आजच्या चार महत्त्वपूर्ण बातम्या…आणि, त्यातील ‘भांडवली-व्यवस्थे’च्या उच्छृंखल-उन्मत्त, नीच-नृशंस, हिडीस-विकृत अंतरंगाचा ‘समान धागा’…!!!
*बातमी क्र. १…. “रामजन्मभूमी संकुलात साफसफाईचे काम करणार्या २० वर्षीय मुलीचं अपहरण करुन सामूहिक बलात्कार!”
(अर्थातच, ‘गोदी-मिडीया’तून ही बातमी गायब आहे किंवा अगदीच त्रोटक स्वरुपात कुठल्यातरी कोपर्यात पडून आहे)
‘रावणां’नी राजकीय लाभ मिळवण्याच्या व गुजराथी-भाषिक भांडवलदारवर्गाला ‘अतिस्वस्त मजूर’ (Cheap and Flexible Labour) उपलब्ध असलेल्या उत्तर प्रदेशच्या ‘सुपीक’ जमिनीत ‘चंचुप्रवेश’ मिळवू देण्याच्या (त्याकामी, अमिताभ बच्चनसारखे ‘सेलेब्रिटी’ दलाल म्हणून याअगोदरच.अयोध्या-परिसरात जाहिरातबाजीतून वापरले जाताहेत व सगळी मलिदा देणारी मलईदार कंत्राटं प्रामुख्याने गुजराथ्यांना; फक्त, ‘कंत्राटी-कामगार’ नावाचे ‘गुलाम’ उत्तरभारतीय) अंत:स्थ हेतूने प्रेरित होऊन बांधलेल्या राममंदिर-परिसरात, अशासारख्या घटना घडणं, घडत रहाणं…हा अपवाद असणार नाही!
गुजराथ्यांच्या वाढत्या कुप्रभावाला स्थानिक सर्वसामान्य उत्तरभारतीय “अयोध्या में किसानों को हिरासत और अरबपतीयों को राहत”, असं म्हणतायत!
———————————————————
*बातमी क्र. २ …. “इलियाॅन मस्कच्या ‘स्पेसएक्स’ कंपनीच्या ‘पोलरिस-डाॅन’ या खाजगी अंतराळ मोहिमेअंतर्गत फाल्कन-९ राॅकेटने ‘जेरेड आयझेकमन’ हा इलियाॅन मस्कसारखाच ‘सणकी-विक्षिप्त’ असलेला अमेरिकन अब्जोपती (Tech Expert) अंतराळात पृथ्वीपासून १४०० कि.मी. अंतरावर (Earth’s Van Allen radiation belts) जाऊन आला!”
अमेरिकन ‘फेडरल-रिझर्व्ह’तर्फे अमेरिकन धनसंपदा व कमाई याचं विश्लेषण केलं गेल्यानंतर, अनेक धक्कादायक निष्कर्ष हाती लागले…वरच्या १% वर्गाकडे देशाची ४०% धनसंपदा एकत्रित झालेली दिसते; तर, ज्याला ‘मेडियन-इन्कम’ म्हणतात (५०% जास्त वरच्या भागात आणि ५०% कमी खालच्या भागात असलेलं) ते गेल्या पंधरावीस वर्षांपूर्वी होतं, त्यापेक्षाही कमी भरलं. या पाशवी अमेरिकन भांडवली-व्यवस्थेचं व्यवच्छेदक लक्षण असलेल्या ‘आर्थिक-विषमते’नं घातलेला हा धुमाकूळ आहे…या असल्या अतिश्रीमंतांकडे एवढा पैसा जमा आहे की, तो कुठे खर्च करायचा, या विवंचनेनं ते पछाडले गेल्यामुळेच अशा विक्षिप्त कृती त्यांच्या हातून तेव्हा होतायत; जेव्हा, पृथ्वीवर अवघी सजीवसृष्टी सहजी संपुष्टात आणू शकण्याची विध्वंसक क्षमता बाळगणारी ‘पर्यावरणीय-महासंकटं’ दत्त म्हणत उभी ठाकलीयत!
