“It is easy to lure the Russian bear from it’s high; but is very difficult to put it back!”, Otto Von Bismark….
इराकप्रमाणेच वर्ष-२००७ पर्यंत, इराणमध्ये एकमेव केंद्रानुवर्ती आदेश-संस्कृती (Centralised Command) संरक्षणदलांमध्ये मौजूद होती…पण, सद्दाम हुसेन यांना खोटे आरोप लावून अमेरिकेकरवी ठार मारण्यात आल्यापश्चात, जी इराकची ससेहोलपट झाली; त्यावरुन धडा घेत, इराणने वर्ष-२००७ मध्ये ‘IRGC’प्रमुख ‘मोहम्मद अली जाफरी-तत्त्वप्रणाली’नुसार (Doctrine) ३१ ‘स्वायत्त’ लष्करी-विभाग बनवण्यात आले. आणीबाणीच्या प्रसंगी (उदा. प्रमुख नेत्याच्या हत्येपश्चात) नवीन प्रमुख नेता नेमला जाईपर्यंत; स्वतःच्या आकलनानुसार स्वतंत्रपणे लष्करी-निर्णय घेण्याचे व ते जसेच्या तसे अंमलात आणण्याचे ‘पूर्णाधिकार’ त्यांना देण्यात आले; त्याचीच, केवळ कटू नव्हे; तर, अगदी विषारी-जहरी फळं, अमेरिका-इस्रायल या दोन ‘महापातकी’ राष्ट्रांना भोगावी लागतायत…त्यातूनच, दीर्घकालीन व अधिक व्यापक युद्धस्तराचा फायदा (Escalation Supremacy) इराण अचूक मिळवतोय!
१० मार्चच्या (वर्ष-२०२६) मंगळवारी युनोच्या सुरक्षापरिषदेत १४ देशांनी जर्मनी, जपान, फ्रान्स, द. कोरिया या अमेरिकेच्या मित्र देशांनी, अमेरिकेचे युनोमधील राजदूत भाषण करत असतानाच सरळ सभात्याग केला; याचाच अर्थ, डोनाल्ड ट्रंप यांनी मध्यपूर्वेतील राजकीय घडामोडींवरील आपलं नियंत्रण गमावलंय! “इराण, आमच्याकडे समझोत्याची भीक मागत येईल”, यावर प्रत्युत्तरादाखल इराणचे परराष्ट्रमंत्री “We reject everything!” एवढेच तीन शब्द बोलले; त्यातच सगळं आलं. फ्रान्स, ब्रिटनचा प्रत्यक्ष लष्करी-कारवाईस विरोध व सौदी राजपुत्राच्या इराण-सरकारशी गुप्त वाटाघाटी, हे त्याचचं निदर्शक…”हा अमेरिकेसोबत केलेला विश्वासघात आहे”, या ट्रंप यांच्या वाक्ताडनावर, या सर्वच देशांकडून देण्यात आलेलं चोख प्रत्युत्तर म्हणजे, “इराणशी युद्ध सुरु करताना, आमच्याशी तुम्ही चर्चा केली नव्हती; आता, आम्हाला युद्धसमाप्तीबाबत प्रयत्न करु द्या!” तोवर, खनिज तेलाच्या भडकलेल्या किंमतीच्या अग्नितांडवात सापडून अमेरिका-इस्रायलचे काळे मनसुबे जळून खाक होतील, हे निश्चितच! पण, अमेरिकेचा घटता जागतिक-प्रभाव, देशांतर्गत युद्धाला वाढता विरोध आणि “Doplomatic Isolation Premium” म्हणून संबोधली गेलेली शेअरबाजाराची घसरण”…यातून एकतर, अमेरिका ‘Escalation Supremacy’साठी आत्मघातकी-धोकादायक पाऊल उचलेल किंवा जागतिक सत्ता-समतोलात कायमस्वरुपी मोठा बदल घडून येईल.
…दुर्दैवाने, पहिला पर्याय ट्रंप या विक्षिप्त, अहंमन्य व गुन्हेगार अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने निवडायचं ठरवलंच; तर, प्रशियन राजनितीज्ञ (१८५१-१८५९) ‘ऑटो व्हाॅन बिस्मार्क’चे (Otto Von Bismark) ऐतिहासिक उद्गार, ट्रंप यांनी विसरणं… त्यांच्याच अमेरिकेसह संपूर्ण जगाला फार महागात पडू शकतं!
…राजन राजे, अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष (क्रमशः)

