हे सगळं अमेरिकेत तेव्हा घडतंय; जेव्हा, भारतात कामगार-चळवळी’चं थडगं बांधण्यासाठी खड्डा खणून, दगड रचून तयार आहेत….
एप्रिल महिना उजाडताच, Amazon.com Inc (AMZN.O) या फार मोठ्या अमेरिकन कंपनीच्या न्यूयाॅर्क शाखेत, प्रथमच कामगार-संघटना (युनियन) गुप्तमतदानाद्वारे अस्तित्वात आलीय. आजवर आपल्या कंपनीत युनियनबाजी होऊ नये, यासाठी साम, दाम, दंड, भेद अशा सगळ्या कुटील नीतिचा आणि प्रचंड ‘कंपनी-दहशती’चा (Corporate-Terrorism) बेलगाम वापर करुनही, हे ज्यो बायडेन प्रशासनाच्या आशिर्वादाने अघटित घडलेलं आहे! जवळपास १० लाख लोकांना रोजगार पुरविणारी ॲमेझाॅन ही […]