“रियल मटेरियल कम, बात जादा…”

नरेंद्र मोदींचं स्वातंत्र्यदिनाचं लाल किल्ल्यावरील भाषण, हे उत्स्फूर्त व निर्भयपणे केलं गेलेलं सादरीकरण होतं, यात वादच नाही. मात्र, निवडणुकीच्या काळातील भाषण मालिकांचं ते एक असं ‘एक्सटेंशन’ होतं की, ज्यात एखाद्या बॉलीवुड सिनेमासारखा ‘इमोशनल मसाला’ परिपूर्ण भरलेला होता….. ‘उक्ति आणि कृति’ यात कमालीची तफावत असलेलं, “रियल मटेरियल कम, बात जादा… असं एक ते भाषण होतं !”

……आपल्या नौटंकी भावपूर्ण भाषणात नरेंद्र मोदींनी बलात्कारी तरुणांना, जो शहाणपणा शिकवण्याचा प्रयत्न केलाय, तो अधिकार त्यांना कसा काय पोहोचतो….की, जेव्हा, त्यांच्या केंद्रिय मंत्रिमंडळातल्या ‘निहालचंद’ नांवाच्या मंत्र्यावर बलात्काराचे अत्यंत गंभीर आरोप सप्रमाण झालेले आहेत आणि नरेंद्र मोदी नांवाचे ‘बडबडबाबा’ त्यासंदर्भात एकदम ‘मनमोहनसिंगा’पेक्षाही अधिक मोठे “मौनीबाबा” झालेले आहेत ??? …ती बलात्कार-पिडीत तरुणी, कालपरवापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझी व्यथा ऐकून घेण्यासाठी केवळ दोनच मिनिटं द्यावीत, म्हणून आक्रोश करत होती. पण, व्यापारी-उद्योगपतींसाठी २४ तास उपलब्ध असणा-या मोदींकडे तिच्यासाठी एक-दोनच काय, अर्ध मिनिट देखील उपलब्ध नव्हतं. मित्रांनो, जर इथे कुठे “शिवशाही” नांदत असती तर, त्या ‘निहालचंद’ची शिवछत्रपतींनी कुणाचाही मुलाहिजा ‘न’ ठेवता, अत्यंत कठोरपणे तत्काळ नि:पक्षपाती चौकशी करवली असती; व दोषी आढळल्या क्षणीच, आपल्या राज्यात ‘एका अबलेची अब्रू’, आपलाच एक सहकारी घेतोयं, हे पाहून त्या ‘निहालचंद’ला ‘रांझ्याच्या पाटला’सारखा ‘चौरंग्या’ करुन हाल हाल करुन मारला असता. ….तरी, महाराष्ट्रातले तथाकथित ‘शिवप्रेमी-नागोबा’ नरेंद्र मोदींच्या भाषणाच्या पुंगीवर डोलण्यात धन्यता मानतायतं…. काय दुर्दैव आहे, या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राचं ? आज ‘कृष्णाष्टमी’ आहे….. त्या युगंधरानं तहहयात स्त्रियांवर अत्याचार करणा-या नरकासुरांचा वध केला होता किंवा द्रौपदीच्या नुसत्या वस्त्राला हात घालणा-या दु:शासनासारख्यांना भीमाकरवी यमसदनी धाडलं होतं ! आणि आम्ही, निहालचंद नांवाच्या मंत्र्याच्या कथित बलात्कार प्रकरणी किंवा सतिश शेट्टी हत्येप्रकरणी, मोदींना साधा प्रश्न विचारायलासुद्धा घाबरतोयं ?

