानीचा गुन्हेगारी दावा आणि एपस्टिन-फाईल्सचे दोन भक्कम ‘नांगर’, ‘विनापरवाना’च (पंतप्रधानच ‘Compromised’, मग काय?) भारतीय बंदरांमध्ये खुशाल टाकून, बुडत्या अमेरिकन-अर्थव्यवस्थेला ‘भारतीय-काडी’चा आधार देण्याचा प्रयत्न होत असल्यानेच…’राहुल गांधी’ नावाचा ‘ढाण्या वाघ’ संसदेत व संसदेबाहेर गुरगरतोय, तो देश विकायला निघालेल्या, भाजप-संघीयांच्या तावडीतून देश वाचवण्यासाठीच!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष) (क्रमशः)