Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##4

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##4
—————————–
स्वतः डाॅ. एम. एस. स्वामीनाथन यांनी सांगितलेला हा किस्सा आहे…जगजीवन राम जेव्हा अमेरिकन कृषि-विभागाचे नंबर २ चे अधिकारी असलेल्या डायरेक्टर जनरलना रोममध्ये भेटले; तेव्हा, त्यांनी अत्यंत उद्धटपणे केंद्रिय कृषिमंत्री जगजीवन राम यांना विचारलं, “हे प्रथम सांगा की, तुम्ही अमेरिकन शेतमालासाठी भारतीय-बाजारपेठ कधि खुली करताय?” जेव्हा विचारपूस करण्यात कमालीचं औधत्य जाणवलं तेव्हा, जगजीवन राम ताडकन उठले व आपल्या समोरच्या टेबलावर पडलेली कागदपत्रं त्यांच्या तोंडावर फेकून उद्गारले, “Hell to you and your exports…India will never import from America!” कुठे काँग्रेसचे जगजीवन राम आणि कुठे भाजपचे पियुष गोयल? “पुढचा बैल नेटा, तर मागच्याला दाखवील वाटा”, या सुत्रानुसार रिचर्ड निक्सनना ठणकावून प्रत्युत्तर करणार्‍या पं. इंदिरा गांधींच्या हाताखाली ‘जगजीवन राम’ काम करत होते; “नरेंदर…सरेंडर”च्या हाताखाली नव्हे!
लक्षात घ्या, तेव्हापासूनच आणि त्याही अगोदर, अमेरिकन लोकांची भारतीय बाजारपेठेवर गिधाडाची नजर होतीच! अमेरिकन शेतमालाची भारताला निर्यात सहजसुलभ व्हावी म्हणून, थेट भारताचं MSP धोरण आणि FCIच्या गोडाऊन्सच्या संरचनेवर देखील ते प्रभाव टाकू इच्छित होते. काँग्रेसच्या लाल बहादूर शास्त्रींनी “जय जवान, जय किसान’ घोषणा देत केलेलं शेतकऱ्यांच्या हित-रक्षण महत्कार्याचं…या भाजप-संघीय लोकांनी, मूठभर भांडवलदारांच्या हितासाठी आणि ‘अमेरिकन फासा’तून आपली मान सोडवून घेण्यासाठी अक्षरशः वाटोळं करायला घेतलंय. “सब का साथ, सब का विकास”, असं दामटून खोटं ‘नॅरेटिव्ह सेट’ करुन २०१४ची लोकसभा-निवडणूक, या लोकांनी जिंकली खरी; पण, निवडणुकीत दिलं गेलेलं, “एकूण शेतकी निविष्ठांसह उत्पादन-खर्चावर ५०% नफाधारित ‘किमान आधारभूत किंमती’चं (MSP…Minimum Support Price) आश्वासन”, हे “प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा होण्यासारखंच एक ‘जुमला’ ठरलं”!
काही प्रसंगीचे अपवाद वगळता, गेल्या कित्येक वर्षात कुठल्याही विदेशी करारात, आपल्या देशाने शेतमालाचा अंतर्भाव टाळलेला आहे. सध्या तर कपटनीतिने दुधाला शेतमालाच्या यादीतून अलग करण्यात आलंय आणि शेतमालाच्या व्यापाराला ‘आंतरराष्ट्रीय-व्यापारा’चा अविभाज्य भाग बनवलंय, हे अत्यंत क्लेशकारक तर आहेच; पण, करोडो भारतीय शेतकऱ्यांसाठी ती ‘धोक्याची घंटा’ आहे…सावधान, “शेतकऱ्यांच्या परसातली आग, थेट त्यांच्या अंथरुणाला भिडू पहातेय”!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष) (क्रमशः)