‘मराठा’ तितुका मेळवावा… ‘महाराष्ट्र धर्म’ वाढवावा!!!”


ही कहाणी आहे, ‘महाराष्ट्रनांवाच्या, आटपाट नगरीतील मराठा समाजाची…. ज्या, समाजानं प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता…” असा या, महाराष्ट्राच्या लालकाळ्या मातीला शककर्ताराजा दिला, त्या समाजावरच पौर्णिमा ते अमावस्या” अशी पीछेहाटीची अवदसा ओढवलीच कशी ???


बायबलमध्ये लिहून ठेवलयं, “जेव्हा एखाद झाड… कुठल्या प्रकारचं, कुठल्या प्रतीचं आहे, हे तपासायचं असतं, तेव्हा इतर काही धडपड न करता, थेट त्या झाडाची वृक्षाची फळंफुलं तपासून पहायची, बस्स !” वर्ष १९७० नंतर, महाराष्ट्रात ज्या राजकारणाचं रोपटं लावलं गेलं, त्याचं आता वृक्षात रुपांतर झालयं…. त्याची प्रत काय, त्याचा प्रकार काय, हे तपासून पहायचं; तर त्याला लगडलेली फळफुलं. म्हणजेच, आजची सर्वसामान्य मराठी माणसांची अवस्था”, जरा तपासून पहायला हवी. आपल्याच जमिनीवर, आपल्याच हवेत, आपल्याच पाण्यात… जी, मराठीमाणसाची जगण्याची संपूर्ण कोंडी झालेली दिसते, ती पाहिल्यावर सहजी ध्यानात येतं की, ते झाड, तो वृक्ष… स्वादिष्ट-पोषक फळंफुलं देणारा नसून, ४५-५० वर्षापूर्वी महाराष्ट्रात जे राजकारणाचं लावलं गेलं, ते रोपटं विषारी होतं… सामान्य मराठी माणसासाठी ज्याचं रुपांतर, आता विषवृक्षात झालयं ! १९७० सालापर्यंत महाराष्ट्राचं राजकारण बऱ्यापैकी सकस, प्रामाणिक व शुद्ध होतं…. मग, महाराष्ट्रात वर्ष १९७० नंतर हे, राजकारणाचं विषारी रोपटं लावणारे दगाबाज-घरभेदे हात, कुठल्या घराणेबाज राजकारण्यांचे होते ?

आपली एक मराठी म्हणं आहे…. “हातच्या कंकणाला आरसा कशाला!” एखाद्या विवक्षित समाजावर अधिराज्य गाजवणारं ‘राजकीय नेतृत्त्व’ नेमकं कसं आहे… कुठल्या लायकीचं आहे किंवा होतं, हे तपासायला इतिहासातसुद्धा फार डोकावून पहायची वा संशोधन करण्याची फारशी गरज नाही…. सरळ सरळ, त्या समाजाची सांप्रतची “सामाजिक, राजकीय व आर्थिक स्थिती तपासून पहायची”, बस्स् ! आज महाराष्ट्रभर सर्वत्र, पावलोपावली सर्वसामान्य मराठी माणसाची सर्वदूर झालेली ‘कोंडी’ सहजी कुणालाही दिसते…. हसताखेळता महाराष्ट्र, त्याचं हसणचं कुठेतरी विसरुन गेलायं… हसणं त्याचं जणू विरुन, विझून गेलयं आणि कधिही न संपणारं ‘कण्हणं’ त्याच्या ललाटी, त्यानं आजवर डोक्यावर घेतलेल्या दळभद्री ‘राजकीय नेतृत्वा’च्या ‘सटवी’नं लिहीलेलं दिसतयं !!!

“मोंगलांच्या अन्याय, अत्याचार व लुटीची सुयोग्य भरपाई म्हणून मोंगलांची (आज गुजरातची) ‘सूरत’ शिवछत्रपतींनी एकदा नव्हे, दोनदा लुटली… पण, सर्वपक्षीय दलाल मराठी-राजकारण्यांच्या साथीनं आजवर धनदांडगे-मुजोर गुर्जर-मारवाडीभाई जणू, त्या ‘सूरत’ लुटीचा बदला म्हणून, जो अवघा महाराष्ट्र लुटत राहीलेतं…. त्याला अंत नाही (मनात शिवछत्रपतींविषयी मोठा आकस; पण, महाराष्ट्राच्या निवडणुकीपुरता ‘शिवछत्रपतींचा आशिर्वाद’ त्यांना हवा असतो)! ते पाहूनच, एखादा गुलजार सारखा संवेदनशील कवी ‘अमराठी’ असूनही लिहून जातो, “कोण खाणार, कोणाचा हा वाटा… दाण्यादाण्यावर लिहिलंय नांव, ‘शेठ सूरचंद मूलचंद जेठा’ !”

जेव्हा, खुज्या उंचीच्या भ्रष्ट, संधिसाधू, स्वार्थी व घराणेबाज राजकारण्यांच्या लांबच लांब सावल्या महाराष्ट्राच्या राजकीय कॅनव्हासवर पसरायला लागल्या. पाच-साडेपाच फूट उंचीच्या, या ‘राजकीय व्यक्तिमत्वां’च्या ‘अहंकारां’च्या उंची, त्या संधिप्रकाशात पाचशे-साडेपाचशे फूट दिसायला लागल्या…. तेव्हाच, मराठी अस्मितेचा, मराठी अस्तित्वाचा, मराठी संस्कृतीचा आणि एकूणच महाराष्ट्रातल्या ‘मराठीपणा’चा ‘सूर्यास्त’ जवळ आल्याची लक्षणं दिसू लागली होती. पण, ‘जागृतते’चा लवलेश नसलेले, उघडे मराठी डोळे त्या ‘सूर्यास्ता’ची काळोखी चाहूल टिपण्यास असमर्थ ठरले! ज्यावेळेस महाराष्ट्रात प्रदूषण व कार्बनकेंद्री विकासाचा उष:काल होत होता, त्याच वेळेस सर्वसामान्य मराठी माणसासाठी महाराष्ट्रात काळरात्रीची पेरणी होत होती…!!! वर्ष-१९७० नंतर, जसा काळ पुढे पुढे सरकत गेला; तशी त्या काळासोबत केवळ, महाराष्ट्राच्या लालकाळ्या मातीचीच ‘धूप’ झाली असं नव्हे; तर, गेल्या चार-पाच दशकांत, ‘मराठा’ आणि ‘मराठी’ राजकारणी नांवाच्या ‘गवतातल्या सापांच्या, महाराष्ट्रभर वळवळण्यामुळे टप्प्याटप्प्यानं मराठी माणसाची आर्थिक व नैतिक अशी दुहेरी प्रचंड ‘धूप’ झालीयं. चांगल्याला चांगलं म्हणण्याची ‘दानत’ आणि वाईटाला वाईट म्हणण्याची ‘हिंमत’ तो गमावून तर बसलेला नाही ना, इतकी वाईट अवस्था निर्माण झालीयं… मराठी माणसाची ‘समज’ त्यामुळेच, एवढी उतरणीला लागलीयं की, त्याला संपूर्ण  ‘रामायण’ सांगितलं, तरी तो अखेरीस विचारतो की, “रामाची सीता कोण” ?

मराठी माणसाला… आपल्या जातीजमातीचे नेते, आरक्षण किंवा अॅट्रॉसिटीसारखा कायदा… आपल्यासाठी, संरक्षणाचं कवचकिंवा ढालवाटते. पण, “शिक्षण-आरोग्यसेवेचं राष्ट्रीयीकरण, शेतमालाचे रास्त हमीभाव, कंत्राटी कामगार/कर्मचारी प्रथेचं निर्मूलन, लोकसंख्या नियंत्रण किंवा जनलोकपालवा अर्थक्रांतीसारखी विधेयकं… त्याला संरक्षणाची ढाल-कवचवाटत नाहीत. एवढच नव्हे, तर जमिनीचा ‘सातबारा’ व सेंद्रिय शेती किंवा नोकरीत चांगला पगार व बऱ्यापैकी सुरक्षितता, याबाबत तो बेफिकीर राहतो… हे मराठी-तरुणाईचं दुर्दैव आहे” !

जे, आपल्यासाठी आजवर गेली चारपाच दशके, मराठा-राजकारण्यांनी पेरलं, तेच आज उगवून सामोरं आलयं, त्यामुळेच आजवर बेसावध असलेलं अवघं ‘मराठा भावविश्व’ समूळ हादरलयं ! “जेम्स् लेनकृत शिवरायविरोधी लिखाण… ब. मो. पुरंदरे यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान ते, वहातूक हवालदार विलास शिंदे यांची निर्घृण हत्या”, असा मराठा-अस्वस्थतेचा दीर्घ प्रवास आहे. त्या आगीत अॅट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराच्या जागोजागीच्या उदाहरणांनी वेळोवेळी ‘तेल’ ओतलं जातच होतं; पण, ‘सैराट’ सिनेमाच्या मधल्या पडावानंतर दुखावलेल्या मराठा-समाजाच्या असंतोषाच्या उंटाच्या पाठीवरील शेवटची काडी ठरली ती, कोपर्डी घटना…. आणि, हा असंतोषाचा उंट, त्या काडीच्या वजनाने जागीच बसण्याऐवजी; पर्याय संपल्यागत अगतिक होऊन ‘क्रांतिमोर्चा… महामोर्चा’ची वाट चालू लागला… ती, संपूर्ण महाराष्ट्रात… सर्वभर!

‘घरचे’ दलाल-दगाबाज निघाले म्हणून, हे असे ‘मोर्चे’ काढायची वेळ आलीयं की, अजून काही……… ‘अथ पासून इति’ पर्यंत, मराठ्यांची ही कहाणी, … मराठी माणसाच्या अंतिम-कल्याणासाठी गेल्या पस्तीस वर्षांहून अधिककाळ धडपडणाऱ्या, एका अवलियाच्या ज्वलंत लेखणीतून उतरलीयं… ज्याला मराठी-माणूस, कुणा कुणाच्या ‘नादी’ लागत, निवडणुकीच्या राजकारणात आजवर नाकारत आलायं….. अवमानित करत आलायं… तरी जो थांबला नाही… थकला नाही, तो “राजन राजे”! कारण, एकच… श्रीकृष्णाची “कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन”, ही ‘जीवनप्रेरणा’ छातीवर गोंदवलेली आणि शिवछत्रपतींची ‘राजनीति’ रक्तात नोंदवलेली… म्हणूनच केवळ !!

“बोले तैसा चाले”, अशा सघन वृत्तीचा हा ‘अवलिया’ जेव्हा म्हणतो ना की, “राजकारणात आम्ही ‘कमवायला’ नव्हे; तर, ‘गमवायला’ आलोयं…. आम्ही ‘मिशन’ म्हणून काम करतो ‘कमिशन’ म्हणून नव्हे”, तेव्हा, त्याला फार मोठा अर्थ असतो…. पण, तो समजून घेतला तरच!

सध्या परिस्थिती एवढी बिघडत चाललीयं की, मराठीमाणसांच्या चिमटीतून झपाट्यानं महाराष्ट्रनिसटतोयं… तो पूर्ण निसटून गेल्यावर अश्रू ढाळायला कोपरासुद्धा त्याच्यासाठी महाराष्ट्रात शिल्लक रहाणार नाही….

तेव्हा सारांशानं, “मराठ्यांनी भले भरडले आणि खोटे कंठी धरले, …म्हणोनिया, अजी आज तयांचे प्राण कंठासी आले” !!!

…… सत्याला भिडण्याची छाती असणाऱ्या प्रत्येक ‘छाव्या’नं, प्रत्येक मावळ्या’नं, प्रत्येक ‘हिरकणी’नं आणि हो, प्रत्येक भीमसैनिकानंही निदान, एकदा तरी वाचलीच पाहीजे…. इतरांना वाचायला सांगितलीच पाहीजे अशी, “मराठी रक्ताच्या थेंबाथेंबातून, वैचारिक स्फुल्लिगांची फुलझडी लावणारी कहाणी…. कहाणी तुमची, आमची सर्वांची… सर्व मराठी जातीपातींची… महाराष्ट्राच्या लालकाळ्या मातीतल्या सर्वसामान्य मराठी-माणसांची!”

