अमेरिकन व्यापार-करार आणि ‘गोबरगणेश’ असलेले ‘गोभक्त’…!!!
१) गायपट्ट्यात हातातोंडाशी आलेली शेती, उध्वस्त करणार्या ‘नीलगायीं’च्या माजलेल्या फौजांच्या कातडीलाही धक्का लावू दिला जात नाही; पण, भारतातून गोमांस निर्यात करणार्या बड्या कंपन्यांची वरकरणी नाव मुस्लिमसदृश्य भासली; तरी, मालक मात्र पक्के हिंदू (‘हिंदुराष्ट्रा’चे पुरस्कर्ते) असतात….
२) हेच गोबरगणेश ‘गोभक्त’ जेव्हा, अमेरिकेसारख्या पाश्चात्य देशात स्थलांतरित होतात; तेव्हा, अगदी ताव मारुन गोमांस खाण्यात तिथे प्रवीण झालेले दिसतात….
३) भले, भारतातल्या ‘अमूल’सारख्या भारतीय दूध-उत्पादक ब्रॅण्डने तिथल्या कुठल्या स्थानिक दूध-दुग्धजन्य पदार्थ विकणाऱ्या कंपनीशी भागिदारी केली असली; तर, मूळ भारतीय गोभक्तांना हे पक्कं माहित असतं की, अमेरिकेतील गायींसह सर्व दुधाळ जनावरांना त्यांच्याकडून
अधिक प्रोटिनयुक्त दूध मिळावं, म्हणून त्यांच्या चार्यात मोठ्याप्रमाणावर कृत्रिमरित्या प्रजनन केलेले विशिष्ट कीटक मारुन टाकले जातात (थोडक्यात, तो गाईंच्या पोटात वसत असलेल्या ३३ कोटी देवांना सामिष ‘महाप्रसाद’च अर्पण केला जातो; असं म्हणायला हरकत नाही)…म्हणजे, गाईंच्या (गोमातेच्या) पावित्र्याची ‘ऐशीतैशी’ केली गेलेली वस्तुस्थिती, हे ‘अंधभक्त’ निमूटपणे चालवून घेतात; वरुन, त्यांच्या न्याहारीच्या टेबलावरचे वाफाळते चहा-काॅफी, चाॅकलेट-टाॅफी, योगर्ट, आईस्क्रीम, चीज व इतर दुग्धजन्य पदार्थ, याच ‘मांसाहारी’ दुधातून आलेले असतात! तरीही, बेगडी हिंदुत्ववादी व ‘गोभक्त’ असलेले सत्ताधारी भाजप-संघीय लोक…अशा ‘मांसभक्षण’ करणाऱ्या गायींच्या दुधापासून बनलेले अन्नपदार्थ आयात करण्यासाठी आपली ‘हिंदुत्ववादी-लाजलज्जा’ सोडून व भारतीय जनतेला अंधारात ठेऊन…अमेरिकन व्यापार-करार करु पहातायत!
४) धक्कादायक बाब ही की, या अडाणी-अज्ञानी अंध गोभक्तांना, हे ‘शास्त्रीय सत्य’ ठाऊकही नसतं की, गाई, म्हशींसारखी सगळी दुभती जनावरे व त्यांचे नर, हे चार्यातील सेल्युलोजचं विघटन करणारे…आपल्या पोटातील (Rumen) अब्जावधी ‘बॅक्टेरिया, एकपेशीय प्रोटोझोआ आणि बुरशी’ पचवूनच (परस्परावलंबी सहजीवन) आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेली तीनचतुर्थांश प्रथिने (Microbial Proteins) मिळवतात (तेवढी प्रथिने निव्वळ चार्यातून मिळणे अशक्यच); म्हणजेच, या दृष्टिकोनातून पहातादेखील, गाई वा सगळाच ‘गोवंश’, हा अप्रत्यक्षपणे ‘मांसाहारी’च ठरतो…पण, हे ‘अंध गो-भक्तां’ना कोण समजावणार? म्हणूनच, वैज्ञानिकदृष्टीचे वि. दा. सावरकर डोळसपणे म्हणून गेले की, “गाय, हा उपयुक्त पशू आहे”!
…थोडक्यात, “गायीसारख्या एका ‘मांसाहारी’ प्राण्यासाठी तथाकथित हिंदुत्ववादी ‘शाकाहारी’ लोक…परमात्म्याची सर्वोच्च रचना असलेल्या मनुष्यप्राण्यांचे दंगली घडवून वा अकारण भररस्त्यात गाठून मुडदे पाडतात!”
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष) (क्रमशः)