या हरयाणवी मंत्र्याच्या पित्त्यांनी, त्या बलात्कार-पिडीतेचं जीणं काय मुश्कील करुन ठेवलयं व तिचे गाववाले तिच्याशी कुठल्या प्रकारचा व्यवहार करतायतं, हे तपासून पाह्यलं तर, सतप्रवृत्त मंडळींच्या काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहाणार नाही. ती पिडीत तरुणी आपली सत्य-तक्रार मागे घेत नाही(म्हणे, खालच्या कोर्टाने मंत्र्याला ‘क्लीन-चीट’ दिलेली आहे !…. अहो, हायकोर्ट-सुप्रीम कोर्टातसुद्धा गोष्टी कशा ‘मॅनेज’ केल्या जातात, ही भारतात काही नवीन गोष्ट नव्हे; मग, खालच्या कोर्टातल्या न्यायाधीशांची काय कथा ?… त्याचा दाहक अनुभव आम्ही ३५वर्षाहून अधिककाळ महाराष्ट्रासारख्या राज्यात, जिथे देशात त्यातल्यात्यात बरी ‘कायदासुव्यवस्था’ अाहे, तिथे घेत आलेलो आहोत, तर मग, हरयाणासारख्या उत्तरभारतीय राज्यातली परिस्थिती काय म्हणावी ?) तोपर्यंत, त्या गावचा “विकासनिधी” रोखून धरण्यात आलेला आहे आणि जर, या तरुणीनं तिची सत्य तक्रार मागे घेतली तर, गावाला दामदुप्पट “विकासनिधी” मिळवून देण्याची “व्यवस्था” केली जाईल(त्यात, गावातल्या राजकारणी धेंडांची वेगळी ‘खास-व्यवस्था’ असणार, हे वेगळं सांगायला नको !) असं सांगण्यात आल्यामुळे, त्या बलात्कार-पिडीतेचे गांवकरीचं हात धुवून, तिनं तिची तक्रारमागे घ्यावी म्हणून तिच्या मागे लागलेतं…. कितीकाळ अजून ती तिचा लढा या परिस्थितीत चालू ठेवू शकेलं ?…. हा, अधम-प्रवृत्तीचा कळस आहे ! पण, हे गावकरीचं केवळ ‘अधम’ नव्हेत; तर, या देशातला प्रत्येक तो नागरिकसुद्धा ‘अधम’ म्हणायला नको का की, जो हा प्रश्न नरेंद्र मोदींना ‘न’ विचारता, …….त्यांनी बलात्कारी-तरुणां’च्या मात्यापित्यांना उद्देशून केलेल्या ढोंगी भावपूर्ण आवाहनाला भुलून, त्यांचं तोंड फाटेस्तोवर सोशलमिडीयामधून कौतुक करत सुटलायं ???….. आणि, महिलांबद्दल तर, काय बोलावं, ….ज्या, नरेंद्र मोदींच्या भाषणातल्या प्रत्येक शब्दाची तळी उचलून धरण्यात आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता मानतायतं ? “जसा गरीबच गरीबाचा शत्रू असतो, कामगारच कामगाराचा शत्रू असतो; तिचं अवस्था महिलाच महिलांची शत्रू बनताना पहायला मिळतेयं…. अजून वेगळं ते काय !”
…… या, सर्वाचा संदेश एकच आहे, ” जो नरेंद्र मोदींच्या वळचणीला गेला; त्याचा केस सुद्धा कोणी वाकडा करु शकत नाही ! ” महाराष्ट्राला तर हे नव नाहीच; महाराष्ट्रातले तथाकथित ‘गॉडफादर’ एका रात्रीत AK-47 बाळगणा-याला गुन्हेगाराला आपल्या वळचणीला आल्यानंतर, कसे ‘देशभक्त’ ठरवू शकतात, ते उभ्या देशानं मुंबईतल्या बॉंबस्फोटानंतरच्या धार्मिक-दंगलींच्या काळात यापूर्वी पाह्यलयं. या देशातला PM(जो, वाच्यार्थानं फक्त “प्रॉडक्ट् ऑफ् मिडीया” आहे किंवा भारत नांवाच्या देशाचा ‘आत्मा’ मारुन त्याला ‘एक कंपनी’ बनवून टाकणा-या ‘भारत’ नांवाच्या कंपनीचा CEO मात्र आहे !) एक नवा सुपरडुपर “गॉडफादर” झालायं…. अहो, म्हणूनच “सतिश शेट्टी” हत्या प्रकरणाची फाईल CBIला तत्काळ बंद करावी लागलीयं….. ही, तर फक्त सुरुवात आहे ! सावध करणं आमचं काम आहे…. अपप्रवृत्तींवर प्रहार करणं आमचं काम आम्ही समजतो, तोच तर खरा ‘श्रीकृष्णधर्म’ आहे; म्हणून सांगून ठेवतो….. भविष्यात, अशा अनेक घातक अपप्रवृत्ती देशात ‘विकास नांवाचा ढोल’ बडवतं थैमान घालतील; तेव्हा देशात एक ‘गुलामगिरीचा सन्नाटा’ पसरलेला असेलं. नोक-या भरपूर मिळतील; पण, त्याची काडीमात्र शाश्वती नसेलं. पगारमान अत्यंत शोचनीय असेलं. आईवडिलांच्या पांगुळगाड्याशिवाय, या तुटपुंज्या पगारात संसाराचा गाडा रेटणं, या तरुणपिढीला आजच कठीण होत चाललयं… उद्या अशक्य होत जाईलं. कालचे ‘पोपट’ निदान ‘सोन्याच्या पिंज-यात’ तरी बंदिस्त होते; उद्याच्या ‘पोपटां’च्या पिंज-यांचा वर्खच फक्त सोनेरी असेलं…. थोडं जरी खरवडलं तरी, आतलं ‘लोखंड’ उघडं पडेलं… पिंजरा सोन्याचा, तकलादू म्हणून एकवेळ भेदता येईल; पण, लोखंड भेदणारे पिळदार स्नायू ही ‘फास्ट फूड’वर…. ‘जंकफूड’वर वाढणारी टिनपाट छातीची तरुणपिढी कुठून आणेलं ? देशात, प्रदीर्घकाळ शांतता पसरेलं… पण, कामगार-कर्मचारी क्षेत्रात पसरलेल्या ‘शांतते’प्रमाणेचं, ही ‘शांतता’…. मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, चर्चमधल्या शांततेप्रमाणे पवित्र(Peace) नसेलं; तर, स्मशानभूमीमधील अपवित्र ‘शांतते’सारखी ‘पिशाच्चिक’ व ‘पैशाचिक'(Silence) असेलं ! ‘सिस्टीम’ नांवाचे तुरुंग, देशातल्या माणुसकीलाच ‘सुरुंग’ लावण्यासाठी जागोजागी ‘दारुगोळ्या’नं ठासून भरलेले असतील. तेव्हा, मित्रांनो कुठे जालं ? ….. तेव्हा, ‘उठाव'( मी, ‘क्रांति’ वगैरे मोठे शब्द इथे वापरत नाही; नाहीतर तेवढ्या उच्चारानंही हल्ली लोकं गळपटून जातातं !) करण्याची ‘मशाल’ धरण्याएवढी ‘मजाल’ असेलं शिल्लक तुमच्यात?
त्या हरयाणवी बलात्कार-पिडीतेचा आक्रोश सत्तेच्या टाचेखाली दाबणं किंवा स्व. सतिश शेट्टींच्या हत्येची चौकशी ‘ब्रह्महत्या’ करणा-या बड्या ‘हत्त्यारी’ धेंड्यांना वाचवण्यासाठी ‘सीबीआय’करवी फाईलबंद करणं, या घटना प्रातिनिधिक स्वरुपाच्या आहेत…. या देशाचं, याअगोदरच गढूळलेलं राजकारण कुठल्या थराला यथावकाश जाणार आहे; हे दाखवून देणा-या आहेत. देशाला मगरमिठी मारुन बसलेल्या या, अफाट पैशानं व सत्तेनं माजलेल्या भांडवली व्यवस्थेला, आता विरोध सहन होत नाही व सहन करायची गरजसुद्धा तिला उरलेली नाही. या ना त्या मार्गाने विरोधकांचा “काटा काढून”, ती प्रकरणं, ‘डोळे मिटून दूध पिणा-या मांजरांसारख्या’ स्वार्थाला चटावलेल्या व्यवस्थेला हाताशी धरुन, ‘सतिश शेट्टीं’च्या हत्या प्रकरणासारखी सहजी मिटवतादेखील येतील व सोयिस्करित्या ‘मौनीबाबा’चं रुपही धारण करता येईल !