संपादकीय मंडळ


संपादन व संयोजन… महेशसिंग ठाकूर, जयेंद्र जोग, संजय दळवी, अण्णा साळुंखे, रमाकांत नेवरेकर, राजेश गडकर, विनोद मोरे, गौतम बस्ते, सिद्धेश सावंत, रत्नदिप कांबळे, दिनेश खोल्लम, स्वप्नाली पवार, साक्षी शिंदे


मित्रहो,

याक्षणी, माझ्या नजरेसमोर फक्त महाराष्ट्र आहे… महाराष्ट्रातील मराठी माणूस आहे…. काय चूक आहे त्यात ? जेव्हा माझा मराठा ‘मावळा’, माझी मराठा ‘हिरकणी, आपल्या स्वतः च्याच हक्काच्या मराठमोळ्या मातीत, जगण्याच्या ‘कोंडी’ विरुद्ध अस्तित्वाचा लढा देतायत, तेव्हा आपण कसल्या भारतीयत्वाच्या गप्पा मारतोयं ??? भारत आजही, एक राष्ट्रनसून, स्थानिक भाषिक-अस्मितांवर व संस्कृतिंवर आधारित अनेक राष्ट्रकांचा समूह मात्र आहे. खरंतर, “मराठीत्व हेच, राष्ट्रीयत्व” ! पण, या देशातल्या रक्तपिपासू शोषक व्यवस्थेच्या (Vampire-State System) सोयीसाठी भारतीयत्वाचं अवडंबर माजवून, आजवर त्याचं सर्वात जास्त ओझं लादलं गेलं, ते या शिवबांच्या महाराष्ट्रावर… महाराष्ट्रातल्या मराठीमाणसांवर!

जैन-गुज्जू मारवाड्यांच्या अफाट व अचाट धनसंपदेची राक्षसी ताकद आणि उत्तरभारतीयांच्या महाप्रचंड लोकसंख्येचा जीवघेणा दबाव…. या दोहोंच्या कात्रीत सापडून महाराष्ट्रातला अवघा ‘मराठी माणूस’चं उध्वस्तीकरणाकडे वाटचाल करतोयं. त्या, उध्वस्तीकरणाला सर्व प्रस्थापित राजकारणीवर्गाची व नोकरशाहीची ‘दलाली’ साथ आहे….. म्हणूनच, “माझ्या मराठा तरुणाईला, माझ्या ‘छोट्या राजे शिवाजी’, ‘छोटे संभाजी’ आणि ‘छोट्या जिजाऊं’ ना…. हातात क्रांतिची मशाल घेऊन आज ‘महामोर्चे’ काढावे लागतायतं….”

“एक मराठा, लाख मराठा”. या घोषवाक्यावर ही नवी पंढरीची वाटचालणारी तरुणाई खरंतर, “ना मातीसाठी… ना जातीसाठी… ती रस्त्यावर उतरलीयं, ती आपल्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी!

फक्त एवढचं आहे की, त्याला एकूण राजकीय परिस्थिती पाहता, जातीचं ‘चुंबकीय’ परिमाण लाभणं, साहजिकच आहे… “आपल्याकडील, लाखोंचे मोर्चे जमवून शासन-प्रशासनावर दडपण-दबाव आणण्याच्या व आपल्या समाजाचा वरकरणी कार्यभाग साधून घेण्याच्या राजकारणात बोकाळलेल्या अनिष्ट प्रवृत्तींना, हा दिला गेलेला ‘इशारा’ असेल; तर, ‘मराठा क्रांतिमोर्चे’ आपण निश्चितच सहानुभूतीने समजावून घ्यायला हवेत!”

म्हणूनच “एक मराठा, लाख मराठा…. धर्म मराठा, कर्म मराठा”, अशा लाखोंच्या युवाशक्तिचा, विशेषतः त्यातल्या महिलाशक्तिचा, पूर्ण आदर राखून व मनःपूत कौतुक करुन, त्यांच्या मनातील जी प्रस्थापित विरुद्ध विस्थापित’ अशी खदखद आहे; त्याला ‘धर्मराज्य पक्षा’ तर्फे मी ‘सलाम’ करतो आणि महाराष्ट्राच्याच ‘कॅनव्हास’ पुरती, या संपूर्ण ‘न भूतो’ अशा जनआंदोलनाची कारणमीमांसा व त्यावरील उपाययोजनांची चर्चा, या ‘महालेखा’ द्वारे आपल्या साथीनं करतो…. तेव्हा सुरु करुया, ‘महामोर्चाची महाचर्चा’ !!!

मित्रहो, “साध्या रस्ता रोकोला पाचपन्नास पोलिस असतात. पण, या लाखोंच्या ‘मराठा मूक मोर्चा’ त पोलिस, एसआरपी तुलनेनं फारसे दिसत नव्हते.. अत्यंत शिस्तबद्ध, ना नारे, ना घोषणाबाजी… जणू ती, मराठ्यांची ‘पंढरीची वारी’च! रक्तातच सुसंस्कृतिची पेरणी झाल्यागत, आपल्या ‘मूक आक्रंदना’ला मोकळं होऊ देत, महामोर्चाची विराट पाऊले, भले आज फक्त काही विशिष्ट मागण्यांचे फलक हाती घेऊन जिल्हावार वाट चालत असतील; पण, उद्या संपूर्ण ‘व्यवस्था बदला’च्या एका नव्या पंढरीची वाट ती चालतील, अशी आशा करायला खूप वाव आहे!”

ढोबळमानाने, या मराठा महामोर्चा’ मधून केल्या जाणाऱ्या मागण्या पुढीलप्रमाणे अशा …..

  • कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना सत्वर फाशीची शिक्षा व्हावी
  • गैरवापर होत असलेल्या जाचक अॅट्रॉसिटी- कायद्यात बदल व्हावा
  • मराठ्यांना शैक्षणिक व शासकीय नोकरीत किमान १६% आरक्षणमिळावं
  • स्वामिनाथन समितीच्या शिफारशीप्रमाणे शेतम लाला उत्पादन खर्च अधिक ५०% नफा, एवढा रास्त बाजार हमीभाव मिळावा
  • मुंबईच्या समुद्रतटावरील शिवछत्रपतींचं भव्य स्मारक लवकरात लवकर व्हावं

…..या वरील प्रमुख पाच मागण्यांपैकी, पहिल्या दोन मागण्यांसंदर्भात राजकारणात थोडाबहुत तरी विवेक, विचार व संवेदना शिल्लक असलेल्या कुठल्याही राजकीय शक्तींकडून ‘विरोध’ होऊ नये ( यासंदर्भात, अॅड. प्रकाश आंबेडकर, अॅड. सुरेश माने यांनी सुरुवातीपासूनच योग्य व संयत भूमिका घेतलेली आहे आणि सुरुवातीला जरी अनवधानाने का होईना; पण, केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी “जयभीम के नारे पे, खून बहता है तो बहने दो”, अशी घेतलेली आक्रस्ताळी भूमिका, वेळीच मागे घेऊन समजूतदारपणा दाखवल्यानं, तोही वाद आता मिटलेला आहे). कोपर्डी प्रकरणात नुकतचं सरकारी पक्षातर्फे भरभक्कम आरोपपत्र कोर्टात दाखल झालेलं असल्यानं, आता त्याचा आरोपींना फाशीसारखी सजा होण्याचा ‘तार्किक शेवट’ लवकरात लवकर घडून येईल, अशी सुस्पष्ट लक्षणे दिसतायतं.

पाचवी मागणी (जी पुढे थोडी मागे पडली, हे एका अर्थी चांगलच झालं) ही शिवछत्रपतींच्या स्मारकाबद्दल असल्यामुळे, त्यासंदर्भात थोडं बोलावं लागेलं….

आपल्या देशात कुठल्याही महापुरुषाचं ‘स्मारक’, हे ‘प्रेरक’ वा ‘तारक’ न ठरता ‘मारक’ ठरत आलेलं आहे…. हा आपला अलिकडचा राजकीय इतिहास आहे. महापुरुषांच्या पुतळ्यांच्या कथित अवमानावरुन वेळोवेळी झालेल्या किंवा घडवून आणलेल्या जातीय दंगली, ही त्याची साक्ष आहे.

“शिवछत्रपतींचे पुतळे उभे करायचे आणि कारभार औरंजेबाचा करायचा….. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे उभे करायचे आणि कारभार ‘कंत्राटी कामगार/कर्मचारी पद्धत’ नांवाची ‘नव-अस्पृश्यता’ रुजवणाऱ्या ‘दुकानदारसाहेबां’चा करायचा”, हे आपल्या देशातलं घृणास्पद व किळसवाणं राजकारण आहे ! शिवाय, महापुरुषांवर प्राणापलिकडे प्रेम करणाऱ्या व श्रद्धा बाळगणाऱ्या साध्याभोळ्या बहुजन जनतेला, असे पुतळे किंवा स्मारके उभी करुन, ग्लानीत आणि गुंगीत ठेवणं, बदमाष राजकारण्यांना सहजसाध्य होतं व त्यांचे जगण्याचे मूलभूत प्रश्न पिढ्यानपिढ्या लोंबकळत ठेवणंही शक्य होतं… त्याद्वारे, राजकीय व्यवस्था सर्वसामान्यांची सुखेनैव लुटमार करत रहाते. त्यामुळेच, निवडणुकीत राजकीय भाषण करण्यापुरता फक्त, “सामन्य माणूस हा ‘विकासाचा केंद्रबिंदू असतो…. पण, तो व्यवहारतः प्रत्यक्षात ‘लुटालुटी’चा केंद्रबिंदू असतो!”

आपण, हे सोयिस्कररित्या विसरतो की, “महापुरुषांना कधिही कोणी आपली पूजा करावी वा देवत्व बहाल करावं, असं वाटत नसतं… तसं त्यांना वाटलं असतं, तर महापुरुष म्हणून घडले नसते!” महापुरुषांना फक्त आणि फक्त, तळागाळातल्या सामान्य जनतेचं कायमस्वरुपी ‘कोटकल्याण’ व्हावं व तिनं ‘सन्मार्गा’ला लागावं, एवढीच अभिलाषा असते. म्हणूनच तर ते महापुरुष ! पण, आपली सर्वसाधारण प्रवृत्ती अशी की, आपण या महापुरुषांना एकदाचं ‘देवत्व’ बहाल करतो आणि त्यांचा प्रखर संदेश आचरणात आणण्याच्या जबाबदारीतून मोकळे होऊन जातो. पूजा करणं सोप, पण पूजनीयांचं आचरण करणं कठीण…. ते कठीणत्व, कष्टसाध्य असतं म्हणून आम्हाला नको असतं, त्यासाठीच पुतळे आणि स्मारकांचं सोप्पं प्रयोजन !

म्हणूनच, महाराष्ट्राच्या आमजनतेनं आता मनाशी ठरवायलाच हवं आणि गर्जून शासन-प्रशासनाला सांगायलाच हवं की, खूप झाली या महापुरुषांची स्मारके आणि पुतळे….. आता, नकोत ‘पुतळे’. तर, हवे खेडोपाडी जागोजागी ‘शेततळे’… अशी जलसंधारण करणारी लाखो ‘शेततळी’ आणि पाणलोट क्षेत्रात व शेततळ्यांच्या मध्यभागी हजारो पारंपारिक विहीरी हव्यात (हजारो वर्षांचं ‘संचित’ असलेल्या, भूगर्भातल्या खोलवरच्या पाण्याचा प्रचंड उपसा करणाऱ्या व अंति घातकी ठरणाऱ्या विंधनविहीरी किंवा कूपनलिका नकोत)! त्यामुळे, भूगर्भातील पाण्याची पातळी चांगलीच वाढून, दरवर्षी पडणारा महाराष्ट्रातला दुष्काळ संपेल, प्रजेचे पाण्यावाचून होणारे हाल संपुष्टात येतील आणि आपल्या महापुरुषांची मनोकामना बऱ्याच अंशी पूर्ण होईल.

“शेतमालाला रास्त भाव मिळण्यासंदर्भातील स्वामिनाथन-समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी केली जावी”, ही चौथी मागणी म्हणजे, पाच मागण्यांपैकी सर्वात महत्त्वपूर्ण व मूलभूत स्वरुपाची अशी… आणि म्हणूनच, ती कुठल्याही ‘प्रस्थापित’ राजकीय पक्षांकडून कधिही मान्य होण्यासारखी नाही. अन्य मागण्यांबाबत निदान वरवरचा होईना, पण काही मार्ग काढला जाऊ शकतो! पं. नरेंद्र मोदींनी यवतमाळमध्ये आणि नितीन गडकरींसह बहुतेक ग्रामीण भाजपा-नेतृत्वानं २०१४च्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत स्वामिनाथन-समितीच्या शिफारशी स्विकारण्याबाबत तोंडभरुन आश्वासनं दिलं होती…. पण, आता तेच नितीन गडकरींसह भाजपा-नेतृत्त्व केवळ, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची घोर फसवणूक करुन चूप बसलेले नाही; तर, अत्यंत निर्लज्जपणे ते आता जाहीररित्या सांगत फिरतायतं की, “कुठलही सरकार आलं तरी त्याला शेतमालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा, असा हमीभाव देता येणं शक्य नाही!”. वारे व्वा, हे, तर झालं “चोर वर शिरजोर!” या सगळ्याच प्रस्थापित राजकारणीवर्गाला आपण ठणकावून सांगायला पाहीजे की, “देशातला भ्रष्टाचार आणि करगळती रोखलीत, तर हीच मागणी काय, उलट देशातल्या जनतेच्या मूलभूत स्वरुपाच्या सगळ्याच मागण्या मान्य करणं, बिलकूल अवघड नाही…. त्यासाठी, “जनलोकपाल व अर्थक्रांती’सारखी ‘व्यवस्था बदल’ करण्याची अंगभूत क्षमता असणारी विधेयके, संसदेत पारित करुन अंमलात आणली गेली पाहीजेत” (शिवाय, द. कोरिया-जपानसारख्या पुढारलेल्या देशांप्रमाणे आपल्या देशात ‘वारसाहक्क करा’ संदर्भात कठोर तरतूदी अंमलात आणून देशात निर्माण झालेली टोकाची विषमता नियंत्रणात आणली गेलीच पाहीजे… म्हणूनच, जपानमध्ये भारत-अमेरिकेसारखी टोकाची आर्थिक विषमता बिलकूल आढळत नाही).

