Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##8

“In order to become responsive to science and responsible to society”….यराम रमेश (तत्कालीन केंद्रीय पर्यावरण व वन मंत्री)
‘ICAR’च्या (The Indian Council of Agricultural Research) शास्त्रज्ञांसाठी ‘गॅग-ऑर्डर’ *Gag Order) काढण्यात आलेली असून ‘GM अन्नपदार्थ’ सेवनाच्या संभाव्य धोक्यांविषयी; ते जणू भाजपचे मंत्री, पदाधिकारी, संसद-विधिमंडळ सदस्य असल्यासारखे, ‘मोदी-शाह’ संयुक्त-दहशतीमुळे ब्र देखील आता काढू शकणार नाहीत! याच संस्थेच्या शास्त्रज्ञांनी व इतरे तज्ज्ञांनी ‘जनुकीय-परावर्तित (GM)’ अन्नपदार्थांना, मानवी-आरोग्याच्या दृष्टीकोनातून सप्रमाण तीव्र विरोध दर्शवताच…जयराम रमेशांनी जगजीवन रामांप्रमाणेच अमेरिकन दबावाची ‘ऐशीतैशी’ करत, त्याला वरीलप्रमाणे तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला होता. GM अन्नपदार्थांना काँग्रेसमध्येच मोठा अंतर्गत विरोध झाला होता, असं नव्हे; तर, भाजपच्या राज्य-सरकारांनीही (तसेच, त्यांच्या ‘स्वदेशी-जनजागरण’ संस्थेनं) व पुढे अटलजींच्या केंद्र-सरकारनेही त्यांना कडवा विरोध केला होता.
अमेरिकेत ५५% % GM-शेतमाल पिकवला जातो; पण, तो देशांतर्गत बाजारपेठेत पूर्ण विकला जाऊ शकत नाही. अमेरिकन दबावापुढे झुकत, अंदाजे फक्त ३५ देशच GM अन्नपदार्थ खातात; मात्र, मानवी-आरोग्याला असलेला धोका ओळखून युरोपियन देशांसह बाकी कुणीही खात नाही. म्हणूनच भारतात जेव्हा जेव्हा कधि कुठे वांगी, सोयाबीन वगैरेंची छुप्या पद्धतीने केलेली ‘GM’ शेती आढळलीय, तेव्हा तेव्हा उभी पिकं जाळून टाकण्यात आलेली आहेत. आजच भारत देश, मधुमेह व हृदयविकाराची ‘जागतिक-राजधानी’ बनलाय…त्यात, आम्ही GM अन्नपदार्थ सेवनाच्या माध्यमातून अनंत मरणांची भर घालणार आहोत काय? लक्षात ठेवा, अमेरिकेतला उच्चभ्रूवर्ग (Elites), GM अन्नपदार्थांचं ‘सेवन’ तर सोडाच; त्याच्या आजुबाजुलाही फिरकत नाही (जसे, आपल्याकडे अमिताभ, सचिन, अंबानी वगैरे मंडळी रसायनमुक्त ‘नैसर्गिक-शेती’तीलच खाद्यान्न, फळे, भाज्या व दुग्धजन्य पदार्थ खातात).
…म्हणे, GM-सोयाबीन नव्हे; तर, सोयाबीन-तेल अमेरिकेतून आयात करणार; त्यात, GM-अन्नांश नसतील? भारतात आपण कापसाचं ‘बिटी कॉटन’ हे GM-बियाणं वापरतो…जरी कापूस वस्त्रोद्योगात वापरला जात असला; तरी, सरकीच्या तेलातून (कापसाच्या बियांपासूनच वनस्पतिजन्य तेल) GM-अन्नांश, अन्नसाखळीत सहजी प्रवेश करु शकतातच!
‘गौतम अदानी गुन्हेगारी दावा आणि एपस्टिन-फाईल्स’मुळे, भारत हा ट्रंप यांचा हातात आयताच ‘बकरा’ सापडलाय…”कोणी कसा, कुठे कापत त्याचे लचके तोडायचे आणि खायचे”, याची ‘हाॅलिवूड-टाईप स्क्रिप्ट’ लिहीण्यात, ‘व्हाईट-हाऊस’मधले अंतःकरणाने ‘काळेकुट्ट’ असलेले गोरे लोक, सध्या मग्न आहेत!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष) (क्रमशः)