….. महाराष्ट्रात, ‘राजा राममोहन रॉय’ नांवाच्या थोर समाजसुधारकानं बंद पाडण्याअगोदर, “सतीची प्रथा” नांवाची एक अमानुष व माणुसकीला संपूर्ण काळीमा फासणारी ‘प्रवृत्ती’ समाजात मोठ्या प्रमाणावर स्वातंत्र्यपूर्व काळात अस्तित्वात होती. जबरदस्तीनं ‘सती’ जाव्या लागणा-या विधवा स्त्रियांच्या किंकाळ्या कुणाला ऐकू जाऊ नयेत म्हणून, मोठ मोठे ढोल-ताशे बडवले जायचे. त्या जुन्या ढोलताशांची जागा आता, “विकास” नांवाच्या नव्या ढोलताशांनी घेतलीयं. पूर्वीचाही ‘ढोलताशांचा कर्कश्श गजर’ म्हणजे जसा कुठला ‘संगीत-जलसा’ नव्हता; तिचं परिस्थिती आजही आहे…. देशाच्या कानाकोप-यात, “विकास” नांवाच्या ढोलताशांच्या सातत्याने पुकारल्या जाणा-या कर्णकटू निनादात, असंख्यांच्या ‘आत्म्यांचे आक्रोश’ दडपलेले आहेत…. सतिश शेट्टी, डॉ. नरेंद्र दाभोळकरांसारख्या समाजहितैषी ‘जागल्यां’च्या ब्रह्महत्येचं महापातक दडलेलं आहे ! शिवाय, त्याचे पर्यावरणीय दुष्परिणाम आणि त्यातून उदभवणारी पर्यावरणीय संकटं, ही पिढी तर भोगतेयचं; पण, त्याहीपेक्षा पुढील पिढ्यापिढ्यांच्या अस्तित्वासमोरच यापुढे ‘अंधाराचं ताट’ वाढून ठेवलेलं असेलं… तरीही, आमच्या भारताचे CEO(PM नव्हे !) नरेंद्र मोदी, हाडामांसी खिळलेेल्या सवयीनुसार बिनदिक्कत खोट भाषण ठोकणारं, “पर्यावरणावर शून्य परिणाम करणारा विकास आम्ही करणार !” आणि, दुस-या बाजुला कोकणाच्या पर्यावरणाची थडगी बांधणारा ‘जैतापूर-अणुप्रकल्प’ राबवणारच म्हणणारं आणि डॉ. माधव गाडगीळ अहवालासकट डॉ. कस्तुरीरंगन अहलाल गुंडाळून तिथल्या ‘पश्चिमघाटीय जैवबहुविधते’चा सत्यानाश करणार. जमीन-अधिग्रहण कायदा बदलून शेतक-यांना जबरदस्तीने उद्योगधंद्यांच्या उभारणीसाठी हुसकावून लावणार….”वा रे नरेंद्र मोदीजी…. मुँह में राम बगल में छुरी जी !” …. बाकी कशाला, त्यांच्याच ‘गुजरात-मॉडेल’नं पर्यावरणीय -हासाच्या आणि मानवी-शोषणाच्या संदर्भात, चीनच्या अवकळेपर्यंत याअगोदरच गुजरातला आणलेलं आहे, अजून वेगळा काय पुरावा हवायं?