तिसरी मागणी ही, ‘आरक्षणा’संदर्भातील असून, खरी ‘ग्यानबाची मेख’ तिथेच आहे…. मराठा समाजासाठी ही मागणी म्हणजे, एक ‘चकवा’ आहे; तर, प्रस्थापित (सध्या त्यापैकी काही फक्त मंत्रालयात सत्तेत नसलेले… पण, बाकी महाप्रचंड अर्थबळाचा, आर्थिक-राजकीय औद्योगिक हितसंबंधांचा आणि असंख्य सहकारी व शिक्षण वगैरे संस्थांचा ‘कायमस्वरुपी प्रभाव’ राखून असलेले) मराठा नेतृत्त्वासाठी कुणाकुणाचे राजकीय हिशोब ‘चुकवा’ आहे! तेव्हा, प्रथम या ‘आरक्षणा’च्या मागणीचा आणि त्या अनुषंगाने येणाच्या इतर सर्वच मुद्द्यांचा परामर्ष घेऊया….

१) आरक्षणाचं धोरणं हे दुधारी शस्त्र……

आजच्या उग्र स्वरूप धारण केलेल्या समस्यांचं मूळ, अशाच आजवर केल्या गेलेल्या आरक्षणासारख्या थातूरमातूर मलमपट्टीमुळेच आहे…. आता, आरक्षणाची मलमपट्टी नको, तर व्यवस्थेत मूलभूत बदलच हवेत! आरक्षण, हे दुधारी शस्त्र होतं व आहे…. अल्पकाळासाठी उपयुक्त असलेलं हे धोरण, स्वतःच एक दीर्घकालीन समस्याबनलयं, याचा अनुभव आपण रोज घेतोच आहोत…. म्हणूनच कदाचित दक्षिण अमेरिकेत कृष्णवर्णीय लढ्यात मार्टिन ल्यूथर किंगयांनी कृष्णवर्णीयासाठी किंवा भारतात सरोजिनी नायडूयांनी महिलांसाठी, ‘आरक्षणाचा प्रस्ताव धुडकावून लावला होता. तेव्हा, “आरक्षण मागण्यापेक्षा, आरक्षणाची गरजच नष्ट होणारी धोरणं आपण राबवणारं आहोत की, नाही” हे तुमच्या आमच्या पुढचं, सर्वात मोठं काळाचं आव्हान आहे!

एक अत्यंत सधन असा घराणेबाज ‘प्रस्थापित’ अल्पसंख्य वर्ग (आपापसात सोयरिक जमवणारा) व बहुसंख्य वर्ग सामान्य, गरीब व वंचित अवस्थेतील ‘विस्थापित’, अशा अस्वस्थ करणाऱ्या वास्तवामुळे… मराठा समाज आर्थिक परिक्षणात टोकाच्या विषमतेत विभागलेला दिसतो (हेच चित्र भूमिपूत्र आगरी, कोळी, कराडी समाजातही प्रकर्षानं दिसतं). आज कोपर्डी किंवा अॅट्रॉसिटीच्या निमित्ताने उसळलेली ही मराठा तरुणाई…. मुळातून या विषमतेमुळे आणि आपल्याला विकासाच्या परीघाबाहेर जबरदस्तीने ढकलून दिलं जात असल्याच्या जाणिवेने, कुठेतरी पेटून उठल्याची ‘जाणिव’ या, आजवरच्या राज्यकर्त्या घराणेबाज (बारामतीकर, सांगलीकर, सातारकर, मालवणकर, नगरकर… वगैरे वगैरे) प्रस्थापित नेत्यांना आहेच! त्यातही, जनक्षोभातून काही वर्षांपूर्वी, मालवणातल्या धनसत्तेनं मातलेल्या नेत्याच्या जाळल्या गेलेल्या बंगल्याची भयकंप निर्माण करणारी आठवण, या पैशानं गडगंज असलेल्या मराठी-नेतृत्त्वाच्या मनात तेव्हापासून कायमची ठाण मांडून बसलेली आहेच. या संतप्त विस्थापितमराठातरुणाईनं, या प्रस्थापित अल्पसंख्य मराठा वर्गाला, आपल्या अवनत अवस्थेबाबत विचारु नये…. यासाठीच, जाब मागासवर्गीयांना दिलं गेलेलं आरक्षण, हेच तुझ्या अवनतीस कारण आहे व हे आरक्षण मिळाल्याशिवाय तुझी उन्नती होणे नाही”…. अशी भलतीच उफराटी दिशा, त्याला दाखवली जात आहे (जशी ती, मागासवर्गीयांना “आरक्षण, हेच आपल्या अस्तित्वाचं रक्षण”, अशी दिशा त्यांचे ‘धंदेवाईक’ नेते नेहमीच दाखवत असतात).

आरक्षणाचं ‘गाजर’ दाखवून समाजातल्या एका मोठ्या वंचित वर्गाला चुचकारुन दीर्घकाळ शांत बसवणं, या देशातल्या-महाराष्ट्रातल्या लुटारु ‘व्यवस्थे’ला (ज्यात, सर्वच जातीतले ‘स्मार्ट’ सत्तामत्तावान जातभाई सामील आहेतच) सहजशक्य झालं. त्यामुळेच, “मागेल त्या हाताला, योग्य दाम देणारं काम” आणि “ज्याच्याकडे बुद्धी व मेहनत घेण्याची तयारी आहे, त्या प्रत्येक मुलामुलीला त्यांच्या आवडीचं, सारख्याच व उत्तम दर्जाचं मोफत शिक्षण सरकारतर्फे दिलं जाण्या”च्या जबाबदारीतून व्यवस्थेनं स्वतःला छान मोकळं करुन घेतलं! ‘आरक्षणा’ सारख्या वरवरच्या मलमपट्टीमुळे, शिक्षण व वैद्यकीय सेवेचं दर्जेदार राष्ट्रीयीकरण वगैरे, मूलभूत संरचना उभारणीच्या जबाबदारीतून सरकारची सुटका होत आली आणि राजकारणी-नोकरशहा यांचा मिळून, भयंकर भ्रष्टाचार व करगळती अखंड चालूच राह्यली… जनता, त्यामुळेच दिवसाढवळ्या कायम लुटलीच जातेय. विशेष म्हणजे, सध्याच्या रक्तपिपासू शोषक व्यवस्थेचा सर्वात मोठा आधार असलेल्या, ‘कंत्राटी कामगार/कर्मचारी पद्धती, या वंचितांना आणि मराठ्यांना मागताच एकप्रकारे मिळालेल्या भरघोस आरक्षणाबाबत मात्र सगळ्यांची बोलती बंद आहे.

केवळ, आरक्षण हा ‘रामबाण उपाय’ असता, तर भारतातलं आजचं चित्र वेगळं दिसलं असतं…. दलित मागासवर्गीयांमध्ये देखील, साधारण १०-१५% ‘स्मार्ट’ असलेला वर्गच, बहुशः आरक्षणाचे फायदे वरच्यावर गैरवाजवी उपटत असतो आणि हाच, मागासवर्गीयांमधील ‘नव-ब्राह्मण वर्ग’, मागास समाजाचं नेतृत्त्व करत ‘आरक्षण’ कधि संपूच नये म्हणून, ठो ठो बोंबाबोंब करत असतो !

जर, या देशातील धनदांडग्यामुजोरांच्या (त्यात, महाराष्ट्रातील मराठाजातीतला अल्पसंख्य पॉवरबाज वर्ग प्रामुख्याने आलाच) अमानुषपणे शोषण करणाऱ्या व्यवस्थेला सगळ्यात कुठल्या एका धोरणानं फार मोठा हातभार व आधार लाभला, असा जर कोणी मला प्रश्न केला तर त्याचं सरळसोट उत्तर “आरक्षणाचं धोरण”, हेच मी देईन! ‘खाउजा’ धोरणापश्चात, उभ्या महाराष्ट्रात (अर्थात, देशात सर्वत्रच) फैलावलेल्या आणि फोफावलेल्या ‘कंत्राटी कामगार/कर्मचारी पद्धती’च्या वेठबिगारी-गुलामगिरीविरोधात गेल्या २५ वर्षांहून अधिककाळ आम्ही पुकारलेल्या ‘धर्मयुद्धा’त, सदैव जातधर्मीय अभिनिवेश बाळगणाऱ्या घातकी राजकारणात गुंतलेले अज्ञानी व अर्धजागृत मराठी-कामगार साथ द्यायला तयार नाहीत… हा पोळून टाकणारा जिवंत अनुभव आम्ही आजही घेत आहोत! या ‘आरक्षणाच्या मुद्द्याची सदरहू ‘महालेखा’त पुढे फार चिकित्सा न करता, मी एवढचं म्हणेन की, ‘महामानव’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या…. ‘जातिअंता’साठी आणि आमूलाग्र ‘व्यवस्था-बदला’साठी, अत्यावश्यक असणारी तळागाळातील समरसता, एकता व राजकीय जागरुकता निर्माण होणं, आरक्षणाच्या धोरणामुळे दिवसेंदिवस अशक्य बनत चाललेलं आहे.

जोपर्यंत, सार्वजनिक जीवनात ‘जातधर्मा’ला ‘फायदे-तोटे’ चिकटून आहेत…. ना तोवर ‘जातिअंत, वा मुळापासून कुठला ‘व्यवस्था बदल’ यापुढे, आपल्या देशात कुणालाही शक्य… !!! त्यामुळेच, सार्वजनिक जीवनात जातीधर्मजमातींचे उल्लेख होता होईल तेवढ्या तत्परतेनं आणि व्यापकतेनं, पूर्णत: ‘त्याज्य’ मानले गेले पाहीजेत…. शाळाप्रवेशापासून सुरु होणारं, हे जातधर्माच्या नोंदीचं ‘दुष्टचक्र’ तत्काळ रोखल गेलं पाहीजे! तुमचे जातधर्म हवंतरं, तुमच्या घरादारात आणि प्रार्थनास्थळात मर्यादित ठेवा… पण मित्रांनो, एकदा का जातधर्माचे फायदेतोटेसार्वजनिक जीवनातून संपले की, त्यांचं महत्त्व आपसूकच खाजगी जीवनातूनही झपाट्यानं उतरणीस लागेल. एखाद्या राष्ट्राची ‘लोकसंख्या’ किती असावी आणि त्यांचं जीवनमान सर्वसाधारणपणे कसं असावं, हे ठरविण्याचा अधिकार राष्ट्रातील राजकीय प्रक्रियेला असलाच पाहीजे. तसेच, निसर्ग-पर्यावरण अबाधित राखून प्रत्येकाला बौद्धिक वा शारिरीक कष्ट करून सन्मानानं जगता येणं, ही राजकीय प्रक्रियेची जबाबदारी आहे.. त्यात, जातधर्मांची ‘लुडबूड’ बिलकूल खपवून घेता कामा नये; मग त्यासाठी, प्रसंगी कुठलीही किंमत चुकविण्याची प्रामाणिक व प्रखर ‘राजकीय इच्छाशक्ती’ दाखवली गेलीच पाहीजे !

“तेव्हा, वर्ष-२०२१…. आपल्या देशाच्या ७५व्या हिरकमहोत्सवीस्वातंत्र्यदिनी आरक्षणाचं धोरण पूर्णतया रद्द केलं गेलं पाहीजे!!! आतापासूनच टप्प्याटप्प्याने सुरुवात करुन, वर्ष२०२१ मध्ये, तरी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मराठी माणसाला वाचविण्यासाठी आरक्षणकायमचं बंद करा आणि तळागाळात निर्माण झालेले यादवीसदृश समाजदुभंगरोखा…. शोषित मराठीसमाज अभंग राखा !!!

