—————————–
“Either Modi falls into disgrace or India does….”
—————————–
काँग्रेसच्या काळात आपण अमेरिकेवर अधिकचा आयात-कर लावत होतो; भाजप-संघीय सरकार आल्यावर ही सगळीच व्यवस्था ‘खाली डोकं, वर पाय’ अशा शीर्षासनाच्या स्थितीत उभी केली गेलीय…प्रश्न आहे, त्या स्थितीत ती काळ राहू शकेल?
६ फेब्रुवारीच्या ट्रंप-हुकूमानंतर (Executive Order) अवघ्या तीन दिवसातच अमेरिकेने आपल्या डाळींचाही भारतातील निर्यातीत समावेश (आधी फक्त, जनावरांच्या खाद्यासाठी लाल ज्वारीचाच समावेश होता) केल्याची घोषणा केलीय, हा नेमका कुठला ‘आंधळी-कोशिंबिरी’चा खेळ आपण खेळतो आहोत?
भारताचे वाणिज्य व उद्योग मंत्री, हे सध्या पत्रकार परिषदेत श्रीखंडासारखं चवीला असणारं ‘पियूष’ पिऊन येतात की, अन्य काही? …की, GM अन्नपदार्थ खायला घालून भारतीय जनतेला ते ‘विष’ पाजू इच्छितायत?? हेच महाशय, ‘उन्नीस-बीस’चा खेळ रंगवत शेजारच्या बांगलादेशावरच्या २०% अमेरिकन-टॅरिफच्या तुलनेत भारतावर २% कमी म्हणजे १८% टॅरिफ लागल्याबद्दल स्वतःचीच पाठ थोपटून घेत होते; तो पाठ थोपटणारा त्यांचा हात, जागी येण्याअगोदरच ट्रंप यांनी बांगलादेशातील कापड-निर्यातीवर शून्य टक्के टॅरिफची घोषणा करत वाणिज्य-उद्योग मंत्र्यांचं थोबाड, त्यांच्याच हाताने फोडलंय! याचाच अर्थ, “There is method in the madness”, असं ट्रंप यांच्या टॅरिफ-वाॅरच्या संदर्भात बोलावं लागेल; शिवाय, ट्रंप यांच्या हातात “गौतम अदानी एपिसोड आणि एपस्टिन-फाईल्स”, ही दोन ‘ट्रंप-कार्ड्स’ आहेतच…या सगळ्या भाजप-संघीय सत्ताधाऱ्यांना कळसुत्री-बाहुल्यांसारखं आपल्या तालावर नाचवायला! त्यातूनच, अशा ‘Non-Tariff’ शर्तींच्या जोखडातून अमेरिकेने आपली सुटका करवून घेतली आहे की, जी कुठल्याही देशासाठी संरक्षणात्मक ‘ढाल’ असते आणि आता, ‘अमेरिकन स्टँडर्ड्स’ आपणं मुकाट्याने मान्य करणं (म्हणजेच, आरोग्य-संस्कृतीविषयक आपला हितवादी दृष्टिकोन दूर भिरकावून देणे) किंवा ‘Dumping Duries’ वगैरे काढून टाकणं…या अशा ‘देशघातकी’ बाबींमुळे आपण ढालीविना आपण बाजारपेठीय लढाईत उतरणार आहोत. कवचकुंडलाविना जी महाभारतयुद्धात अंगराज कर्णाची अवस्था झाली, तिचं अवस्था Non-Tariff शर्ती नावाची आपल्या देशाची कवचकुंडलं काढून घेतल्यामुळे होणार आहे…इथे विशेष बाब ही की, अमेरिकेचे स्वतःचे जवळपास ९ हजार ‘Non-Tariff bars’ आहेत आणि आपले फक्त सहाशे…स्वतःच्या Non-Tariff barriers ना जराही धक्का न लावता, हे ट्रंप महाशय आपल्या ६०० आयात-शर्तींना सुरुंग लावतायत? म्हणजेच, भारतीय-सार्वभौमत्वाला वाकुल्या दाखवत, हा सर्व एकतर्फी खेळ चाललाय! हे सगळं आक्रित कोण घडवून आणतंय; तर, तथाकथित ‘हिंदुत्ववादी’ असलेले, स्वयंघोषित ‘राष्ट्रवादी’वाले! प्रत्यक्षात हे खरे आहेत कोण, तर ट्रंप यांच्या पायाशी लोळण घेणारे चक्क ‘राष्ट्रद्रोही’!
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष) (क्रमशः)

