यहूदी कायदा ‘हालाका’, धर्मग्रंथ ‘तालमुद’ आणि हिब्रू बायबल ‘तोराहा’चे विशेषज्ञ असलेले झिऑनिस्ट ‘रब्बाई’च जर, सिनेगाॅग या धर्मस्थळातून ज्यू-जनसमुदायाला, चुकीची दिक्षा व दिशा देत असतील तर….
लक्षात घ्या की, अमेरिकेच्या चिथावणीने तसेच, मदतीने व ३८ राष्ट्रांचा पाठींबा असतानाही…आणि, इराणकडे तेव्हा लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे व आजच्यासारखी मारक क्षमता नसतानाही; सद्दाम हुसेनच्या इराकशी तब्बल ८ वर्षे इराणने एकट्याने ‘मुकाबला’ केला…तो शियापंथाचे तिसरे इमाम हुसेन यांच्या, ‘करबला’ हौतात्म्याच्या प्रेरणेतूनच! तोच ‘मृत्युंजय’ इराण, आज पुन्हा आपल्या अस्तित्वासाठी लढतोय, ती प्राचीन पर्शियन-संस्कृतीची जीवनमूल्ये सोबतीला घेऊनच! भारताचा पारंपारिक मित्र राहिलेल्या आधुनिक इराणने, गेल्या २०० वर्षांत कधि कोणावर आक्रमण केलेले नाही की, हकनाक कोणाशी कधि पंगा घेतलेला नाही. मात्र, आपला कुठलाही गुन्हा नसताना; इतरे राष्ट्रांच्या ‘वसाहतवादी’ वा ‘अर्थवादी’ आक्रमणामुळे (खनिज तेलाच्या अथवा दुर्मीळ खनिजांच्या लालसेपोटी) प्रश्न जेव्हा अस्तित्वाचा उभा राहिला; तेव्हा, इराकशी दीर्घकालीन युद्ध लढून, प्रसंगी १० लाखाहून अधिक इराणी नागरिकांनी, आपल्या ‘शिया-बलिदान’ परंपरेला जागून ‘हौतात्म्य’ पत्करत देशाला वाचवलेलं आहे!
…विशेष बाब म्हणजे, आपल्याकडे ज्याप्रमाणे भाजपाई-संघीय लोकं “सतत रेटून खोटं बोलत असतात व कटकारस्थान रचत असतात”; तसाच सल्ला झिओनिस्ट धर्मगुरु ‘रब्बाई’ आपल्या अनुयायांना देत असतील (त्यातूनच, झिओनिस्ट-लाॅबी आणि भाजप-संघीय लोक, यांच्यातील प्रगाढ मैत्रीचा, एक ‘समानधर्मी पैलू’ नजरेस यावा); तर, तेथील नेतन्याहूसारखे बदमाष, गुन्हेगार राजकारणी, कुठल्या पातळीवरचं खोटं बोलत असतील अथवा किती नीचतम पातळी गाठून ‘षडयंत्र’ रचत असतील?
याचसंदर्भात, हे आवर्जून नमूद केलं पाहिजे की, मध्यपूर्वेच्या आखातातील देशांच्या ९ अमेरिकन लष्करी अड्ड्यांवर इराणने जरुर हल्ले केले (अर्थातच ते तळ, एखाद्या राजदुतावासाच्या परिसराप्रमाणे अमेरिकेच्या स्वतःच्या मालकिचे असल्याने व तेथे फक्त, अमेरिकेचाच कायदा चालत असल्याने…ते हल्ले आंतरराष्ट्रीय-कायद्यानुसार अमेरिकेवरचेच हल्ले धरले जायला हवेत); सौदी अरॅमको तेलशुद्धीकरण प्रकल्पावरील व इतर निवासी ठिकाणांवरील हल्ले, आपण केले नसल्याचे इराणने निःसंदिग्ध शब्दात घोषित केल्याचं समजतं. याचाच अर्थ, आपल्याकडे जशा तथाकथित हिंदुत्ववाद्यांकडून व मुस्लिम धर्मांधांकडून, कटकारस्थानं रचून पद्धतशीररित्या हिंदू-मुस्लिम दंगली घडवल्या जातात; त्याचप्रकारे, आखाती मुस्लिम-राष्ट्रांमध्ये आपापसात युद्धे पेटवून, अमेरिका व इस्रायलची ‘झिओनिस्ट-लॉबी’ ‘बिनपैशा’चा तमाशा मजेत पहात बसणार होती. “लोण्याच्या गोळ्याचे दोन सारखे भाग करण्यावरुन झालेल्या दोन बोक्यांच्या भांडणाचा गैरफायदा घेऊन, तो सगळाच गोळा मटकावणार्या माकडाच्या”, बालपणीच्या गोष्टीतल्या बदमाषीसारखाच इस्रायल…ग्रेटर-इस्रायलच्या स्वप्नपूर्तिसाठी, हवा तेवढा आखाती-भूभाग बळकावून बसणार होतं व अमेरिका सगळ्याच आखाती देशांकडून युद्ध-नुकसानीची खंडणीद्वारे दामदुप्पट भरपाई करुन घेणार होती.
…धक्कादायक बाब ही की, इराणची भारतीय नौदलाच्या मिलान-२०२६ या बहुपक्षीय सरावातील १३० खलाशी असलेली ‘देना फ्रिगेट’, ही ‘पाहुणी-युद्धनौका’ इराणला परतत असताना…आंतरराष्ट्रीय समुद्री-हद्दीत कोणतीही पूर्वसूचना न देता, अमेरिकेने (जशी त्यांनी युद्ध सुरु करण्याची दिली नाही) तिच्यावर हल्ला चढवला…या विश्वासघातकी घटनेवर प्रतिक्रिया देताना, इराणचे परराष्ट्रमंत्री संतापून म्हणालेत, “माझे शब्द लक्षात ठेवा : अमेरिकेला, त्यांनी घालून दिलेल्या या अवसानघातकी पायंड्याबद्दल, खूप पश्चात्ताप होईल!”
…पण, आपल्याच पाहुण्यांचं संरक्षण करण्यास साफ अपयशी ठरलेल्या व ‘अदानी-एपस्टिन फाईल्स’मुळे अमेरिकेसमोर याअगोदरच, टॅरिफ-वाॅर व व्यापार-करारानिमित्ताने नामर्द-नेभळट सिद्ध झालेल्या, शेळपट भाजप-संघीय भारत-सरकारबद्दल नेमकं काय बोलावं…???
…राजन राजे, अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष (क्रमशः)