मागासवर्गीयांनी स्वातंत्र्यापश्चातच्या नवी मुंबईतील ७० वर्षांनंतरही ‘आरक्षण’ या मुद्द्याला कायमची मूठमाती न देता, केवळ त्याच्याभोवतीच पिंगा घालत राहणं, हे जेवढं अयोग्य; तेवढचं, दीर्घकाळ सत्ताधारी व सगळीच आर्थिक केंद्रे (सहकारीतत्त्वावरील साखरकारखाने सूतगिरण्या दूग्धव्यवसाय – बँका व पतसंस्था, शिक्षणसंस्था, शेती, शेतकीसंसाधने विक्रय व वापर आणि आता पंचतारांकित हॉस्पिटल्ससुद्धा) ज्यांच्या ताब्यात, ‘मराठा समाजा’नेही आरक्षण मागणं अयोग्यच! त्या साखरसम्राट, शिक्षणसम्राट आणि आजकालच्या आरोग्यसम्राट यांची जातकुठली? सामाजिक परंपरे प्रगतिशील असलेला मराठा समाज’, आपल्या जातीय मगरमिठीत ठेऊन मनमुराद गुजराण करणाऱ्या या टक्केवारीने मोजक्या जातीची माती खाणाऱ्या पॉवरबाज-घराणेबाजमराठ्यांच्या महापातकांमुळेच, आज ही गंभीर परिस्थिती मराठ्यांवर ओढवलीयं, हे निखालस सत्य कोण नाकारु शकेल ?

आई, अंगणवाडी सेविका आणि बाप, छोटा किराणा दुकानदार असलेली एखादी अनुजा पाटील, जेव्हा नवी मुंबईतल्या मोर्चात म्हणते, “मला जातीयवाद पेरायचा नाही की, कोणावर आरोपही करायचा नाही… बस्स्, मला आणि माझ्या भावंडांना शिकायचयं… आम्हाला वर्षागणिक वाढत जाणारी भरमसाट फी परवडत नाही आणि लोकांपुढे मला सारखे हात पसरायचे नाहीत तेव्हा, महाराष्ट्रातील सामन्य मराठी माणसांची, डोळ्यात टच् पाणी उभं करणारी ठसठसती वेदनाच, ती लाखोंच्या जनसमुदायापुढे बोलून दाखवत असते… !!!

तेव्हा माझ्या मराठा-मुलामुलींनो, तुम्ही निद्रेतून जागे झालाच आहात तर, इथून पुढे तुम्हाला अतिशय सावधगिरीने वाटचाल करावी लागेल, हे आत्ताच सांगून ठेवतो…. ‘उद्धरेत आत्मना आत्मनाम’ या श्रीकृष्णाच्या वा ‘अत्त दीप भव’ या गौतम बुद्धाच्या उपदेशानुसार आपलं आपल्यालाचं ‘बुलंद’ करावं लागेल…. ‘तुझा तू वाढविशी राजा’, माझं तरुण मराठी-मुलामुलींना कळकळीचं आवाहन आहे. राजकारणात आम्ही मोजकी मंडळी मिशनम्हणून काम करत आहोत, ‘कमिशनम्हणून नव्हे…. आम्ही, श्रीकृष्णाच्या जीवनसंदेशानुसार व शिवछत्रपतींच्याच राजनीतिनुसार राजकारण करत आहोत, “आम्ही गमवायला आलोत. कमवायला नाही”! पैसा तर सोडाच; पण, आम्ही नांवही कमवायला आलेलो नाही….

तुमच्यासारखी ‘जागृत’ झालेली जाणकार, प्रामाणिक, सम राजहितैषी व आजवरची ‘विस्थापित’ असलेली तरुणाई, मंत्रालयात ‘प्रस्थापित करण्याचं आमचं स्वप्न आहे…. त्यातूनच, हा जैन-गुज्जू-मारवाडी-सिंध्यांच्या ‘शेठजी संस्कृति’च्या ताब्यात जाणारा आणि उत्तरभारतीयांच्या अफाट संख्याबळाच्या वरवंट्याखाली भरडला जाणारा महाराष्ट्र वाचवता येणं शक्य आहे!

‘चर्चा’ नव्हे, ‘मोर्चा’….. ही रुबाबदार रुजवात असली तरी, फक्त सुरुवात आहे…. त्यावर समाधान मानून ‘अल्पसंतुष्ट’ राहिलात; तर, भविष्यात फक्त ‘अंधार’ आहे….

क्रांतिमोर्चाचं युद्धजिंकल्याच्या समाधानात राहून, भाळी फक्त आरक्षणाच्या वाटाण्याच्या अक्षता लावून शांत बसलात तर, “मराठे युद्धजिंकतात, पण तहात हारतात”, हाच दुर्दैवी इतिहास पुन्हा लिहालं. तेव्हा, सावधान !

२) राजकीय, शैक्षणिक व नोकरीतलं आरक्षण’, हे यापुढे कुठल्याही जातधर्माला तर नकोच; पण, ते आर्थिकदृष्ट्या दुर्बलतेच्या आधारावरही बिलकूल नको…. (फारतर, शारीरिक अपंगत्व वा दिव्यांगत्व इ. दुर्दैवी वैयक्तिक आघात, लष्करी-निमलष्करी सेवेतील निवृत्त जवान वगैरेंच्या बाबतीत वेगळा विचार करता येऊ शकतो)….

गरीबांना आरक्षण म्हणजे, एका अर्थी गरीबीचचं रक्षण होय!” मग, आजवरच्या आमच्या गरीबीहटावघोषणांचं काय झालं? एक ऐश्वर्यात लोळत असेल; तर, दुसऱ्याला निदान सन्मानाने जगता येण्याएवढी परिस्थिती तुम्ही निर्माण करु शकत नसाल तर, राज्यशकट हाकण्यासाठी तुम्ही केवळ नालायकच नव्हे; तर, अत्यंत धोकादायक आहात! केवळ, लोकसंख्या विस्फोटाकडे अंगुलीनिर्देश करुन तुम्हाला आपल्या ‘आर्थिक समरसता आणि समानता’ या महत्त्वपूर्ण जबाबदारीतून मोकळं होता येणार नाही.

१) लोकसंख्येच्या विस्फोटाला व ‘कार्बनकेंद्री’ चंगळवादी- जीवनशैलीला कठोरपणे रोखणे….. पर्यावरणस्नेही विकास निसर्गस्नेही जीवनशैली व २) टीम अण्णांचं ‘जनलोकपाल/लोकायुक्त विधेयक’ व श्री. अनिल बोकिलप्रणित ‘अर्थक्रांति – विधेयक’ आणणे ३) द. कोरिया जपानसारख्या पुढारलेल्या देशांप्रमाणे, आपल्या देशात ‘वारसाहक्क करा संदर्भात कठोर तरतूदी अंमलात आणून देशात निर्माण झालेली टोकाची विषमता नियंत्रणात आणणे ४) सामान्यांच्या खिशाला सहजी परवडणारी घरकुलं… (शहरंउपनगरांत एका कुटुंबाला केवळ एकच मालकी हक्काच्या फ्लॅटचा कायदा केला की, शहरातल्या फ्लॅटच्या किंमती कोसळून सामान्यांच्या आवाक्यात येतील) ५) सर्वांना समान व उत्तम दर्जाचं मोफत शिक्षण व आरोग्यसुविधा ६ ) कंत्राटी कामगार/कर्मचारी प्रथा उच्चाटन ७ ) ) दरमहा रु. २५,०००/- एवढं सन्माजनक किमानवेतन ८) शेतमालाला ‘स्वामिनाथन-समिती’च्या शिफारशीनुसार रास्तभाव व ९) सेंद्रियशेती व पारंपारिक जलसंधारण पद्धतींवर भर….. अशी, जातधर्माचा काडीमात्र विचार ‘न’ करता जर, प्रामाणिक व सचोटीची ‘लोककल्याणकारी-धोरणे’ (Welfare State Concept ) राबवली गेली असती; तर, कुणालाही या देशात दारिद्र्यात खितपत पडावं लागलं नसतं आणि आर्थिकदृष्ट्या कोणी दुर्बलही राह्यलं नसतं !

तसेच, गरीबी ही, वैयक्तिक वा कौटुंबिक दोषांमुळे कुणावरही येऊ शकते… अगदी गर्भश्रीमंतांवर देखील! मग, व्यसनी-छंदीफंदी व मूर्ख लोकं, बेजबाबदारपणे उधळमाधळ करुन पैसे वारेमाप उडवतील व कर्जबाजारी-दरिद्री होतील आणि आरक्षणाला पात्र ठरु शकतील…. हे सगळचं कोण तपासत बसणार वैयक्तिक पातळीवर? आज, आरक्षणासंबंधित इतके कागदीघोडे नाचवले जातात… जात-पात्रता, जात प्रमाणपत्रं, जातपडताळणी वगैरे कामी एवढ्या प्रचंड संख्येने मनुष्यतास व संसाधनं वाया जातायतं की, ती अन्य कुठल्या विधायक कार्यात गुंतवली असती तर, मोठचं राष्ट्रकार्य उभं राहू शकलं असतं.

‘आरक्षण’ हा काही कुठला सरकारी कार्यक्रम नव्हे की, जो कायमस्वरुपी चालू रहावा! एका विशिष्ट कालखंडात एका मोठ्या जनसमुदायाला ‘माणूसपणा’चे हक्क प्रदीर्घकाळ नाकारले गेल्यानं, त्याला मूळ ‘राष्ट्रीय-प्रवाहा’त आणून सोडण्यापुरतचं त्याचं प्रयोजन होतं…. सरतेशेवटी, ज्याचे त्यालाच प्रवाहात पोहण्यासाठी हातपाय मारायचे आहेत…. “आरक्षणाचा पांगुळगाडा पिढ्यानपिढ्या मिळत रहाणं, हे गैरच!”

जेवढ्या सहजगत्या जातीची खोटी सर्टीफिकेटं आणली जातात, त्याहीपेक्षाही सहजगत्या, आपल्या देशात आयकर (इन्कमटॅक्स) चुकवला जातो (१३१ कोटींच्या देशात धड चार कोटी लोक पण आयकर भरत नाहीत)… तर मग आज देशात मागासलेले म्हणवून घेण्याची स्पर्धा लागलीय…. उद्या, गरीब म्हणवून घेण्याची व सिद्ध करण्याची स्पर्धा लागेल… त्यात, शेती-उत्पन्नाला कर नसल्यामुळे, श्रीमंत शेतकरी पण गरीब ठरु शकतील.

तेव्हा, आरक्षणाच्या नांवाने ‘ग्यानबा तुकाराम’ आणि ‘गोविंदा रे गोपाळा’ करत देशात चाललेल्या, या कधिही न संपणाऱ्या ‘कापूस कोंड्याच्या गोष्टीला, आता ‘पूर्णविराम’ देण्याची वेळ आलेली आहे! ‘आरक्षण’ हा शब्दच, राजकीय शब्दकोशातून, ज्या अर्थी हल्ली वापरला जातोयं, तो शब्दच आता कायमचा वगळण्यात आला पाहीजे… असं ‘धर्मराज्य पक्षा’चं सुरुवातीपासूनचच प्रतिपादन आहे.

३) आरक्षणाची भीक मागत रस्त्यावर उतरण्याची वेळ मराठ्यांवर कुणी आणली ?… “प्रस्थापितही मराठाआणि विस्थापितही मराठा’’, असं आक्रित घडलच कसं ? ?

मित्रांनो, स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी “खेड्यातून बाहेर पडा”, असा स्वहिताचा संदेश दलित समाजाला दिला. दलितवर्ग मोठ्या संख्येने शहरात स्थलांतरित झाला (आश्चर्य हे की, शहरातील सार्वजनिक जीवनात, विशेषतः खाजगी उद्योग व्यवसाय क्षेत्रात, जातीपातीचं फारसं कुणाला सोयरसुतक नसतानाही …. स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षांनंतरही आरक्षणाचं त्रांगड शहरांपुरतही सुटायला तयार नाही, खरंतरं हा बाबासाहेबांच्या संदेशाचा आदेशाचा एकप्रकारे मोठा अवमानच, त्यांचं नांव उठताबसता घेणाऱ्या शहरातील आंबेडकरी नेतृत्त्वानं आजवर केलेला आहे). म. गांधीजींनी सांगितलेला “खेड्याकडे चला” हा, ‘शाश्वत विकास व जीवनशैलीचा महामूलमंत्र मात्र शहरी रहाटगाडग्यात छानपैकी रुळलेल्या कुणी फारसा मनावर घेतला नाही. खेड्यात उरल्या फक्त शेती करणाऱ्या जाती. त्यातल्या ‘मराठा’ वगळता, बाकीच्या जातींना टप्प्याटप्प्याने ‘आरक्षण’ मिळत गेले आणि ‘मंडल आयोगा’ने ते चरमसीमला पोहोचवले व ते शिक्षण घेऊन नोकरीपेशात व व्यवसायात शिरले. शेती करणारी जमात उरली ती बहुसंख्येने ‘मराठा’. या मराठा शेतकऱ्यांना सुखावणारी एकमेव गोष्ट होती, ती म्हणजे आपण ‘राज्य करणारी जमात’ आहोत, हीच… आणि इथेच सगळ्यात मोठी फसगत झाली. सत्तासुंदरीचा मनमुराद उपभोग घेणारे बारामतीकर, सांगलीकर, सातारकर, नगरकर, मालवणकर संस्थानिक मराठेदहा टक्के तर, उरलेले मराठे प्रजाजन९० टक्के! डोक्यात विचार कसले तर, आपलेच लोक… आपलेच जातभाई सत्तेत आहेत. शेतकरी म्हणून होईल, आपलं कधि ना कधि चांगभलं. त्यात आली आजची रासायनिक हरित क्रांती आणि शेतकरी अलगद बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या जाळ्यात ओढला गेला.

