कृष्ण, हा परिपूर्ण ‘अवतार’ की, सर्व वर्णांचा भ्रतार अन् विश्वव्यापी मानवधर्माचा प्रसार…???
ज्याच्या जन्माआधी, जन्मापासून आणि पुढे संपूर्ण बाल्यावस्थेत…त्याचा अंत घडवण्यासाठी शत्रूपक्ष दबा धरुन बसलेला असावा…शिशुपाल, दुर्योधन, दुःशासन, कंस, पौंड्रक आदी त्याला अवचित गाठून अवमानित करण्याची एकही संधि सोडीत नसावेत; तरीही, ज्याच्या बासरीवर जीवनसंगीताचे अलौकिक सूर छेडले जात रहावेत…सर्वांना आपल्या अनुपम प्रेमरसात न्हाऊमाखू घालीत, अवघा भवताल ज्याच्या प्रेमरसात आकण्ठ बुडून जात रहावा…सान्निध्यात येणाऱ्या हरेक जीवमात्राच्या अंतरी, ज्याच्या […]