———————————-
*बातमी क्र. ३ ….. “हिंडेंनबर्ग-अहवाल आणि ‘सेबी’ चेअरमन माधवी-बूच प्रकरण-प्रसिद्ध गौतम अदानीच्या ‘अदानी-पाॅवर’ कंपनीला महाराष्ट्र-सरकारतर्फे ६,६०० मेगावॅट वीज पुरवठ्याचे कंत्राट!”
२.७० रु. प्रति युनिट दराने सौरऊर्जा पुरवण्यासोबतच औष्णिक विजेचे दर ‘कोळशाच्या किमतीच्या आधारे’ निर्धारित (कोळसा कोणाचा…तर, गौतम अदानीचाच) केले जाणार आहेत, याचाच अर्थ अदानी-पाॅवर या ‘भाजप शासनमित्र’ (जसा, ‘पोलिसमित्र’ असतो, तसाच) कंपनीला, हे असे कंत्राट ‘बहाल’ केले गेले असल्याने वीजग्राहकांनी आपली भरमसाठ लूट होण्याच्या परिस्थितीला तोंड देण्यास तयार रहावे, हे उत्तम!
———‐————————
*बातमी क्र. ४ …. “रोह्याच्या नायट्रोकेम कंपनीतील स्फोटात गंभीर जखमी झालेल्या चौथ्या कामगाराचा मृत्यू!”
अलिकडच्या काळात एकापाठोपाठ एक झालेल्या असंख्य औद्योगिक अपघातात, शेकडो कामगार किड्यामुंग्यांसारखे भाजून, चिरडून, छिन्नभिन्न होऊन मरत आलेत…मरणारे सगळे अर्थातच ‘कंत्राटी-कामगार’ नावाचे ‘गुलाम’ (ज्यांच्या जगण्यामरण्याला काडी इतकीही किंमत या ‘भांडवली-व्यवस्थे’त नसतेच) आणि बहुतेक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खोलवर घुसलेले सगळेच उत्तर भारतीय कामगार असतात.
…कुठल्याही अशा दुर्घटनेत कंपनी मालक, व्यवस्थापक यांच्यावर ‘मनुष्यवधा’सारखी आणि ज्यांना, नियमितपणे कंपन्यांकडून ‘पैशाची जाड पाकिटं लाच’ म्हणून मिळत असतात; अशा, संबंधित सरकारी अधिकाऱ्यांवर कामात भ्रष्टाचार, बेजबाबदारपणा, बेपर्वाई, दुर्लक्ष केल्याबद्दल…प्रामाणिकपणे गंभीर कायदेशीर कारवाई झाल्याचं, एकही उदाहरण या ‘रक्तपिपासू-निर्मम-शोषक’ भांडवली-व्यवस्थे’त (Vampire-State System) उपलब्ध नाहीच!
——————————–
भांडवलशाहीचं, अमानुष-घृणास्पद ‘आर्थिक-विषमता’ व महाविध्वंसक निसर्ग-पर्यावरणीय आघात…हे व्यवच्छेदक लक्षण होय! ‘आर्थिक-असमानता’, ही ‘लोकशाही व न्यायदान प्रक्रिये’वर संक्रांत आणते.“आर्थिक-विषमतेतून राजकीय-विषमता जन्माला येते; आणि, पुन्हा राजकीय-विषमता, ही आर्थिक-विषमतेलाच कारणीभूत ठरते” असं एक दुष्टचक्र चालूच रहातं…त्यातून, एकूणच ‘लोकशाही-प्रक्रिये’ला असं काही एक ग्रहण लागतं की, आजची बहुतांश अमेरिकन तरुणपिढी (जवळपास ८०%) मतदानाचा त्रास घेण्यास का कू करु लागली आहे; कारण, त्या तरुणाईचं मत आहे की, “रिपब्लिकन जिंको वा डेमोक्रॅट्स जिंको…जिंकणार शेवटी ‘वाॅल स्ट्रीट’च… आपल्याकडे तर, याहीपेक्षा भीषण परिस्थिती मोदी-शाह यांच्या रासवट राजवटीत उभी राह्यलीय…पण, ती समजण्या-जाणवण्याएवढे आम्ही ‘जागे’ थोडेच आहोत? आमचं हिंदू-मुस्लिम, आमचं मस्जिद-मंदिर असंच चालू राहू द्या…नका मोडूत आमची झोप, ती ‘काळझोप’ असली तरीही!”
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)