Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##9

“Sometimes evil doesn’t look like ‘evil’…It looks like paper, ink, signatures, official stamps”…
“जिथून, अवघी मानवता, सुरक्षित जागा शोधत नगरं वसवती झाली; ते सोडून चला, पुन्हा त्या भयाण जंगलांकडे…”बळी, तो कानपिळी” किंवा “Winnners & Loosers” (WIN-WIN नव्हेच) हा हृदयशून्य, क्रूर खेळ खेळायला! अमेरिका खंडातल्या मुळच्या भूमिपूत्र लाखो रेड-इंडियन्सना ठार मारुन व आफ्रिकेतल्या कृष्णवर्णीयांना ‘गुलाम’ म्हणून पशुसारखं राबवत…तिथे गोर्‍या लोकांची अमेरिका वसवण्यातली क्रौर्यपूर्ण पारंपारिक मानसिकताच, ‘एपस्टिन-फाईल्स’ असोत वा अमेरिकेने लादलेला व्यापार-करार मसुदा असो…दोन्ही घटनाक्रमांच्या मागे आहे!
कराराच्या निमित्ताने, वेगवेगळ्या रंगांचे आणि ढंगांचे शब्दांचे बुडबुडे हवेत हवे तसे उडवत, हिटलरच्या गोबेल्सलाही मान खाली घालायला लावणारा, पारंपारिक प्रचंड फसवाफसवीचा ‘भाजपाई-संघीय उद्योग’; सध्या तूफान तेजीत आहे…आयटी कंपन्यांचे शेअर्स घसरणीला लागले असतानाच; व्यापार-कराराच्या ‘कागदी घोड्यां’करवी कंड्या पिकवण्याच्या या उद्योगाचा ‘शेअर’ मात्र, चढता आलेख दाखवतोय. पियुष गोयल नावाचा केंद्रिय मंत्री, एकतर महामूर्ख आहे किंवा तो आपल्याला तो मूर्ख बनवतो आहे…म्हणे, आम्ही ‘GM-मका’ नाही आयात करत आहोत; आम्ही “जनावरांना स्वस्त असा जादा प्रथिनयुक्त आहार मिळावा म्हणून फक्त, ‘DDGS’ आयात करतो आहोत. ‘DDGS’ म्हणजे, मक्यातल्या पिष्टमय पदार्थांचं किण्वन-प्रक्रियेनं, प्रथम शर्करेत व मग, अल्कोहोलमध्ये विघटन केल्यानंतर उरलेला तंतूमय, स्निग्ध, क्षार व प्रथिन युक्त मक्याचा चोथा म्हणजे मकाच असतो. मलेशियाने भले, अशा सगळ्या ‘Non-Tariff’ शर्ती दूर सारुन ‘आपद्धर्म’ म्हणून अमेरिकेपुढे साफ मान तुकवली असेल; पण, आपण मलेशिया आहोत की, भारत? आपण ‘विश्वगुरु’ व्हायला निघालो असताना; हा अचानक ‘वैश्विक-गुलामी’चा आपला ‘अबाऊट-टर्न’, नेमक्या कुठल्या कारणाने आणि कोणासाठी?? आपल्याकडे शेतकरी व पशुपालक, अशा दोन स्वतंत्र ‘जमाती’ नाहीतच…शेतकरीच ‘जोडधंदा’ म्हणून पशुपालन करत असतात. हा पियूष गोयल नावाचा गृहस्थ, बेशरमपणे आपण अमेरिकेतून शून्य टक्के दराने कापूस ‘आयात’ केला; तर, आपल्या तयार कपड्यांवरही बांगलादेशाप्रमाणे शून्य टक्के कर लागेल, असं सध्या बरळतोय…म्हणजे, व्यापार-कराराद्वारे एकतर भारतीय कापूस-उत्पादकांचा किंवा नाहीतर कापड-उत्पादकांचा बळी जाणार! गौतम अदानी आणि ‘एपस्टिन-फाईल्स’ संबंधित बड्या भाजपाई-संघीय लोकांना वाचविण्यासाठी…तळागाळातील लाखो लोकांचा ‘बळी’ द्यायला, हे स्वयंघोषित ‘राष्ट्रप्रेमी’; पण, प्रत्यक्षात ‘राष्ट्रद्रोही’ असलेले बदमाष लोक…एका पायावर तयार आहेत, हे विसरु नका!

…राजन राजे, अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष (क्रमशः)