रा.स्व.संघाचे सरसंघचालक सर्वश्री. मोहन भागवत गेल्या विजयादशमीला नागपुरच्या रेशीमबागेत म्हणाले होते की, ” कॉंग्रेसनं भारताला जगाचा कामगार केलायं !”. सरसंघचालकांना त्याहीवेळी, तत्कालिन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी, ‘गुजरातला भारताचा कामगार’ केलेला दिसला नव्हता; आणि, आताही पूर्णतया ‘भारताला जगाचा कामगार’ बनवण्याचा “मेक इन् इंडिया”चा लाल किल्ल्यावरुन केलेला पुकारा त्यांना ऐकू आला नसेल…. यालाच, ‘सिलेक्टिव्ह-हियरिंग’ म्हणतात ! हे सर्वांनीच लक्षात घेणं गरजेचं आहे की, भारताच्या प्रगतीच्या वाटचालीच्या खुणा, उलट्या पावलांच्या आहेत. ही मूळ भारतीय-संस्कृति नव्हे…. जाज्वल्य ‘हिंदुत्व’ तर नव्हेच नव्हे ! ज्याप्रमाणे, बांगला देश, फिलीपाईन्स पाठोपाठ, सध्या इथिओपिया, टांझानिया, रवांडा, सेनेगलसारख्या आफ्रिकी देशांमध्ये जगातले(अगदी चीनमधलेसुद्धा… कारण, तिथे कामगार-कर्मचा-यांचे वेतनमान वाढून दरमहा ६०० डॉलर्स म्हणजेच, रु.३६,०००च्या आसपासचं झालयं) ‘भांडवलदार’ धाव घेतायतं, ती त्यांची ‘धाव’ रोखून भारतात त्यांना ‘आवतण’ देणं सुरु आहे. जेव्हा, नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरील भाषणातून जागतिक भांडवलदारांसाठी ‘लाल गालिचा’ अंथरत असतात, तेव्हा, ते भारताला आफ्रिकी राष्ट्रांच्या पातळीवर आणून ठेऊन ‘अत्यंत स्वस्त मजुरां’चा(ज्याला हल्ली ‘चीप-लेबर’ ऐवजी, ‘फ्लेक्झिबल-लेबर’ ही गोंडस-फसवी संज्ञा वापरतात) देश म्हणून खुबीनं ‘पेश’ करत असतात. म्हणूनच, त्यासाठी बेधडक व बिनदिक्कतपणे कामगार कायद्यांच्या बदलाचा घाट घातला जातोयं….. जेणेकरुन, याअगोदरच मरणासन्न झालेली कामगार-चळवळ पूर्णतया धराशायी व्हावी. पण, मूर्ख कामगारांना हे कळत नाही…. हुरळल्या मेंढीगत ‘लांडगेतोड’ झाल्यानंतर कळून तरी काय उपयोग? जेव्हा, नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन ‘औद्योगिक-सेझ’चा विचार जोरकसपणे पुढे रेटतात; तेेव्हा, मुद्दा फक्त भारतीय स्वस्त-मजुरांचाच केवळ बुलंद करण्याचा नसतो; तर, त्या ‘सेझ’च्या घोषित धोरणामागे बिनदिक्कतरित्या कामगार-कर्मचा-यांविरोधी दमनशक्ति वापरु शकण्याच्या राक्षसी क्षमतेचासुद्धा विचार ‘तेज’ झालेला असतो. ‘स्कील-इंडिया’चा खास नारा यासाठी कारण, आफ्रिकी देशात व काही प्रमाणात आजही चीनमध्ये ‘कसबी-कामगार'(skilled-labour) मिळत नाहीत; तेही, जगाला अतिशय स्वस्तात उपलब्ध करुन देण्याचं, हे षडयंत्र आहे(जेव्हा, पाश्चात्य देशात कंपनीतील कमाल आणि किमान पगारातल्या फार मोठ्या तफावतीवर कडक नियंत्रण आणण्यात आलेलं आहे)…. आपल्याच देशातले नागरिक स्वस्तात बिनतक्रार राबणारे ‘हुशार गुलाम’ म्हणून जगाच्या पटावर मोहरी म्हणून ठेवणं, म्हणजेच…. “मेक इन इंडिया अँड मेड इन इंडिया”, यापरतं दुसरं काहीही नाही !