स्वतः तयार केलेले गावरान बी-बियाणे आणि शेणखत-सोनखत वापरणारा बळीराजा संकरीत बी-बियाणे आणि रासायनिक खतांसाठी लाचार, परावलंबी होत गेला. अगदी, विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अंगावरदेखील नायलॉनचे कपडे चढवण्यात आले…. इतकच नव्हे तर, दोरखंडही नायलॉनचेच झाले. बियाण्यांपासून खतापर्यंत ‘गुलामी’ सुरु झाली. शेतकरी आपल्या नेत्यावर अवलंबून तर, नेते भांडवलदारांवर… निवडणुकीच्या राजकारणासाठी लागणाऱ्या अफाट पैशासाठी! आज शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे तर या, रासायनिक खते-किटकनाशके आणि बियाण्यांच्या कंपन्या, पण कुणालाच त्याविरुध्द आवाज उठवावासा वाटत नाही. भ्रष्ट सरकारी अधिकारी, सावकार, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि जैनगुज्जूमारवाडी-सिंधी जमातीच्या अन्नधान्य व्यापाऱ्यांनी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दलाल बाजारसमित्यांनी मराठा शेतकऱ्याला अक्षरश: शेतातून खेचून आणून रस्त्यावर उभा केला. ज्यांची मनं सुपीक होती, त्यांची शेतं मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांच्या अतिप्रचंड भ्रष्टाचारामुळे सिंचनाविना कोरडवाहूच राहिली. लोकसंख्या वाढत गेली तसा, हळूहळू प्रत्येक ‘मराठा’ अल्पभूधारक होऊ लागला. वीस वीस एकराची शेती असणारे, अवघ्या दोन तीन पिढ्यातच खातेफोडीमुळे एकदोन एकराचे अल्पभूधारक व कोरडवाहू शेतकरी बनले. बांध जसे पडत गेले शेतात, तसे पडू लागले मना मनातही पोटाची खळगी भरण्यासाठी जमिनीच्या तुकड्या तुकड्यावरुन घराघरात सख्खे, पक्के वैरी झाले…. अस्तित्व निव्वळ टिकवून धरण्यासाठी घराघराच्या उंबरठ्याच्या आत आणि बाहेर कडवा संघर्ष सुरु झाला. भरीसभर म्हणून परंपरागत घरांऐवजी काँक्रिटची घरबांधणी, कौटुंबिक लग्नकार्यातले बडेजाव व हुंडा, खोट्या प्रतिष्ठा व मानमरातब, मुलामुलींचं शिक्षण व आजारपण या सगळ्यावरच्या अफाट खर्चामुळे ‘पाठकणा’ मोडून पडलेल्या मराठा-शेतकऱ्यांनी फासाच्या दोरात मान अडकवणं पसंत केलं…. तर, काही कायमचे व्यसनाधीन झाले !

दुसरीकडे शहरांत दाखल झालेल्या मराठा-कामगारांच्या माना पिरगाळून ‘कंत्राटीकरणा’द्वारे त्यांना ‘गुलाम’ बनवणं जोमात सुरु झालेलं आणि त्यांच्या डोळ्यासमोरच सुरक्षित कायमस्वरुपी नोकच्या खाजगी क्षेत्रातून व सार्वजनिक क्षेत्रातून कापरासारख्या उडून नाहीशा होऊ लागलेल्या शेतात, कारखान्यात सरकारी कार्यालयात, वित्तसंस्थांमध्ये पदरी घोर निराशा पडलेल्या शेतकऱ्यासाठी व कामगारासाठी ‘लोकशाही-प्रक्रिया’, त्यांचे मराठा ‘जातभाई महाराष्ट्रात दीर्घकाळ सत्ता भोगत असतानाही, ‘कुंठीत’ होत गेली आणि निवडणुकीच्या वेळेस, फक्त जातिआधारित ‘मतदान’ करण्यापुरतीच ती मर्यादित राहिली.

भारतात लोकशाही जगली; पण, पाकिस्तानात लष्करी-साम्राज्यवादाचा व सरंजामशाहीचा उदय का झाला….. कारण, स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच काँग्रेसचा ‘कणा’ शेतकरीवर्ग व मध्यमवर्ग राहील, याची म. गांधींनी काळजी घेतली होती तर, बॅ. जीनांची मुस्लिमलीग ही कायम मूठभर उच्चश्रूंच्या हातात राहिली. महाराष्ट्रातील काँग्रेसी राजकीय प्रक्रिया मात्र, उत्तरोत्तर म. गांधींच्या शिकवणुकीविरुद्ध जात, मुस्लिम लीगसारखीच मूठभर घराणेबाज ‘मराठ्यांच्या हातात गेली (भले, नावापुरते इतर जातीजमातींचे मुख्यमंत्री झाले तरी). त्यामुळेच, तळागाळातील ‘मराठ्यां’सह सर्वच मराठी जनता, ‘मूठभर-मराठेघराणेशाही’ च्या सुप्त हुकूमशाही आणि सरंजामशाही वरवंट्याखाली दडपली जाऊ लागली! म्हणूनच, देशातल्या राज्यातल्या संपत्ती निर्मितीचा भन्नाट वेग टिपेला पोहोचला असतानाही, महाराष्ट्रातलाच मराठा समाजत्या संपत्ती निर्मितीच्या प्रक्रियेपासून दूर लोटला गेला…. महाराष्ट्राच्या सातबाऱ्या वरुन मराठानांव बेदखल होत गेली… एका बाजुला शोषक शेठजी संस्कृती आणि दुसऱ्या बाजुला सर्वत्र फैलावलेली आक्रमक व अनीतिमान उत्तरेतली संस्कृती’. चक्रव्यूहात सापडलेली मराठी-संस्कृतीहे इथल्या, ….. अशा गेल्या ४५-५० वर्षांच्या नालायक, बदमाष व घराणेबाज मराठा राजकारण्यांचं महापातकआहे!

महाराष्ट्रात आजवर डझनावरी मुख्यमंत्री मराठा जातीचे, ६०वर्षांत मराठा समाजाला सरासरी ६० टक्के मंत्रिपदे, बहुतेक विविध राज्यमहामंडळात मराठ्यांचीच वर्णी, बारामतीकर साहेब तर कबड्डी-कुस्ती-क्रिकेट (सर्वोच्च न्यायालयाने चपराक दिल्यामुळे नाईलाजाने क्रिकेटचं बीसीसीआय सोडावे लागले, ते असो..) वगैरे वगैरे हजारावर संस्थांवर अध्यक्ष म्हणून आहेत (अगदी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षणसंस्थेसारख्या पवित्र संस्थाही ‘साहेबां’च्या कुप्रभावातून सुटू शकल्या नाहीत…. त्यातूनच मग महाराष्ट्रभरात, चांगल्या ‘संस्थां’ची ‘संस्थानं व जनतेला नडणारे ‘संस्थानिक’ तयार होऊ लागले), सहकारीतत्त्वावरील साखरकारखाने-सूतगिरण्या-दूग्धव्यवसाय-बँका व पतसंस्था, शिक्षणसंस्था, शेती, शेतकीसंसाधने विक्रय व वापर आणि आता पंचतारांकित हॉस्पिटल्ससकट (साखरसम्राट, शिक्षणसम्राट आणि आजकालच्या आरोग्यसम्राटांची ‘जात’ कुठली ?) सगळीच आर्थिककेंद्रे मराठा जातीय मगरमिठीत असूनही. फक्त ५-१०% मराठा जातीचे लोक सत्ता वाकवत व वागवत, वाममार्गाने श्रीमंत अतिश्रीमंत बनले (साधारणपणे दिडदोनशे मराठाघराणी, मराठासमाजाचा नगाडाबेगुमानपणे व बेईमानपणे हाकतायतं, असं म्हणायला हरकत नाही…. बरं, त्यातसुद्धा जसे पाकिस्तानात लष्करशहा, नोकरशहा व बडी राजकीय घराणी यांच्या वर्तुळातच घडतात, तसे जे काही लग्नसंबंधघडतात, तेही बहुशः या मर्यादित सत्तावान व मत्तावान मराठासरंजामदारांच्या बंदिस्त कौटुंबिक वर्तुळातच. त्यामुळे, बाकीच्या आपल्याच जातीच्या बहुसंख्याक मराठा समाजावर दाबजरबठेवणं त्यांना अगदीच सुलभ बनतं. शिवाय, त्यांनी तहहयात केलेल्या बारा भानगडी’, ‘तेरी भी चूप और मेरी भी चूपया पाजी वृत्तीने, एकमेकाला सांभाळून घेत, ‘पेज थ्री कल्चरसारख्या कायमच्या गुलदस्त्यात रहातात)….. तर दुसरीकडे उर्वरित, ९०-९५% मराठा-समाज देशोधडीला लागलेला आहे. आर्थिक विवंचना व असुरक्षितता, हेच मराठा समाजाच्या नैराश्याचं आणि वैफल्यग्रस्ततेचं प्रमुख कारण आहे. सध्या तमाम गोरगरीब मराठा-समाज, स्वाभिमानाला मुरड घालून ‘याचका’च्या भूमिकेत या ‘महामोर्च्या’मधून दिसतोयं, तो प्रामुख्याने या बदमाष ‘मराठा’ नेत्यांमुळेच.

जी चूक, अखिल भारतीय जनतेनं देशभर जातीय नेतृत्त्वावर विश्वास ठेऊन केली व आजही करत आहे; तीच घोडचूक मराठा समाजानं प्रथम महाराष्ट्रात केली आणि त्या चुकीचाच कित्ता गिरवण्याचं काम महाराष्ट्रातील आगरी-कोळी-कराडी-मागासवर्गीयमुस्लिम समाजानं केलं. काही फारच थोडे अपवाद वगळता, एकजात ही जातीय नेतृत्त्वंअत्यंत हिणकस दर्जाची व बेईमान निघाली. आपल्या जातीची ‘शक्तिस्थळं व मर्मस्थळं’ पुरेपूर जाणत असल्यानं काळानुरुप सरड्यासारखे रंग बदलत, आपल्याच जातीजम जातीच्या अल्पज्ञानी व समज कमी असलेल्या साध्याभोळ्या जनसमूहाला प्रदीर्घकाळ हातोहात फसवणं व लुटतं रहाणं…… त्यांना सहजशक्य झालं!

४) रासायनिक-यांत्रिक शेतीच्या व संकरीत बियाण्यांच्या पश्चिमेकडून आलेल्या वाऱ्यांमुळे गावं-शिवार आणि खाण्यापिण्याच्या-पीकपाण्याच्या सवयी बदलू लागल्या….. काळ्या आईला भोगदासीबनवण्याचा घाट कोणी घातला???

“हा देश कधीही महान नव्हता…. आजही नाही आणि उद्याही असणार नाही”. असं सांगणारे कैक भाडोत्री अर्थशास्त्रज्ञ (खरंतरं पैसा मोजणाऱ्यांच्या इच्छेनुसार ‘पोथ्या ‘ वाचून दाखवणारे ‘अर्थशास्त्री) या देशात होऊन गेले व आहेत…. पण मग, जर आपला देश खरोखरच कंगाल होता, तर फ्रेंच, पोर्तुगीज, डच व इंग्रजांनी या देशाला शेकडो वर्षे का लुटलं ? काय नेलं त्यांनी या देशातून?? हा देश सुखीसमाधानी व समृद्धच होता, कारण आमची शेती समृद्ध होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकोषात एका रुपयामागे ५६ पैसे उत्पन्न शेतीतून येत होते. ते आता १८ पैशांवर येऊन ठेपले आहे आणि या अधःपातालाच आपण ‘विकासाची गंगा अवतरली’ असं म्हणतोयं. तेव्हा मिळणाऱ्या ५६ पैसे उत्पन्नावर भारतात भीमकाय उद्योग उभे राहिले. मोठमोठी धरणे बांधली गेली. शिक्षणसंस्था उभ्या राहिल्या. उद्योगांच्या बरोबरीने प्रचंड वसाहती, शहरे, हॉटेल्स, उड्डाणपूल, सिमेंट काँक्रीटचे रस्ते, रेल्वे वाहतुकीचे जाळे निर्माण करण्यात आले. अगदी अणुभट्ट्या, युद्धसामग्री, आधुनिक विमाने, अंतरिक्षयान… सारं काही साकारलं, ते प्रामुख्याने शेतकी उत्पन्नातूनच! इंग्रजांचं राज्य या देशात येण्यापूर्वी दोन हजार वर्षांत भारतात फक्त १८ दुष्काळ पडले होते. म्हणजे सरासरी प्रत्येक ११० वर्षांत एक. तर, इंग्रजांच्या राजवटीत देशाने दर ३ वर्षांत एक असे, जवळपास ३२ दुष्काळ झेलले. आता तर, ‘नेमेचिदुष्काळच नव्हेत; तर, शेतात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचचं पीक येतयं. पारंपारिक पिके व पारंपारिक सेंद्रिय शेती सोडून नगदी पिकांचा व रासायनिक-यांत्रिक शेतीचा धरलेला अट्टाहासच, याला कारणीभूत नाही, तर दुसरं काय ?

