“Iran, not Gaza or Any Gulf-Arab contry…No ‘Boots’ on the ground & only ‘Bombs’ in the air; war-criminal ‘Bibi’ can’t win this war…!!!”
आजची परिस्थिती, ही दुसर्या महायुद्धावेळची परिस्थिती नव्हे; जेव्हा, निव्वळ ‘हवाई-वर्चस्वा’ने (Air Supremacy) युद्ध जिंकता येत होतं. कोरियन आणि व्हिएतनामी युद्धात हे प्रयोग असफल ठरलेले आहेत…इराकमधील अमेरिकेचं युद्ध आणि आताचं इराणविरुद्धचं युद्ध, यात जमीन-अस्मानाचा फरक आहे.
इराणची क्षेपणास्त्रे व ड्रोन्स, कमालीची अचूक मारा करत असताना…अमेरिकेची बाॅम्बफेक वा क्षेपणास्त्र-मारा लक्ष्यापासून दूर भरकटताना जग पहातंय (द. इराणमधल्या लहान मुलींच्या शाळेवरचा टाॅमहाॅक क्षेपणास्त्राचा हल्ला, दुसरं काय दर्शवतो?)
हजारो वर्षांची इराणी पर्शियन-संस्कृती व त्यांची परंपरागत चिकाटी; ही ‘पाणवनस्पती’सारखीच…वरुन पानं सुटी सुटी दिसतात (त्या भ्रमामुळेच, अमेरिकेच्या विकृत, बलात्कारी अध्यक्षाला खोमेनेईंच्या मृत्यूपश्चात ‘सत्तापालटा’ची स्वप्नं पडत होती); पण, पाण्याखालची मूळं, अगदी अतूट बंधनात बांधल्यासारखी एकमेकांशी बद्ध असतात…त्यांना विलग करणं, कर्मकठीण असतं; तशीच, ही इराणी जनता व इराणी-व्यवस्था, या अशा आपत्कालीन परिस्थितीत ‘फेव्हीकाॅल का जोड, टूटता नहीं”, अशी एकसंध व अपराजेय निर्धाराने, ‘शिया-परंपरे’ला स्मरुन-अनुसरुन बलिदानासाठी सिद्ध झालीय! अमेरिका काय किंवा इस्रायल काय; दोन्ही देशांचे प्रमुख…युद्ध-गुन्हेगारी, बलात्कार, अल्पवयीन मुलींचं लैंगिक-शोषण, भ्रष्टाचार वगैरे अत्यंत गंभीर गुन्ह्यात अडकलेले! मानवतेला कलंक असणारे हे दोन्ही राष्ट्रप्रमुख, आपल्या राक्षसी-सामर्थ्याचा व अमानुष गुन्हेगारी-षडयंत्री राजकारणाचा परिचय देताना…अविचाराने इराणचे ८६ वर्षांचे सत्ताधीश खोमेनेईंची, केवळ हत्याच करुन बसले, असं नव्हे; तर त्यांच्यासोबतच, जे कोणी युद्ध टाळण्यासंदर्भात विवेक बाळगून चर्चा करु शकण्याच्या मनस्थितीत होते, त्यांनाच ते संपवून बसलेत. तशा चर्चा ओमानच्या मध्यस्थीने जिनिव्हामध्ये सुरु असतानाच इराणला बेसावध ठेऊन अमेरिका-इस्रायलने दगाफटका केला व त्यात अली शमखानी (Secretary of Iran’s Defence Council), मोहम्मद पाकपोर (IRGC Commander), अझीझ नासीरझादेह (संरक्षण मंत्री), अब्दुलरहीम मौसावी (सैन्यदलप्रमुख) ‘शहीद’ झाले…आणि, आता दुसर्या-तिसऱ्या फळीतील जे ‘IRGC’चं, अहमद वाहिदींसारखं आक्रमक नेतृत्त्व पुढे आलंय; त्याला आपल्याला हव्या तशाच व हव्या त्याच शर्ती, अमेरिका-इस्रायलने मानण्यापलिकडे कुठल्याही चर्चासत्रात बिलकूल रस नाही…त्यांना सगळ्याचाच फैसला रणांगणावर करायचाय. विशेष बाब ही की, खोमेनेईंनी केवळ, इराणच्या अण्वस्त्रसज्जतेलाच नव्हे; तर, संभाव्य युद्धाचा आयाम, नियंत्रणाबाहेर जाऊन तिसऱ्या जागतिक महायुद्धासारखी स्थिती उद्भवू नये; म्हणून, ५००० कि. मी. पल्याड पल्ला असलेल्या ‘क्षेपणास्त्र-विकासा’लाही ठाम प्रतिबंध केला होता. मात्र, कुठल्याही आपत्कालीन स्थितीत, IRGC (Islamic Revolutionary Guard Corps), बसीज मिलिशिया (Basij or the Basij Mostazafan), इस्लामी धार्मिक-नेटवर्क आणि अंतर्गत सुरक्षा-यंत्रणा (IRGC, intelligence services, and an “axis of resistance” proxy network मिळून बनलेली) संपूर्ण संरक्षण-यंत्रणा त्यांनी दीर्घकालीन परिश्रमाना घडवलेली असून; ती कुठल्याही परिस्थितीला “जिंकू किंवा मरु”, अशा ‘शिया शहीदी-बाण्या’ने सामोरी जाऊ शकते.
…म्हणूनच, “इराण शरणागती पत्करेल ही भावना, ट्रंप यांच्या कबरीतच दफन होईल”, ही इराणची दर्पोक्ती नसून, डरपोक अमेरिका-इस्रायलला तो सक्त इशारा आहे!
…राजन राजे, अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष (क्रमशः)