भरधाव धावणा-या गाडीत बसल्यावर मजा तोवरच वाटतं राहते, जोवर तिला जोरदार अपघात होत नाही. ज्यापद्धतीच्या विकासाचे नारे या देशात आणि जगात भांडवलदारांकडून लावले जातायतं; तो, एक खतरनाक खेळ आहे ! आपल्या कुठल्याही यच्चयावत धर्मग्रंथांमधून अशात-हेच्या बेलगाम ‘विकास’ नावाच्या शब्दाचा साधा प्रयोगदेखील कधि झालेेला कुणाला कधि आढळणार नाही. तेव्हा, हा ‘विकास’ नांवाचा, विस्तवाशी चाललेला खेळ थांबवून ” पर्यावरणस्नेही शाश्वत-जीवनशैली’संदर्भात खोलवर विचार व अंमलबजावणी कठोरपणे व्हायलाच हवी. ती काळाची निकड आहे. केवळ, धरणांच्या कालव्यांवर ‘सोलार सेल्स’ बसवून सौरऊर्जा निर्माण केली वा वृक्षारोपण केलं; म्हणजे, ‘पर्यावरण-संरक्षणा’चं कार्य आटोपलं, अशी जर कुणाची भ्रामक समजूत असेलं तर, ती त्यांनी वेळीच दूर करुन घ्यावी. ‘पर्यावरणस्नेही जीवनशैली’ वा ‘पर्यावरण-संरक्षण’ याची व्यामिश्रता फार गहन व मोठी आहे आणि कुणी एकट्यादुकट्याच्यानं होणारी ही सहजसाध्य गोष्ट नसून, ती सरकारी पातळीवरुन(केंद्र व राज्य) म्हणजेच, ‘टॉप-ड्रीव्हन’च असायला हवी. तरच, अंतिमत: सर्वनाशी अशा, ‘आधुनिक विकासा’मुळे तसेच, विकास नव्हे तर, ‘विकार-पुरुषां’मुळे चराचरसृष्टीच्या अस्तित्वावरच उभं ठाकलेलं प्रश्नचिन्ह दूर होईल….
आम्ही, लाल किल्ल्यावरुन भाषण ठोकणार असू; पण, कठोरपणे लोकसंख्या-नियंत्रण ( वाढती लोकसंख्या, ही भाडवलदारांना व मोदी-सरकारसारख्या भांडवलधार्जिण्या सरकारांसाठी ‘स्वस्त-मजुरां’ची बाजारपेठच असते !), कामगार-कर्मचा-यांना सन्मानजनक किमान-वेतनाची(दरमहा किमान रु.२५,०००/-) कठोर अंमलबजावणी, कंत्राटी-कामगार/कर्मचारी पद्धत नांवाच्या नव्या ‘गुलामगिरीचं व अस्पृश्यतेचं’ उच्चाटन, जैविक-शेतीचा आग्रह व शेतीमालाला उत्पादन खर्चाधारित हमीभाव, मक्तेदारी उद्योगांवर नियंत्रण प्रस्थापित करुन त्यांचं राष्ट्रीयीकरण, शिक्षण-आरोग्यसेवेचं मोठ्याप्रमाणावर राष्ट्रीयीकरण व भ्रष्टाचार-निर्मुलनासाठी ‘अर्थक्रांती-संकल्पना’ राबविणे व ‘जन-लोकपाल’सारखे कठोर विधेयक आणणे, ‘महामानवा’च्या संदेशाप्रमाणे देशातल्या समृद्धीचं न्याय्य-वाटप करणे( आज, देशातले केवळ ६% गुजराथी, देशातील ६०% संपत्तीचे धनी आहेत…. त्यावर कधि नरेंद्र मोदी बोलण्याची हिंमत करणार ?), भ्रष्टाचाराचं मूळ असलेली निवडणूक-पद्धत आमूलाग्र बदलून त्यातील ‘मनी, मसल आणि मिडीया’चा घातक प्रभाव रोखणं, पर्यावरणाला हानिकारक उद्योगांवर अंकुश प्रस्थापित करणं…. यासारख्या मुलभूत विषयांवर मूग गिळून गप्प बसणार असू; तर मग, या देशाचं आणि भावी पिढ्यांचं ईश्वरचं रक्षण करो !!!

….. राजन राजे(अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)