“While ‘Brick-Work’ of ‘BRICS’ was ongoing, American Trade-Deal and now, America-Israel attack on Iran, has hit it hard…What will happen to ‘BRICS’, now…???”
भारताकडे यंदा ‘ब्रिक्स’ची ‘चेअरमनशिप’ असूनही द. आफ्रिकेत नुकत्याच पार पडलेल्या नौदलाच्या “Will for Peace-2026” या सामूहिक सरावाला गेला नाही…एवढंच नव्हे तर, यंदाच्या ‘WEF’च्या बैठकीलाही मोदी गेले नाहीत; कारण, तिथे अमेरिकेचे डोनाल्ड ट्रंप जाणार होते. मनात भिती ही होती की, ट्रंप त्यांच्या सवयीनुसार गळ्यात हात टाकून (लक्षात घ्या की, सौदी राजपुत्राला कोणीही स्पर्श करायचा नसतो, असा कडक नियम असूनही, ट्रंप यांनी एका आंतरराष्ट्रीय बैठकीत त्यांचा खांदा पकडून अनावस्था प्रसंग निर्माण केला होता…हे मोदींच्या चांगलंच स्मरणात असेल)… “आपण कसं भारत-पाकिस्तानमधलं संभाव्य आण्विक युद्ध थांबवलं”, असं बेधडक जाहीरपणे वक्तव्य करुन मोदींची मोठीच गोची केली असती.
‘डग्लस मेकग्रॅगोर’ या अमेरिकन युद्धतज्ज्ञाच्या म्हणण्यानुसार, “America has tactics in place, as in killing Iranian top leadership…which wins battles, no doubt, but it completely lacks ‘strategy’ that wins wars!” याचाच अर्थ, अमेरिका बाॅम्बफेक करुन इराणी-नेतृत्त्वाला संपवू शकते; पण, बाॅम्बवर्षावातून हजारो वर्ष जुन्या व समृद्ध इराणी-संस्कृतीला (Persian Culture) संपवू शकत नाही; हे डोनाल्ड ट्रंप व त्यांचे सल्लागार विसरले.
डिकाॅय-मिसाईल्स आणि मल्टीपल-वाॅरहेड्सच्या बळावर, इस्रायलच्या तथाकथित अभेद्य ‘आयर्न डोम’ची चाळणी करण्यात इराण यशस्वी झालाय. दुसरीकडे, क्षेपणास्त्रविरोधी (अँटी-मिसाईल्स) यंत्रणांची वानवा निर्माण होण्याची शक्यता दिसू लागलीय (इराणी जमिनीवर जागोजागी रेखाटलेल्या विमानांच्या भव्य चित्रकृतींवरच, अनेक अमेरिका-इस्रायली बाॅम्बहल्लेही वाया गेल्याची बातमी आहे)…हे अमेरिका-इस्रायलसाठी फार मोठं दुश्चिन्हच होय. युक्रेनसोबतच्या युद्धात रशियाच्या युद्धसामग्रीची व मनुष्यबळाची मोठी हानी घडवून आणून रशियाला कमजोर करायला निघालेल्या अमेरिकेपुढे; तेच संकट, इस्रायलमुळे ‘दत्त’ म्हणत उभं ठाकलंय… अमेरिकेची ‘युद्धनिती’ अमेरिकेवरच ‘बूमरँग’ झालीय! इस्रायलच्या नादाने, अमेरिकेतील अब्जो-खर्वोपती ‘ज्यू-लाॅबी’च्या दबावामुळे अथवा एपस्टिन-फाईल्सच्या ‘ब्लॅकमेलिंग’मुळे ट्रंप यांनी, हा इराणवर हल्ला करण्याचा आत्मघातकी निर्णय घेतला व सगळ्या जगालाच अस्थिर करुन टाकलंय. कुठलंही राष्ट्र, इतर कुठल्या राष्ट्रावर विश्वास ठेऊ शकणार नाही…एवढी आंतरराष्ट्रीय भू-राजनैतिक परिस्थिती विकोपाला गेलीय.
…म्हणूनच, आंतरराष्ट्रीय वाटाघाटींवर विश्वास ठेवण्याचा जमाना, बहुतांश इतिहासजमा झालेला असताना; आमचे तथाकथित ‘विश्वगुरु’, करोडो-अब्जावधी रुपयांचा चुराडा करत जगभर का फिरतायत, याचं खरंतरं उत्तर मागितलं गेलंच पाहिजे.
…बाय द वे, भारताला इराणचा पारंपारिक मित्र म्हणून, तुर्कस्तानपेक्षा सदर संग्रामात ‘युद्धविराम’ घडवून आणण्याची अधिक मोठी संधि होती; पण, आपल्या तथाकथित ‘विश्वगुरुं’नी इस्रायलचरणी लोटांगण घातल्याने (बहुधा, पेगासस-Pegasus व एपस्टिन-फाईल्सच्या दबावापोटी)… भारताला ही मोलाची संधि लाभण्याची शक्यता धूसर झालीय.
…राजन राजे, अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष (क्रमशः)