इंग्रजांच्या आक्रमणानंतर उध्वस्त झालेली ‘ग्रामीण व्यवस्था’, पूर्ण सावरण्याआधीच रासायनिक – यांत्रिक स्वरुपाच्या आधुनिक शेतीमुळे पुन्हा एकवार कायमच्या ‘उध्वस्तते’ कडे वाटचाल करु लागली…. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर, महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या हळूवारपणे उन्नत होत गेलेल्या ‘निसर्ग-पर्यावरणस्नेही’ मराठी पारंपारिक सामाजिक व आर्थिक संरचनांवर, औद्योगिकीकरणापश्चात अचानक व अल्पावधीत आधुनिक कार्बन प्रदूषणकेंद्री विचार व्यवस्थांचं जबरदस्तीने ‘कलम’ करण्यात आलं… ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे’, असं ‘स्वांत सुखाय’ जगणाऱ्या निसर्गपूजक व भोळ्याभाबड्या नांगरधारी मराठा समाजावर, ही एक फार मोठी आफतच होती, ज्यामुळे अवघं मराठी समाजमानसच साफ बावचळून गेलं… ढवळून निघालं.

आजवर, ८०% शेतकऱ्यांच्या आत्महत्या, या मराठा जातीतील शेतकऱ्यांच्याच झालेल्या आहेत… १९७२चा दुष्काळ आणि त्यानंतर बरोबर दोन दशकांनी आलेल्या जागतिकीकरण-खाजगीकरणउदारीकरणाच्या आर्थिक धोरणानं (खाउजाधोरण) मराठा समाजाचं अगतिकीकरणकरुन टाकलं… पश्चिमेकडचे वारे महाराष्ट्राच्या गावरानात शिवारात घुमू लागले, तशी रासायनिक व यांत्रिक शेतीच्या अविवेकामुळे पारंपारिक सुखी शेती (ज्या शेतीला फक्त गावोगावी शेकडो शेततळी, पाझर तलाव, पाणलोट क्षेत्रात लहानमोठे बंधाऱ्यांचं राज्यभर जाळं व पारंपारिक विहीरींची मोठ्याप्रमाणावर निर्मिती एवढीच मानवी हस्तक्षेपाची गरज होती) उध्वस्त होण्यास हळूहळू सुरुवात झाली.

१९७२च्या भीषण दुष्काळाने जरी महाराष्ट्राचे होत्याचे नव्हते केले; तरीही, एकाही शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली नव्हती… निदान, तेव्हा प्यायला पाणी उपलब्ध होतं, लोकसंख्या मर्यादित होती आणि महत्त्वाचं म्हणजे ‘माणुसकी व आपलेपणा’ जिवंत होता. पण आता, निसर्गातील माणसाच्या अक्षम्य हस्तक्षेपामुळे व शासकीय नियोजन व जलसिंचनातील भ्रष्टाचार व चुकीच्या धोरणांमुळे वारंवार पडणाऱ्या ओल्या सुक्या दुष्काळात ‘शेताच्या बांधावर मराठा-शेतकऱ्यांच्या मोठ्याप्रमाणावर ‘आत्महत्या’ होतायतं आणि काही केल्या त्या थांबायला तयार नाहीत.

साठ एक वर्षांपूर्वी मात्र, शेताच्या बांधांवर आंबा, चिंच, जांभूळ… विहिरींभोवती रामफळ, बेल, पिंपळ… ओढ्यांच्या काठांवर उंबर, गोंदण, भोकर… माळरान-गायरानात आवळा, बोर, बाभूळ… एकदोन नगदी पिकं, गावरान ज्वारी-बाजरी पिवळी, उडीद-मूग-मटकी मसूर यांच्याबरोबर गावरान तूर, अंबाडी, जवस, तीळ, वरई, भगर, करडई अशी तेलबिया डाळी आणि इतर अनेक वरकड धानांनी युक्त हिरवीगार शेतं; असं, मानवप्राणी, पाळीवप्राणी आणि निसर्गातील इतर सर्व प्राण्यांना जे जे हवं ते ते सारं उपलब्ध… स्वप्नवत वाटावं असं हे वर्णन आहे, महाराष्ट्रातील स्वयंपूर्ण खेड्यांचं, जेव्हा नुकतीच ‘महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती !

उतरंडीच्या डेऱ्यांत गुळ, पाक असायचा. भूईमुगाचे पीक एवढ्या मोठ्याप्रमाणावर असायचं की, ‘मराठ्यां’ सह सगळ्यांच्याच प्रत्येक आमटी-कालवणात शेंगदाण्याचं कूट हमखास असणारच. पैसा फारसा कुणाकडे नसायचा. सारा व्यवहार धान्याच्या देवाणघेवाणीतूनच चालायचा. कुटुंबाला वर्षातून दोनतीनदा नवीन कापडं घेता यावीत, ही ‘मराठा’ शेतकऱ्यांची माफक अपेक्षा, म्हणूनच कदाचित, संत तुकारामांच्या ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे, या संदेशानुसार आम्ही मराठमोळी मंडळी, आजच्यापेक्षा त्यावेळी अधिक सुखीसमाधानी होतो. पण, काळ पुढे बदलत गेला. नगदी पीक म्हणून पुढे आलेल्या पसऱ्या भूईमुगानं कापसाची खानदेश-मराठवाड्यातून कापसाची पीछेहाट केली…. तर, अधिक उत्पादन देणान्या ‘निकस’ संकरीत ज्वारीने पसऱ्या भूईमूगाला हळूहळू पसार करण्यासोबतच माणसांच्या आणि जनावरांच्या तब्येतीचाही सत्यानाश केला. प्रथमच गावरान ज्वारीच्या लागवडी खालील क्षेत्र झपाट्याने आक्रसू लागले…. गोधन-पशूधन कमी होऊ लागले. त्यानंतर सोयाबीन आले व त्याच्याबरोबर अनुदानही आले. जिकडे तिकडे सोयाबीन दिसू लागले. गावरान ज्वारी बाजरी-पिवळी आधीच गायब झाली होती. भाकरीची जागा, पोळीने (चपातीने ) घेतली. त्यासाठी खेडोपाडी गहू परप्रांतातून येऊ लागला.

उलटपक्षी, ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने अतिशय आरोग्यदायक म्हणून शिफारस केल्यानंतर, मुंबईच्या मलबार हिल-पेडर रोडसारख्या ठिकाणी ज्वारी-बाजरीची भाकरी खाण्याचं प्रमाण कमालीचं वाढलय (त्यामुळेच, एरव्ही कोसळणारे ज्वारीचे भाव सावरुन उलट वर चढू लागले आणि ज्वारी-बाजरीची भाकरी करु शकणाऱ्या मराठमोळ्या स्वयंपाकी बायकांची, तेथील श्रीमंतांच्या घरी, मागणी सध्या खूपच वाढलीयं); तर, अमेरिकेसारख्या पुढारलेल्या पाश्चात्य देशात, अमेरिकन जनतेचं आरोग्य सुधारावं (कर्करोगाचं थैमान सुरु झाल्यानं) म्हणून, महाराष्ट्रीय ज्वारी-बाजरीचा आहारात प्रमुख अन्न (स्टेपल फूड ) म्हणून समावेश व्हावा, यासाठी सरकारी पातळीवरुन जोरदार प्रयत्न सुरु झाले. “अमेरिकन जनतेनं पन्नास वर्षांपूर्वी आरोग्याला अंति घातक म्हणून सोडून दिलेला त्यांचा आहारसध्या आपण घेतोय; तर, आपण पन्नास वर्षांपूर्वी सोडून दिलेला आपला सोन्यासारखा खनिजद्रव्ये, तंतूयुक्त सकस आहार’, अमेरिकन जनता सध्या घेतेय….आपल्या गंभीर समस्यांची सर्वदूर पसरलेली मूळं, अशी खोलवर कुठेतरी आपल्याच आहारविहारात आणि वर्तनात दडलेली आहेत!

दहा-पंधरा प्रकारची पिके घेणाऱ्या मराठा-शेतकऱ्याची भारतीय उपखंडातील शाश्वतस्वरुपाची ‘नैसर्गिक-जैववैविधता’ जाऊन, शेती युरोप-अमेरिकेसारखी ‘एकसुरी’ होऊ लागली. एकसुरी पीक पद्धतीमुळे एकाच वेळी पिकांवरील वाढत्या रोगांच्या प्रादुर्भावासह अनेक कारणांनी सगळी पीकं वाया जाण्याचं किंवा अति उत्पादन झाल्यामुळे त्यांचे बाजारभाव गडगडण्याचं प्रमाण वाढलं. टॉमेटो-कांद्याच्या ‘पीकभावा’चा लहरीपणा किंवा साखर मुबलक पण तुरडाळ गायब, ही त्याची ज्वलंत उदाहरण होत. रासायनिक खतांच्या सततच्या व वाढत्या माज्यामुळे मातीची जैव-संरचना बिघडली. शेणखत-सोनखताच्या अभावामुळे पिकांसाठी निसर्गतः लागणारी पोषक द्रव्ये जमिनीतून झपाट्यानं कमी होऊ लागली व निर्जीव झालेल्या मातीची जल संधारणक्षमता कमी होत गेली.

साखर कारखानदारी जसजशी वाढत गेली तसतसा, अफाट पाणी पिणारा ऊस सर्वत्र हातपाय पसरु, लागला…. परिसराला आणि अनेक लोकांच्या तोंडाला मळीची दुर्गंधी येऊ लागली…. फुलणाऱ्या द्राक्षाच्या म ळ्यांसोबत, ‘दारु गाळाया शरद पवारांसारख्या मराठा नेत्यांच्या, तरुणपिढ्या बरबादीला लावणाऱ्या धोरणी सापळ्यामुळे, ‘अंगूर की बेटी ही, आपला अवलक्षणी हातव हातावरचं घड्याळदाखवू लागली… मराठाप्रतिष्ठेच्या, मोठेपणाच्या बदलत्या धारणा व संकल्पना, अवघ्या मराठा समाजाचा घात करु लागल्या! वृक्षराजी नाहीशी झाली, ओढे-नाले कोरडे पडले, वन्यजीव परागंदा झाले. चिमण्या-पक्ष्यांच्या चिवचिवटाऐवजी डॉल्बीचा दणदणाट निनादू लागला! भाकड जनावरांसोबतच म्हातारे आईबापही त्याला नकोसे वाटू लागले. शेतकऱ्यांविषयी इतरांना वाटणारी उरलीसुरली आत्मीयताही त्यामुळे संपली.

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर राजकारणाची अनिष्ट छाया पडू लागली. मिळणारी सरकारी मदत व सवलतींच्या बदल्यात शेतकरी आपला आत्मसन्म न व आत्मविश्वास गमावून बसला. व्यसनं, मारामाऱ्या, हेवेदावे यांनी गावच्यागावं पोखरुन काढली. शेतीकडे दुर्लक्ष होऊ लागलं. शेतकऱ्यांची पोरं शेतात जाईनात. दिवसरात्र पुढाऱ्यांच्या अवतीभवती फिरणार, ढाब्यावरचं जेवणार, दारु ढोसणार आणि मुक्कामाच्या गाडीने रात्री अपरात्री केव्हातरी उशिरा घरी परतणार, हेच गावोगावचं चित्र बनलं. शेतमजूर मिळेनासे व परवडनासे झाले. लहरी निसर्ग आणि लुटारु बाजारव्यवस्था यांच्या कात्रीत सापडलेला शेतीव्यवसाय, आतबट्ट्याचा व्यवहार ठरु लागला. हे सगळचं विषण्णावस्थेत गेलेला शेतकरी आपली काळी आई विकू लागला…. आपल्याच हाताने स्वतःच्या व पुढील पिढ्यापिढ्यांच्या संरक्षणाची कवचकुंडलंस्वतःहून उतरवू लागला आणि राजकारणी, दलाल, व्यापारी ती सर्रास विकत घेऊ लागले. शहरांकडच्या शेतकऱ्यांच्या पलायनाला (Depeasantisation) वेग प्राप्त झाला…. रक्तपिपासू-शोषक व्यवस्थेला आयतेच स्वस्तातले ‘कंत्राटी-कामगार’ म्हणून शिक्का मारलेले ‘गुलाम’ मिळू लागले…. एका ‘महामानव’ बाबासाहेबानं शेकडो वर्षांच्या नष्ट केलेल्या ‘अस्पृश्यते’च्या जागी, राजकारणी ‘दुकानदारसाहेबां’नी मग ही, ‘नव-अस्पृश्यता’ रुजवायला घेतली!

