“कोण कोणासोबत जाईल, हे सांगणं खूप कठीण आहे”, या बहेनजींच्या उद्गारानंतरचा ‘मायावती इफेक्ट’, काय चमत्काराची ‘राजकीय-नौटंकी’ घडवू शकतो; ते जरा पहाच…

‘स्वप्नात हत्ती दिसणं’, हे सर्वसाधारणपणे भारतीय जनमानसात ऐश्वर्यसंपन्नता-सत्तावैभव, याचं निदर्शक मानलं जातं. मात्र, वरील ‘मायावी’ उद्गारांमुळे, ‘बसपा’चा ‘हत्ती’ मोदी-शहांच्या स्वप्नात येऊ लागलाय…मात्र, तो आलाय, २०२४ च्या लोकसभा-निवडणुकीसंदर्भात सत्तावैभवाच्या शकुनाऐवजी, एक अपशकून बनूनच!

…तिथून पुढे घडलेला, ताजा घटनाक्रम पाहिला की, एखाद्या सुजाण-सज्जन भारतीय नागरिकाच्या मनात-अंतःकरणात एकतर संतापाची तिडीक जावी किंवा त्याच्यावर, स्वतःच्याच कपाळावर हात मारुन घेण्याची वेळ यावी.

तो घटनाक्रम असा,

** मोदी-शहांविषयी भयंकर अपशब्द उच्चारणार्‍या उ. प्रदेशच्या ‘ओमप्रकाश राजभर’ आणि रामाविषयी अश्लाघ्य भाषेत सतत गरळ ओकणाऱ्या ‘संजय निषादां’पुढे भाजपाच्या ‘गुजराथी-लाॅबी’ने सपशेल गुडघे टेकलेत.

** अयोध्या आंतरराष्ट्रीय-विमानतळाला नाव रामाचं नव्हे, सीतेचंही नव्हे आणि कर्नाटक-विधानसभा निवडणुकीत, ज्याच्या नावाचा बेकायदेशीररित्या निवडणूक-प्रचारात मोदींतर्फे सर्रास गैरवापर करण्यात आला होता; त्या ‘बजरंगबली हनुमाना’चंही नव्हे… तर, महर्षी ‘वाल्मिकीं’चं (उ. प्रदेशात जवळपास दिडदोन कोटींच्या आसपास वाल्मिकी-समाज आहे म्हणूनच) ठेवण्यात आलंय.

** ‘दिल्ली ते अयोध्या’ पहिल्या विमान-उड्डाणात, ‘भगव्या’ दुपट्ट्यात ‘हनुमान-चालिसा’चं पठण चालू होतं…तर, साधारण त्याचवेळेस पं. नरेंद्र मोदीचं उ. प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वागत करत होते; तेव्हा, मोदीजी ‘भगव्या’ ऐवजी चक्क ‘निळा पट्टा’ गळ्यात मिरवत होते आणि तद्नंतर, पंतप्रधान कुठे चहापान करायला खास गेले… तर ते, अतिदलित निषाद परिवाराच्या धनीराम मांझी यांच्याकडे!

भारतीय-राजकारणाला पडलेला विखारी जातधर्मीय विळखा सुटणार कधि आणि ही प्रच्छन्न ‘राजकीय-नौटंकी’ व त्या नौटंकीच्या पडद्याआडून, सुरु असलेलं सर्वसामान्य जनतेचं अपरिमित शोषण-दमन व अन्याय-अत्याचारांची मालिका, थांबणार तरी कधि…???

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)