“नाईट लाईफ… लाईफ साईझ, फूल टू”

तसंही, दररोज रात्री हाडकुळ्या, कुपोषणग्रस्त १० बाय १० खोलीच्या सर्वसामान्य घरातल्या, ‘घुसमटणारा श्वास’ उशाशी घेऊन झोपणा-या मराठी मुलां’चं ‘नाईट लाईफ’, ‘२४ x ७ अस्वस्थ झोपे’चचं असतं. उद्याचा दिवस कसा असेलं, तुटपुंज्या पगाराची नोकरी टिकेल की टिकणार नाही, ही, असुरक्षिततेची टांगती तलवार डोक्यावर घेऊन झोपणा-या, त्यांच्या पालकांची झोपही काही फार सुखेनैव नसतेच… त्यादृष्टीनं ते ही, २४ x ७ ‘नाईट लाईफ जगतचं असतात ( फक्त, ते नाईट लाईफ’ असुरक्षिततेच्या भयानं ग्रस्त असतं, चंगळवादी मौजमस्तीचं नसतं…. !!! )

“मग, मुंबईतलं २४ x ७ ‘नाईट लाईफ’, नेमकं कुणासाठी???”

जवळ जवळ ५० वर्ष होत आली… ठाण्या-मुंबईच्या सामान्य घरातल्या राठ त्वचेच्या मराठी मुलांच्या हाती (उच्च मध्यमवर्गीय गोंडस व नाजुकसाजुक बाळांच्या हाती नव्हे !), ‘दगड’ दिला गेला; तो, अजुनही त्यांच्या हातात आहे…. पण ज्यांनी तो दिला, ते समृद्धीचे गड’ बांधते झाले….. तोच, राजकीय ‘फंडा’ आजही ब-यापैकी राजकारणाच्या बाजारात खपतोयचं की, मग तक्रार कसली? ती तशीचं मेंढरं…. हाकण्याची रित तिचं…. “मुकी बिचारी कुणीही हाका, अशी मेंढरं बनू नका”, सांगणारे थकले; काही वर गेले…. पण, ऐकणारे थबकले कुठे?… त्यांची, तिच ती चिरपरिचित, पाय ओढत चालणारी ‘गुलामी चाल’ चारपाच दशकं ओलांडून चालूच राहिलीयं… तंत्रज्ञान कितीही नवं आलं तरी !

पहिल्यांदा हातात ‘दगड, मग भिका-यांसारखी हातात, देवीदेवांच्या सणउत्सवांची सार्वजनिक गणेशोत्सव-सत्यनारायण महापूजा-दहीहंड्यांची वर्गणी-पुस्तकं अभ्यासाची वहयापुस्तकं (हल्ली लॅपटॉप वगैरे….) हाती घेण्याऐवजी वर्गणी-पुस्तकं हाती घेऊन, मराठी तरुणाईनं मागायची भिक कुठे, तर त्या ‘गुजराथी-मारवाडी शेठर्जी कडेच, जे आयुष्यभर, शंभर नव्हे हजारो-लाखो पटीनं आपल्याच लुटीतून त्याची वसूली करत आले, वसूली करत जाणार……

त्याला, सबळ व सांस्कृतिक कारण आहेच की त्या नाईट लाईफ’च्या पुरस्कर्त्यांचं….ऐकूया तर त्यांचं म्हणणं (आपलं तुणतुणं बाजूला ठेऊन) “ऐतखाऊंच्या चंगळवादी जीवनशैली”चा विस्तार नको का व्हायला धिंगाणा रात्रभर नको चालायला??? ….म्हणे, मराठी मुलं बिघडलीयतं, त्यांना फूल टू ‘नाईट लाईफ’चा चकवा दाखवून अजून बिघडवू नका म्हणतात आम्हाला….. अहो, शेवटी ‘चकवा’च तो. प्रॉब्लेम त्यांचा आहे. आमचा फंडा समजून घेण्यात तेच नाही का कमी पडतं? सोडा हो, त्या शिळ्यापाक्या “मराठी संस्कृति” च्या गप्पा…. कोण कुठले ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव त्यांची एक्स्पायरी डेट केव्हाच उलटली…. आता काय अजून ‘पसायदान’ गात बसायचं का? काळजी नको, शेवटी राजकारणात आहोत ना, तेव्हा तोंडी लावायला, ‘शिवछत्रपती कोपराभर अंतरावर असतातच लाखोंचे कळप बाळगणारे आधुनिक संतमहात्मे तर असतातच असतात, आमच्या दिमतीला अहो, खास आमच्या १% वर्गाची ही एवढी विलासी ‘चंगळ’ विघ्नाविना अबाधित चालू ठेवण्यासाठी, त्या नाही रेंना अफूची मात्रा पाजून शांत ठेवणारे, तसे भरभक्कम हात नकोत सेवेशी ??? कल का ‘शायनिंग इंडिया, आज का मेक इन इंडिया तभीच तो चलेगा ना !

चाहे कुछ भी हो, …दोनचार जागले ढगात गेले काय नी व्हेंटीलेटरवर गेले काय असल्या ‘चंगळवादा’च्या यज्ञात दोनचार समिधा जाणारच की हो… वाचल्याचं आठवतं म्हणून सांगायचं, तुमचे आमचे ऋषिमुनी नाय का, काहीतरी अर्पणतर्पण करायचे… यज्ञात! “ आता मात्र प्रश्न सुटल्यासारखा वाटतो, तरीही उरतोच, “‘मुंबईतलं २४x७ नाईट लाईफ’, नेमकं कुणासाठी ???”

जय महाराष्ट्र । जय हिंद ।।

राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)