संवेदनासहित मानवी ‘नितीमत्ता’ विरुद्ध संवेदनारहित कृत्रिम ‘बुद्धिमत्ता’ (AI)….
१६५ शाळकरी मुलींचे क्रौर्यपूर्ण बळी घेणाऱ्या, इराणमधल्या लहानग्यांच्या शाळेवरील अमेरिकन ‘टाॅमहाॅक’ क्षेपणास्त्र-हल्ल्यासंदर्भातील एका ताज्या धक्कादायक अहवालानुसार…कृत्रिम बुद्धीमत्तेचा (AI) वापर करणाऱ्या अँथ्राॅपिक कंपनीच्या ‘Claude AI’ प्रणालीनुसारच तो ‘दुहेरी’ हल्ला करण्यात आला होता. ‘डबल-टॅप’ लष्करी-तंत्रानुसार, शाळेपासून काही मीटर अंतरावरील एका आरोग्य केंद्रावर प्रथम हल्ला करण्यात आला व नंतर, जास्तीतजास्त जिवितहानी व्हावी; या सैतानी वृत्तीने व हेतूने, १५-२० मिनिटांनी शाळेवर दुसरा हल्ला करण्यात आला. कारण, पहिल्या हल्ल्यानंतर स्वाभाविकच पळापळ करत जवळच्याच शाळेत आसरा घेणारी आजुबाजुची लोकं, डाॅक्टर्स, नर्सेस, मुलींचे पालक वगैरे मंडळींचा किड्यामुंग्यांसारखा मोठ्या संख्येत खातमा करता येणं, सहजसाध्य होणार होतं.
…याव्यतिरिक्त, ‘जेफ्री सॅक्स’ या थोर विचारवंताचं म्हणणं आहे की, “ज्यापद्धतीने अमेरिका आणि इस्रायलकडून तेहरानवर बाॅम्बवर्षाव करुन रक्ताचे पाट वाहावले जातायत…ती बाॅम्बफेक, ही विशिष्ट लक्ष्याप्रति (‘Targeted’) नसून; ती सरसकट तेहरान भस्मसात करु पहाणारी, औरसचौरस स्वैर बाॅम्बफेक (Carpet Bombing) आहे आणि ती कुठल्याही सुसंस्कारित मनाला प्रचंड यातना देणारी आहे…निःशस्त्र-निष्पाप नागरिकांचं ते सामूहिक-हत्याकांड असून अखिल मानवतेचीच ती क्रूर हत्या आहे…आणि दुर्दैवाने, “हे सगळं ‘Book of Revelation’ या ख्रिस्ती धर्मग्रंथातल्या ‘अर्मागॅडन’ (Doomsday, Apocalypse, Judgment Day, Final War, Cataclysm like End Times) संकल्पनेनुसार सुरु झालेलं, सुष्ट आणि दुष्टांमधलं अंतिम युद्ध असून…त्यातून, जेवढा जास्तीतजास्त मनुष्यसंहार होईल; तेवढा दुष्टांचा नायनाट होऊन येशू ख्रिस्ताचा दुसरा अवतार पृथ्वीवर अवतीर्ण होणं सुलभ होईल”…असा जो, भाकड व आत्यंतिक घातकी ‘अंधविश्वास’ डोनाल्ड ट्रंप यांचे पाठिराखे व प्रचारक, अमेरिकी ख्रिस्ती लोकांमध्ये पसरवतायत; तो अतिशय धक्कादायक व धोकादायक आहे!” आपल्याकडे ‘हिंदुराष्ट्रा’ची विखारी-विद्वेषी संकल्पना भोळ्याभाबड्या जनतेमध्ये रुजवताना, ही अशीच चलाखी व बदमाषी भाजप-संघीय लोकं आजवर करत आलीयत!
एकूणच, ‘भांडवलशाहीची मक्का’ असलेल्या अमेरिकन देशातील गौरवर्णी-वर्चस्ववादी नृशंस मानसिकता म्हणजे, ‘साम्राज्यवादी-वसाहतवादी युरोपीय’ मानसिकतेनंतरचा (European Imperialism & Colonialism)…मानवी-जगताला लागलेला ‘महारोग’ आहे. ‘डोनाल्ड ट्रंप’ (आणि अमेरिकेच्या खास मित्र राष्ट्राचा प्रमुख म्हणून ‘नेतन्याहू’) प्रतिनिधित्व करत असलेल्या “भयंकर लालसा, रक्तपिपासूवृत्ती, निर्दयतेचा कहर आणि अमानुष शोषक मनोवृत्तीचा”…मानवी जगताला लागलेला, तो ‘कर्करोग’ (कॅन्सर) आहे आणि त्याचा समूळ नायनाट झाल्याखेरीज अथवा पाशवी-पातकी ‘अमेरिकी-मनोवृत्ती’त आमूलाग्र व क्रांतिकारी बदल झाल्याखेरीज आणि बहुसंख्य अमेरिकनांनी गौतम बुद्धाचा आणि म. गांधींचा “मानवता, प्रज्ञा (‘आसक्तिमय बुद्धी’ नव्हे), करुणेचा सन्मार्ग पूर्णतया अनुसरल्याखेरीज”…जगात कदापि शांतता नांदणे नाही आणि अखिल मानवतेला सुखसमाधानात जगता येणेही नाही!
….बाय द वे, “एका जगविख्यात पंतप्रधानाने, निर्दय मारहाण करत पशूसारखा माझ्यावर बलात्कार केला होता… मला गुलामासारखी वागणूक देऊन, जगातल्या बड्या व शक्तिशाली व्यक्ति, माझा असहाय्य स्थितीत क्रौर्यपूर्ण उपभोग घ्यायचे” असं, आत्महत्या करण्यापूर्वी…’व्हर्जिनिया गुफ्रे’ (from Virginia Giuffre’s memoir “Nobody’s Girl”), या एपस्टिन-फाईल्समधल्या प्रमुख पिडीतेने, जे धक्कादायक व माणुसकीला काळीमा फासणारं विधान केलंय, ते नेमकं कोणाबद्दल…???
…राजन राजे, अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष (क्रमशः)

