पुन्हा पियूष गोयल एके पियूष गोयल…पियूष गोयल दुणे अश्विनी वैष्णव….
‘MAGA’ची घोषणा करतच ट्रंप सत्तेवर आले…ही घोषणा करण्याची वेळ का आली? गेल्या काही दशकांत निव्वळ ‘Consumerism’च्या नादाने (म्हणजे, स्वस्त वस्तुंचा मुबलक पुरवठा…प्रसंगी, देशी-उद्योग व गुणवत्तेकडे कानाडोळा करत) अमेरिकेतले सगळे उद्योग चीनसारख्या देशांकडे स्थलांतरित झाले व त्यातूनच आज चीन, खरा ‘सुपरपाॅवर’ बनला आणि अमेरिकेची अतिशय वाईट अवस्था झालीय…म्हणूनच, ट्रंप यांना हा ‘टॅरिफ-वाॅर’चा अतिशय आक्रमक; पण, अंगाशी येऊ शकणारा सारीपाट मांडावा लागतोय…भारताची अवस्था तशीच करायची? …याचाच अर्थ, ‘पियूष गोयल’ संघ-परिवाराचा “Consumerism म्हणजे, आजची सोय आणि उद्याचं मरण!”
आता बघूया, ‘पियूष गोयल’ आणि ‘गलगोटिया’ प्रकरण…एकूण १०८९ पेटंटसाठी अर्ज करणाऱ्या; पण, शब्दशः एकही पेटंट मंजूर ‘न’ झालेल्या (थोडक्यात, असा ‘स्कॅम’ करणारी नावाप्रमाणेच एक, ‘नादार आणि नादान’ युनिव्हर्सिटी) ‘गलगोटिया’ विद्यापीठाच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चं उद्घाटन पियूष गोयल यांनीच फार कौतुकाने केलं होतं…हा सगळा गोबेल्स-तंत्राच्या धूळफेक व थापेबाजीतून उभा केलेला ‘गोबर-गोमूत्रा’सारखा वरपासून खालपर्यंत सगळा ‘फ्राॅड’ आहे!
काँग्रेसच्या राजवटीत ३०-३५ वर्षांपूर्वी ‘सायबर-रिव्हाॅल्युशन’च्या काळात (ज्यात, अमेरिकेतील ‘सिलिकॉन-व्हॅली’त गेलेले मूळ भारतीय वंशाचे लोक अग्रेसर होते); जेव्हा, अमेरिकेने सुपर काॅम्प्युटरचं तंत्रज्ञान द्यायला नकार दिला होता; तेव्हा, भारताने स्वतःचा ‘महासंगणक’ (सुपरकाॅम्प्युटर) बनवण्याचा चमत्कार करुन दाखवला होता…कारण, तेव्हा, ‘गोबर-गोमूत्रा’वर नव्हे; तर, नव्या येऊ घातलेल्या जागतिक-तंत्रज्ञानावर संशोधन होत होतं…विशेष म्हणजे, तेव्हा पावसाळ्यात कावळ्याच्या वा कुत्र्याच्या छत्र्या उगवतात; तसं गल्लोगल्ली, ‘गलगोटिया’सारख्या खाजगी-विद्यापीठांचं पिकं (खरं म्हणजे ‘तण’) उगवलेलं नव्हतं! तेव्हा, IIT/IIM सारख्या जागतिक दर्जाच्या संस्थांमध्ये फारसा राजकीय-हस्तक्षेप नव्हता व सरकार संशोधनासाठी पुरेसा पैसाही देत होतं (सध्याच्या भाजप-संघीय सरकारने त्यात फार मोठी कपात करुन, तेच पैसे निवडणुकीत वाटण्यासाठी वापरलेत) व त्यामुळे, IIT/IIM सह JNU व DELHI विद्यापीठातही जागतिक पातळीवरचं संशोधन अहमअहमिकेनं होत होतं. सध्या काय होतंय, तर आपले ‘फोटोजिवी’ पंतप्रधान ‘AI Impact Summit, New Delhi’च्या उद्घाटनाला येतात, मोठा तमाशा होतो…टेक-कंपन्यांनी आणलेली उपकरणं कडक सुरक्षा-व्यवस्थेत बिनधास्त चोरीला जातात…पुढे जाऊन भाजप-संघीय सरकारचं DD हे दूरदर्शन चॅनेल, चिनी-बनावटीच्या ‘रोबो-डाॅग्ज’चं प्रदर्शन दाखवत असतानाच, ‘गलगोटिया’ विद्यापीठाची प्राध्यापक-प्रतिनिधी चॅनेलवर येऊन ‘गलगोटिया’ने चीनच्या अगोदर ‘रोबो-डाॅग्ज’चं संशोधन केल्याची, भाजप-संघीय धर्तीची बेधडक थापेबाजी करु लागते (DD ने व केंद्रिय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्याला होकार देणारं ‘ट्विट’देखील लागलीच केलं होतं)…आणि, भारताची लाज अवघ्या जगाच्या वेशीवर टांगली जाते!
…बाय द वे, फिनान्शियल टाईम्स आणि ‘OCCRP’नुसार नासिर अली शबान अहली (UAE) आणि चांग चुंग ली (तैवान) यांनी गौतम अदानी समूहात अंदाजे २५ हजार कोटींची छुपी गुंतवणूक केल्याबद्दल स्वित्झर्लंडमध्ये ‘Money Laundering’च्या (बर्म्युडा-हेज फंड) ‘मोदानी-घोटाळ्या’संदर्भातील गुन्हा दाखल झालाय…काँग्रेस पक्ष JPC ची मागणी अशावेळी करतेय; जेव्हा, ‘सेबी’ तिच्याकडे अदानी-कंपन्यांविरोधात आलेल्या २४ पैकी २२ तक्रारींवर अजून चौकशीच करायला राजी नाहीय…आठवा, राहुल गांधींची घोषणा, “बोलो मोदी, ये २० हजार करोड किसके है…???”…आणि, संदर्भीय अमेरिकन व्यापार-कराराबाबत काही धागेदोरे जुळतायत का, ते ही पहायला हरकत नसावी!
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष) (क्रमशः)

