Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##10

“आमची माती, आमची माणसं”नव्हे; आता, “आमची गुज्जू-मांडवली आणि आमचे गुज्जू-भांडवली”….
पं. नेहरु, इंदिरा गांधींच्या निधड्या छातीपुढे तथाकथित ५६” छाती साफ पिचकी निघावी आणि आणि लाल बहादूर शास्त्रींच्या “जय जवान, जय किसान”, या किसानहिताय धोरणापुढे…मोदी-शहा सरकारचं किसानघातकी धोरण, या व्यापार-करारानिमित्ताने प्रकर्षाने चव्हाट्यावर यावं, हे ही नसे थोडके! भांडवलधार्जिण्या भाजप-संघीय मोदी-सरकारला, जे ‘३ काळ्या शेतकी-कायद्यां’नी घडवून आणायचं राहून गेलं होतं; तेचं नेमकं, या कराराद्वारे “सुंठीवाचून खोकला गेला”, अशा सहजतेनं घडून येईल आणि मोठ्याप्रमाणावर देशभरातल्या शेतजमिनींचा ‘सातबारा’ जैन-गुज्जू-मारवाडी भांडवलदारांच्या नावावर होईल! काश्मीरचं ३७० कलम काढून टाकण्यामागे, हा ही एक दूरगामी भांडवली-दृष्टिकोन, या भाजपाई-संघीय ‘गुर्जर-संस्कृति’चा कसा होता; ते आता खऱ्याअर्थाने आपल्याला आकळेल! संघीय-लोकांचं नियोजन, हे दूरगामी व पुढील पिढ्यापिढ्यांना ‘बाधित’ करणारं, ‘विषाक्त’ वा ‘जहरी’ कसं असतं…त्याचा हा उत्कृष्ट नमुनाच!

आर्थिक हानी-नुकसानीचाच विचार करायचा तर, ती फक्त शेतीक्षेत्राचीच होईल, असं अजिबात नव्हे; एकूणच भारतीय-अर्थव्यवस्था अमेरिकेकडे ‘गहाण’ ठेवली जाईल व आपलं ‘सार्वभौमत्व’ धोक्यात येईल. भारतातल्या व अमेरिकेतल्या मुठभर भांडवलदारांची ‘चांदी’ होईल…पण, या संभाव्य व्यापार-करारामुळे भारतीय-अर्थव्यवस्थेत एक तूफान, एक ‘आँधी’ येऊन…हिरे-जवाहर निर्मिती, वस्त्रोद्योग, यंत्रोद्योग, औद्योगिक-उत्पादन, MSME क्षेत्र; एवढंच काय तर, अगदी आयटी-क्षेत्रदेखील प्रभावित होईल; हे जाणूनच, तळागाळातील भारतीय-असंतोष उसळला आणि मसुद्यात “from commitment to Intention” असा तात्पुरता व सोयिस्कर बदल करण्यात आलाय. आयटी-कंपन्यांचे शेअर्स कोसळण्याला जर, ‘पाटील-इफेक्ट’ म्हणत असतील; तर, या व्यापार-करारातून भारतीय-अर्थव्यवस्था कोसळण्याला ‘मोदी इफेक्ट’ म्हटलं पाहिजे…आणि, नंतर या ‘तूफान-आँधी’ला सावरणारा एक ‘इफेक्ट’ येईल, त्याचं नाव असेल ‘राहुल गांधी-इफेक्ट’!

…हा व्यापार-करार, सामान्यांसाठी नसून, अमेरिकन व्यापाऱ्यांच्या हितासाठीच केवळ केलेला एक ‘गर्हणीय प्रकार’ आहे, ज्यात सामान्यांचा अथवा सार्वभौमत्वाचा विचार अभावाने देखील नाही! इथून पुढे अमेरिका, हा आपला ‘बाॅस’ आणि आपण त्याचे नम्र सेवकच! आपण कुठला वस्तूमाल वापरायचा, काय खायचं, काय प्यायचं; एवढंच काय, तर काय नेसायचं…हे देखील अमेरिका ठरवणार…आणि, त्यात काही चूक झाली, त्रुटी राहिली; तर, अमेरिका आपल्याला शिक्षा करणार. लक्षात घ्या, पं. जवाहरलाल नेहरुंच्या कार्यकाळात नुकताच स्वतंत्र झालेला भारत देश, ब्रिटीशांनी पुरता लुटलेला…म्हणून संसाधनहिन, अतिशय गरीब व अशिक्षित असतानाही कधि, अमेरिकेसमोर झुकला नव्हता; मग, रोज उठसूठ भारत हा आजचा सुपर पाॅवर, इकाॅनाॅमिक-मेडिकल-न्यूक्लियर-स्पेस-आयटी पाॅवर असल्याच्या घोषणा मोदींच्या कारकिर्दीत निरंतर चालू असतानाच…भारताचा ‘पाठकणा’ मोडून पडावा? गौतम अदानी प्रकरण, एपस्टिन-फाईल्स यांच्या व्यतिरिक्त अजून काही मोदींच्या ‘कपाटातले सांगाडे’, ट्रंप यांना ज्ञात आहेत काय…???

…राजन राजे, अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष (क्रमशः)