“गव्हाच्या पीठाच्या ‘पुर्‍या’ करुन तळणं… याचा अर्थ, गव्हाच्या पीठातील ‘पौष्टिक’ता नष्ट करुन सौम्य ‘विष’ तयार करणं”……. इति म. गांधी

मोहनदास करमचंद गांधी, हे व्यक्तिमत्त्व यासाठी जगात ‘महान’ आणि तो यासाठी ‘महात्मा’…. कारण, अलिकडच्या काळातील हा एकमेव भारतीय, ज्याची ‘प्रज्ञा’ जगण्याच्या सगळ्याच संदर्भांच्या ‘आसा’ला भिडलेली होती ! …….अध्यात्म, समाजकारण, राजकारण, शाश्वत स्वरुपाची निसर्ग-पर्यावरणस्नेही जीवनशैली-अर्थशास्त्र-विकासाचं प्रारूप, ‘ग्राहको देवो भव’ मानणारी उद्योग-व्यापार नीति, शाश्वत नैसर्गिक-शेती, निसर्गोपचार, ‘रामराज्य, अंत्योदय, अस्पृश्यता-निर्मूलन, अहिंसा, मौनव्रता”‘चा पुरस्कार, ‘पहने सो कांते और कांते सो पहने’ असं उच्चारण करत बौद्धिक-संपदेपेक्षाही शारीरिक-श्रमाला प्राधान्य व प्रतिष्ठा देत ‘खेड्याकडे चला’ असा पिढ्यापिढ्यांच्या शाश्वत-हिताचा पुकारा व तद्नुरुप शिक्षण-व्यवस्था, …….इथपासून ते थेट, आपल्या ‘अन्नाच्या थाळी’ पर्यंत, या ‘महात्म्या’ची ‘प्रज्ञा’ सर्वंकष मुक्त-संचार करत ‘अंतिम-सत्या’ला हात घालताना दिसते !

…….त्याकाळात, आधुनिक-प्रयोगशाळा उपलब्ध नसतानाही, कसं कळलं या ‘महात्म्या’ला की, तेलात 350° सेंटिग्रेडपर्यंत तळलेल्या पदार्थांमध्ये, ‘हृदयविकारा’ला आमंत्रण देणारी व ‘कर्करोगजन्य-ऑक्सिडंट्स्’ वैपुल्याने असणारी ‘ट्रान्सफॅट्स्’ (Trans-Fats) तयार होतात म्हणून ??? ….. म्हणूनच, आजवरचा जगातला सर्वात महान शास्त्रज्ञ ‘अल्बर्ट आईनस्टाईन’ म्हणून गेला होता की, “पुढील पिढ्यांना कदाचित यावर विश्वासही बसू शकणार नाही…. की, असा एक ‘महात्मा’ या पृथ्वीतलावर होऊन गेला होता !”

…राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)