खेड्यात मागे राहिलेल्या… अंगातलं त्राणच संपलेल्या, शेकडो-सहस्त्र शेतकऱ्यांच्या प्रतिवर्षी, रतीब घातल्यासारख्या आत्महत्या होऊ लागल्या. राज्यकर्त्या मराठा नेत्यांचं दारु बनविण्याचं धोरणं, सहस्त्रावरी हिरकणींच्या भाळीचं कुंकू पुसू लागलं! शेतकऱ्यांना व्यसनाची वाटदाखवून त्यांची वासलात लावणारे बदमाष मराठा-नेतेच, वैफल्यग्रस्ततेतून मसणाची वाटचालणाऱ्या शेतकऱ्यांना व्यसनीम्हणून हिणवू लागले…. जिवंतपणी शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खायला सवकलेली ही राजकारणी गिधाडं, या मेलेल्या शेतकऱ्यांच्या मढ्यावरचं लोणी खायलाही, मागे न हटता गावोगावी घोंघावू लागली!

५) राजाचं महापातक, प्रजेला भोगावं लागलं; पण, भोग भोगल्यानंतर प्रजा जागी होतेच… “असे कितीक हाल सोसते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी”!

भ्रष्टाचारग्रस्त राज्यकर्ती जमात, सहकारातून स्वाहा:कार करत संस्थांची संस्थानबनविणाऱ्या संस्थानिकांची जमात आणि चित्रपटांमधून दाखवली जाणारी अत्याचारी जमात” … म्हणून मराठा-समाज, त्यातल्या दहा टक्के प्रस्थापितवर्गामुळे, गेल्या तीन दशकांपासून आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे. शुक्राचार्यांचे झारीतले डोळे बनलेल्या, या सत्ताधारी घराणेबाज दहा टक्के लोकांनी कधि साधनसमृद्धी खाली झिरपूच दिली नाही आणि त्या प्रत्येक दोषाची शिक्षा, हा नव्वद टक्के मराठा दीर्घकाळ भोगतोयं. आपल्या सत्ता आणि मत्ताधारी जातभाईंच्या पापांची ही शिक्षा भोगत असताना बाकी समाजाकडून यः किंचितही सहानुभूती त्यांच्या वाट्याला येईना, हे अजून मोठं दुःख !

शहरातल्या लोकांचं, पाऊस समाधानकारक पडल्यावर सहजी उत्तमरित्या पीकपाणी होणार, हे मनात घट्ट रुजलेलं समीकरण. असंख्य नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांचा मुकाबला करताना शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला येतो; पण, शेतीशी त्याचं एक ‘जैविक नातं’ असतं…. तो एकवेळ जीव सोडेल; पण, ते नातं तो कधिही तोडू शकत नाही. म्हणून, गावात ओढूनताणून शेती करत, विकासाच्या परिघाबाहेर ढकललेला परित्यक्त-बहिष्कृत अभावी जीव म्हणून तो जगत रहातो…. मराठा-समाज, ते शापित जगणं जगत राह्यला. प्रसारमाध्यमं आणि सैराटसारखे चित्रपट पाहून सामाजिक भान तयार झालेल्या लोकांना, गावातला प्रत्येक मराठा.. प्रिन्स आणि आर्चीसारखा बुलेटवर दिसायला लागतो. प्रत्येक मराठ्याची विहीर, शेत, घर सैराटचित्रपटासारखं असेल असं वाटू लागतं. प्रत्यक्ष जाऊन पाहिलं तर, नसतो बंगला, नी नसतं हिरवगार शिवार…. सगळाच रखरखाट आणि विहीर असलीच तर, कोरडी ठाक असते. चित्रपट आणि वास्तव याची केव्हाचीच झालेली फार मोठी फारकत, ही मराठा समाजाची दुखरी नस आहे.

पाटील, हे खेडोपाडी अनेक जातीजमातींचं आडनांव असत, हे माहीत नसलेल्या सर्वांनाच ‘पाटील’ म्हणजे, चित्रपटातल्या निळू फुलेंचा, “बाई वाड्यावर या… असं म्हणणारा खलनायकी अवतार आठवतो (त्यात, बलात्कारी रांझ्याच्या पाटलाचे हातपाय तोडल्याची शिवछत्रपतींची कथा सर्वपरिचित असतेच… पण, रांझ्याचा ‘पाटील’ हा ‘मराठा’ नव्हता; मात्र, ‘जातधर्म-निरपेक्ष’ युगप्रवर्तक न्यायी राजा स्वतःच ‘कुळवाडी मराठा’ होता, हे लोकांना क्षणभर विसरल्यासारखं होत). रोज जीव तीळ तीळ तुटणारे खरे ‘पाटील’ पहायचे तर, विदर्भ-मराठवाड्यात जायला हवं…. तसचं, ठाणे ग्रामीण, रायगड-प. महाराष्ट्राच्या सांदीकोपऱ्यात जायला हवं. आपल्याच डोळ्यावर विश्वास बसणार नाही, इतका पूर्वीच्या अस्पृश्यांहूनही वाईट अवस्थेत हा अन्नदाताजगतोय. पीकविमा किंवा कर्जासाठी बँकेत गेलेल्या शेतकऱ्याला कुत्र्यासारखं हडतहुडत केलं जातं. साखर कारखान्यात, एका बाजुला शेतकऱ्याचा ऊस, यांत्रिक-चरकातून पिळला जात असताना; दुसऱ्या बाजुला स्वतः शेतकरीच कारखानदारांकडून पिळला जात असतो. याबाबत, स्थानिक नेत्याला किंवा साखरकारखानदाराला जाब विचारणं सोडाच; पण, साधा प्रश्नही करणाऱ्याचं ऊसाचं घाळप मुद्दामहून उशिरा करुन त्याचा ऊस पूर्ण वाळू दिला जातो. बियाण्यांच्या आणि खतांच्या व शेतकीसाहित्याच्या दुकानांतून आणि सावकारांकडून तशीच नडवणूक आणि अडवणूक. दुसरीकडे शहरांमधले ‘पाटील’ म्हणजे फक्त सातआठ हजार रुपड्यांचे फालतू पगार घेणारे ‘कंत्राटी कामगार/कर्मचारी’…. आज आहेत कामाला पण, उद्याची निश्चिती नाही, असे दिशाहीन. या खेडोपाड्यात आणि शहर-उपनगरांतून पसरलेल्या ‘नव-अस्पृश्य’ ते बद्दल बोलायला कुणीही तयार नाही. तेही या देशात, विशेषतः महाराष्ट्रात, ‘खाउजा’ (खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण) धोरणापश्चात गेल्या २५-३० वर्षांत एवढ्या संपत्तीची निर्मिती झाली, जेवढी गेल्या २५०-३०० वर्षांत कधि झाली नव्हती, अशी परिस्थिती असतानाही! प्रतिमा-भंजनामुळे एकाकी पडलेला, चेहरा काळंडलेला, गोंधळून गेलेला, हा हताश तरुण मराठा समाज संतप्त होऊन, ‘सोशल मिडियाच्या माध्यमातून कळत नकळत संघटित व्हायला लागला…. मध्यपूर्वेतल्या अरबस्प्रिंगचीच ती जणू एक जितीजागती चाहूल होती! शेताचे आणि मनाचे बांध ओलांडत मराठातरुणाईचा प्रवास सुरु झाला. पण, तो किती संघटित झालाय, ‘सैराटझालाय…. याची कल्पनाच कुणाला नव्हती. वर्ष२०१४ पासून गेल्या दोन वर्षांत मराठा तरुणांचे, समाजमाध्यमांवर जणू सम मंथनच चालू झाले. शंकरासारखं हलाहलकंठात धारण करण्याची क्षमता संपलेला मराठा-बळीराजा, थेट विषप्राशन करुन हजारोंच्या संख्येने याअगोदरच बळी गेलेला होता (कदाचित, ‘बळीराजा’ ही उपाधी वेगळ्या अर्थानं मराठा-समाज प्रत्यक्षात उतरवत होता). या पार्श्वभूमीवर हातात ‘अमृतकलश’ घेऊन बाहेर पडायच्या जिद्दीनचं मराठा-तरुणाई उसळायला लागली…. पण, या समुद्रमंथनातून त्यांच्या रिकाम्या हाती ‘अमृता’ची संजीवनी पडणार की, ‘हलाहल’… हे, ती मराठा-तरुणाई, कुठल्या राजकीय नेतृत्त्वाच्या हातात आपल्या भविष्याचं सुकाणू देते यावर ठरेल…. आणि, ही रक्तपिपासू-शोषक धनदांडग्या मुजोरांनी बनवलेली ‘व्यवस्था’, ती मराठा-तरुणाई आमूलाग्र बदलते की, वरवरची ‘आरक्षण’ (जे कायद्याच्या कसोटीवर टिकणारं नाही) वा ‘अॅट्रॉसिटी कायदा’ बदलाची राजकीय मलमपट्टीच केवळ करुन घेऊन थांबते, यावरच येणाऱ्या काळात हे ठरेल!

६) जातीपाती-जातधर्माचं राजकारण अंतत: घातकच…. मराठा समाजाचं नेमकं चुकलं कुठे ???

भाषिक अस्मिता आणि जातीय अस्मिता, यात मोठा फरक आहे. जोवर, ‘अवघे विश्वचि माझे घरं, ही महन्मंगल वैश्विक भावना, जगभर विखुरलेल्या सर्वच मानवीसमूहात तयार होत नाही (सध्याच्या जागतिक नैसर्गिक पर्यावरणीय व महाअरिष्टांच्या पृष्ठभूमिवरसुद्धा ते जवळपास अशक्यच दिसावं, हे केवढं मोठं मानवजातीचं दुर्दैव) तोवर, ‘राष्ट्र-संकल्पनेवर आधारित जागतिक जीवनव्यवहारांना मातृभाषा’, ही राष्ट्रीय भावना निर्माण करणारी सर्वात प्रबळ प्रेरणा, म्हणून कमालीची महत्त्वाची राहाणारचं! मानवीसमूह ‘जातधर्माविना’ कुठलीही अडचण न होता (उलटपक्षी, कितीतरी अधिक गुण्यागोविंदाने राहतील) आरामात जगू शकतील…. पण, भाषेविना ‘मानवी व्यवहार’ खूपच कर्मकठीण! भाषा आणि संस्कृति, या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शिवाय, जगभरातील असंख्य स्थानिक भाषांमध्ये, तिथल्या तिथल्या भौगोलिक निसर्गपर्यावरणीय परिस्थितीत मानवजातीला टिकून राहण्यासाठी अत्यावश्यक असलेलं पिढ्यानपिढ्यांचं शहाणपणदडलेलं असतं. त्यामुळेच, ‘भाषिक अस्मि ताही राष्ट्रनिर्मितीचा मजबूत पाया व आधार बनून, ‘राष्ट्रीय चारित्र्यघडवण्यात अहम् भूमिका बजावते; तर, विभिन्न जातधर्मीय अस्मिता’, या नेहमीच राष्ट्रकार्यात आणि राष्ट्रीय चारित्र्य घडवण्यात मोठा अडथळा बनतात (उदा. बांगला देशची निर्मिती, ही ‘धर्म’ एक असूनही उर्दू आणि बंगाली, या दोन वेगळ्या भाषिक अस्मितांमुळेच झाली ) !

जातधर्माचं राजकारण, हे राष्ट्रउभारणीच्या कार्यात अंति घातक असतं, हे जाणणारा शिवछत्रपतींइतका द्रष्टाराजकारणी शोधूनही सापडणार नाही! तलवार गाजवणारे तर इतिहासात अनेक राजेमहाराजे होऊन गेले; पण मग, शिवछत्रपतीचं महानका ? कारण, “शिवछत्रपती म्हणजे नुसती तलवारबाजीनव्हती; तर, उच्चकोटीच्या जीवनमूल्यांसाठी लावलेली प्राणाची बाजीहोती! हा असा एकमेव रयतेचा राजा, जो आपल्या राजकीय कारकीर्दीत तंतोतंत श्रीकृष्णजगला… ज्यानं, न्यायनीतिने प्रजाहितदक्ष राज्यकारभार करताना जातधर्माचा विचारही मनास स्पर्श दिला नाही. म्हणूनच, त्याच्या झेंड्याखाली सर्व प्रजाजन जातधर्माचे अभिनिवेश फेकून देऊन एकवटले होते. अंगरक्षकापासून ते किल्लेदार-सरदारबरकदारांपर्यंत मागासवर्गीयमुस्लिम असे सर्वच जातीजमातींचे लोक शिवछत्रपतींच्या पदरी केवळ स्वकर्तृत्त्वाच्या बळावर होते…. आरक्षणाच्या कुबड्या घेऊन नव्हे !

