‘वाढदिवस’ हा फक्त एक गोड ‘योगायोग’ आहे..!

सार्वजनिक सण-उत्सव-पूजा-पार्टीसंस्कृति यांच्या प्रचंड भाऊगर्दीमुळे, आधीच ‘ग्लानी’त गेलेला सामान्य ‘मराठी माणूस’, वाढदिवसांच्या ‘वाढीव’ सुळसुळाटामुळे, आकण्ठ ग्लानीत बुडून गुलामगिरी भोगू लागलायं. मराठी घरातली ‘आवक’ फारशी वाढायला तयार नाही…. पण, ‘जावकी’त मात्र, वाढदिवसाच्या खर्चाची नवी भर पडत, जैन-गुज्जू-मारवाडी व्यापाऱ्यांचं (तुम्हाला ‘नादी’ लावून), अधिकचं चांगभलं होताना दिसतयं. अशा फाजील उत्सवप्रियतेमुळे सण-उत्सव काळात, लक्ष्मीच्या पाऊलखुणा उलट्या पडताना दिसू लागल्यात…. तुमच्या मराठी घरातून बाहेर पडून, त्या या ‘शेठजी-संस्कृति’’कडे वळलेल्या, अशा प्रसंगी स्पष्टच दिसतात. एकाने काही ‘साजरं’ केलं की, अनेकांना ती खर्चिक ‘लागण’ लागते आणि मग, तो ‘सिलसिला’ मराठी-खिशाचा ‘खळखुळा’ केल्याखेरीज थांबत नाही! तेव्हा, महापुरुषांखेरीज इतर कुठल्याही व्यक्तिचा ‘वाढदिवस’ साजरा करणं नको… संस्थेचा किंवा गाजवलेल्या मोठ्या कर्तृत्त्वाचाच फक्त वाढदिवस फारतर साजरा केला जावा.

सोशल-मिडीयावरचा देखील ‘वाढदिवस-प्रपंच’ (अनेकांचा वेळ व संसाधनं वाया दवडणारा… जे, मराठी माणसाला आता परवडणारं नव्हे!) पूर्णतया टाळून, घराच्या चार भिंतींतच व्यक्तिगत वाढदिवसांचं ‘लोण’ मर्यादित रहावं आणि तेही, शक्यतोवर ‘पाच वर्षां’च्या लहान मुलांपर्यंत किंवा शंभरी गाठलेल्या ज्येष्ठांपर्यंतच (त्यात, तब्येत चांगली सांभाळून शंभरी गाठण्याचं ‘कर्तृत्त्व’ आहे म्हणून आणि आजच्या योग-प्राणायाम-व्यायामाकडे साफ दुर्लक्ष करणाऱ्या व्यसनी-छंदीफंदी-’जंकफूड’वाल्या, तब्येतीनं खचत चाललेल्या मराठीतरुणपिढीला आरोग्यरक्षणाचा चांगला ‘संदेश’ मिळू शकतो म्हणूनही!); कारण, सरतेशेवटी, ‘वाढदिवस’ हा फक्त एक गोड ‘योगायोग’ आहे… त्यात, आपल्या ‘कर्तृत्त्वा’चा काही संबंध नाही.

आपल्या हातातून निसटून जात चाललेला… आपल्या पिढीजात हक्काचा, आपल्या मराठी बापजाद्यांचा, ‘शिवछत्रपतीं’नी मर्दुमकी गाजवून आपल्या तळहातावर ठेवलेला…. ‘महाराष्ट्र’, वाचवण्यासाठी ‘योगायोगा’ची नव्हे; तर आता, ‘धर्मराज्य पक्षा’च्या नेतृत्त्वात, सामूहिक ‘राजकिय-कर्तृत्त्वा’ची नितांत गरज आहे… म्हणून, आपला वेळ, आपली उरलीसुरली संसाधनं इतरत्र ‘न’ गुंतवता, ‘महाराष्ट्र’ वाचवण्याकामी लागू द्या….!!! “

धन्यवाद…..

जय महाराष्ट्र । जय हिंद ।।

…….राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)