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना, पेशवाईच्या काळापासून विशेष फोफावलेला ‘अस्पृश्यता’ नांवाचा सामाजिक महारोग निवारण्याकामी व काळाच्या ओघात त्यामुळे मागे पडलेल्या दलित-मागासवर्गीयांच्या एकूणच अभ्युदयासाठी…. काळाची गरज म्हणून जरी, सुरुवातीपासून जातीय भूमिका घेऊन समाजकारण-राजकारणात वावरावं लागलं असलं; तरी, त्यांचा पुढील राजकीय प्रवास हा तळागाळातील शोषित-समाजाची धनदांडग्या, मुजोर व शोषक ‘व्यवस्थे’ विरुद्ध एकजूट उभारण्याकामी ‘जातधर्म निरपेक्ष’ असाच ‘ऊर्ध्वगामी’ होता. ‘आरक्षण’ हे दुधारी शस्त्र आहे, हे जाणूनच या ‘महान प्रज्ञावंता’नं त्याला राज्यघटनेत ‘कालमर्यादा’ आखून दिली होती! हा महामानव गर्जून सांगत होता, “वेळप्रसंगी संकटांशी दोन हात करा. मात्र, स्वतःच्या आयुष्याला योग्य आकार द्या. स्वतःच किड्यामुंग्यांप्रमाणे राहिलात; तर, दुसऱ्याने आपल्याला तुडविले म्हणून रडत बसू नका !” आणि, हे ही तो सांगत होता की, नेत्याची स्तुती करुन त्याला देवपदावर चढवू नका. कारण, त्यामुळे तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून आणि प्रयत्नापासून दूर जाता. त्यापेक्षा संघटन करा. शिस्त, शिक्षण आणि धाडसाच्या मार्गाने स्वत:ची उन्नती करुन घ्या” “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा”, ही बुलंद घोषणा कुणाची ???

तेव्हा माझ्या नवतरुण मित्रांनो, जातधर्माची सार्वजनिक जीवनातून एक्स्पायरी डेट’, खरंतरं केव्हाचीच होऊन गेलेली आहे…. जगावर कोसळलेल्या पर्यावरणीय आणि नैसर्गिक संकटांच्या पार्श्वभूमीवर तरी आपण आता, जात-धर्माचे विचार पूर्णपणे बाजूला फेकून देणार आहोत की, नाही? माणूस रानटी अवस्थेतून बाहेर पडण्यापासून, तो बऱ्यापैकी सुसंस्कृत होईपर्यंत, जातधर्मांनी जी काय आपली भूमिका पार पाडायची होती ती बऱ्यावाईट पद्धतीने आजवर निभावून नेलीयं. जातधर्मांना अगदीच हवं; तर, तुमच्या घरात प्रार्थनास्थळापुरतं मर्यादित ठेवा… सार्वजनिक-राजकीय जीवनात त्यांना बिलकूल थारा नको !

व्यवहारतः असं दिसत की, काही फार मोठे समराजधुरिण-विचारवंत महाभारतातल्या ‘धर्मराजा’च्या रथासारखे व विचारांसारखे, जमीन सोडून वा वस्तुस्थितीकडे डोळेझाक करुन आयुष्यभर चालत रहातात व तस समाजाला चालवायचा अट्टाहास धरतात; तर दुसरीकडे बहुसंख्य असलेला तळागाळातला समाज हा अगदीच प्राथमिक स्वरुपाच्या प्रेरणांद्वारे ‘जातधर्मा’च्या भूमिला आणि भूमिकेलाच चिकटून रांगत सरपटत रहाणं पसंत करतो, ज्यात त्याला वाटणारी सुरक्षिततेची भावना सुखावणारी असते…. या दोन्ही गोष्टी, सांप्रतकाळी सारख्याच चुकीच्या! स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीयस्तरीय व अंति वैश्विक पातळीवरचं असं, सर्वच बाबींना एकाचवेळेस सन्मानानं आपल्या कवेत सामावून घेणारं आणि नैसर्गिक न्यायतत्त्वानं केलं जाणारं प्रामाणिक व निसर्ग-पर्यावरणस्नेहीसमाजकारणराजकारण करणं, ही फार मोठी काळाची गरज आहे.

जातीपाती-जातधर्माच्या गलिच्छ राजकारणाची अंतिम परिणती, ही अशीच. म्हणजे, प्रत्येक जातीपाती-धर्माचे … तळागाळातील लोक उध्वस्त होताना, तुम्हाला भारतभर दिसेल. जातीतले ‘स्मार्ट’ लोक (म्हणजेच, बदमाष लोक) आपल्या जातीजमातीतील भोळ्याभाबड्या लोकांना जातधर्माची ‘अफूची मात्रा’ निरंतर पाजत रहातात आणि आपला राजकीय व आर्थिक स्वार्थ पडद्याआडून व्यवस्थित साधून घेत रहातात आणि हे उद्योग विनासायास पिढ्यानपिढ्या बिनबोभाट चालूच रहातात…. त्यातूनच, आमदाराचा पोरगा आमदार, मंत्र्याचा पोरगा-पोरगी मंत्री वगैरे वगैरे होतच रहातात. या घराणेबाज राजकारण्यांच्या घरात, पाळणा हलला रे हलला की, समजायचं, “महाराष्ट्राचा नवा लोकनेताजन्माला आला” ! काही मराठा राजकारणी घराण्यांमध्ये तर, दोन दोन आमदार-खासदार काही घराण्यांत तर, सर्व भावंड वेगवेगळ्या पक्षात विखुरलेली. म्हणजे, सत्ता कुणाचीही येवो, यांच्या घरातल्या भ्रष्ट-दलाली व बेकायदा व्यवहारांना कुठल्या ना कुठल्या प्रस्थापित सत्ताधारी पक्षाचं संरक्षण मिळणारच…. वा रे व्वा, कम्माल झाली! मित्रांनो, हे सगळं आपणचं तर, त्यांना मतदान करुन घडवतो ना ?

त्यामुळेच, समाज आदिवासी असो वा ओबीसी, मागासवर्गीय असो वा मुस्लिम, मराठा असो धनगर…. नेते भयानक गब्बर आणि जनता साध्या सन्मानजनक जगण्याला मोताद झालेली, हेच विदारक चित्र तुम्हाला सर्वत्र दिसेल. तेव्हा, तुमच्या जातीचे नेते काय करत होते… या युक्तिवादाला फारसं महत्त्व देता येत नाही. वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक मिळून चौदा वर्षे मुख्यमंत्रीपद होते, तरीही वंजारी समाज गरीब आणि दरिद्री का राहिला? अंतुले मुख्यमंत्री झाले म्हणून मुसलमांनांचे प्रश्न सुटले का? विदर्भ-मराठवाड्याकडे इतकी वर्षे मुख्यमंत्रीपद होते, त्यांनी का नाही आपल्या विभागाचा विकास करुन घेतला? रामदास आठवले मंत्री झाले म्हणजे, दलितांचे प्रश्न सुटणार का की, महादेव जानकर झाले म्हणजे, धनगरांचे प्रश्न निकाली निघणार ? हे प्रश्न जसे निरर्थक आहेत; तसेच, अमूक एका जातीचा इसम मंत्री आणि मुख्यमंत्री झाला म्हणून त्या जातीचा सर्वंकष उद्धार झाला पाहिजे, हे गृहितकच मुळात चुकीचं आहे. कारण, या कोणाकडेही मूलभूतरित्या ‘व्यवस्था-बदला’साठी ना कार्यक्रम, ना कुठली ‘राजकीय इच्छाशक्ती’! हे आपापल्या समाजघटकांसाठी छोट्यामोठ्या कामांची मलमपट्टीच फक्त करत रहाणार आणि दुधखुळी जनता तेवढ्यावर समाधान पावत फसत रहाणार…. त्यामुळेच, ‘मूळ रोग’ फसफसत राहून वाढल्याने, शेवटी ही अशी रस्त्यावर उतरायची वेळ येते! भ्रष्ट मराठा नेते जसे बदमाष होते व आहेत; तसेच, सत्तेत सहभागी झालेले इतर जातीचे नेतेही बदमाष होते व आहेत. ‘मराठ्यां’सह या सगळ्याच धनदांडग्या, घराणेबाज-दलाल नेत्यांना, त्यांची जागा दाखविण्याची वेळ आलेली आहे…. राजकपूरच्या ‘सत्यम् शिवम् सुंदरम’ चित्रपटातला एक ‘संवाद’ आहे, “दिल टूटनेकी आवाज नही होती, बिजलियाँ गिरती है, आसमान फट जाता है और दुनिया तबाह हो जाती ही ‘तबाह’ झालेली दुनिया केवळ शेतकऱ्यांचीच नव्हे; तर, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, तंत्रज्ञ, व्यवस्थापकिय तज्ज्ञांसारख्या उच्चशिक्षिकांसोबतच शहरातल्या कामगारांचीही आहे…. फक्त, या ‘मूक-आक्रोशा’ला ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्यां’ सारखं कुठलही ‘ब्रॅण्डिंग’ नाही एवढचं!

७) मनुस्मृतीला जाळणं सोप्पं; पण, ‘नव्या मनूचा संदेश जाणणं कठीण… जो, ब्राह्मणांनी संकटकाळी जाणला !

ब्राम्हणांनी काळाची पावलं ओळखली. शिक्षण आणि नोकरीला प्राधान्य दिलं… मागासवर्गीय बाबासाहेबांच्या आदेशानंतर अगोदरपासूनच शहरात दाखल होऊ लागले होते. पण, बहुसंख्य मराठे शेती करत राहिले. ज्या, ‘मराठाराजकारणावर मराठे विसंबून राहिले, त्या मराठाराजकारणानेच शेतकरीम्हणून खेडोपाड्यात त्यांचा दारुण विश्वासघात केला! ब्राह्मणांना गांधीवधानंतर ‘सळो की पळो’ करण्यात आलं…. महाराष्ट्राच्या खेडेगावातली त्यांची घरदारं जाळूनपोळून टाकण्यात आली, जमीनजुमला-ऐवज लुटण्यात आला (त्यात ‘कूळ कायद्याचाही पुढे मोठाच हातभार लागला)…. हे कुकर्म करणारे ‘हात’ कुठल्या जातीजमातीचे होते (दलित-मागासवर्गीयांचे निश्चितच नव्हते), याची साधी चिकित्साही ‘न’ करता, एकदाही मागे वळून ‘न’ पाहता, त्यांनी मनोमन शून्यातून पुन्हा विश्व उभं करण्याचा निर्धार केला आणि शहरं गाठली! पाठोपाठ, त्यांच्यावर काही वर्षांच्या फरकाने मागासवर्गीयांच्या ‘आरक्षणा’ची कोसळली व नंतर ती कुऱ्हाड, पुढे अधिकच व्यापक-धारदार बनत गेली. महाराष्ट्रात प्रथम यशवंतराव चव्हाणांनी व नंतर देशभरात मंडलआयोगानं नवबौद्धांना व इतर मागासवर्गीयांना आरक्षणदेऊन ब्राम्हणांच्या हातातलं जणू कमंडलूच काढून घेतलं…. या दोन महासंकटांनंतर, “केला पोत बळेची खाले, ज्वाला तरी ते वरती उफाळे”, या विजिगीषु वृत्तीने ब्राह्मणांनी आपली भिक्षुकी बव्हंशी सोडली व पूर्वीची ऐतखाऊवृत्ती दूर भिरकावून दिली…. त्यांनी आरक्षणासाठी किंवा इतर सवलतींच्या कुबड्यांसाठी मुळूमुळू रडत बसता, खडतर काळाचं आव्हान स्विकारलं व संकटाचं संधित रुपांतर करत उद्यमशीलता अंगी बाणवली…. बहुसंख्य ब्राह्मण मुलामुलींनी खेळणं-बागडणं, संध्या पूजाअर्चा, सण-उत्सव (ब्राह्मणांचा गणपती असलाच तर, ‘दिड दिवसा’चा आणि आमचा मात्र पाचदहा दिवसांशिवाय ‘विसर्जना’ला तयारच होत नाही…. गल्लोगल्लीतले विविध प्रकारचे वेळखाऊ सार्वजनिक ‘राजा’ गणपती आहेतच जोडीला… शिवाय, ‘मराठी समय काळ’ बरबाद करणाऱ्या जत्रा, भजनं-किर्तनं, बैठका, तमाशे हे गावोगावी; तर, शहरात दहीहंड्या, सत्यनारायण पूजा, गरबे इ. रतीब घालायला मौजूद आहेतच) या सगळ्यालाच मुरड घातली व काळाची पावलं ओळखत, जीवघेण्या स्पर्धेला तोंड देत दिवसरात्र अभ्यास करत उच्चशिक्षण पुरी केली, संगणक व माहिती तंत्रज्ञानाच्या ‘नव्या मनू’च्या संशोधनात त्यांनी स्वतःला गाडून घेतलं (मनुस्मृतीला जाळणं सोप्पं ….. पण, ‘नव्या मनू’चा संदेश जाणणं कठीण), गायन-वादनात व टीव्ही सिनेमात ते जन्म जात प्रतिभेनं व मेहनतीने चमकू लागले, हिंम तीने त्यांनी बँका काढल्या आणि आपल्या जमातीला चांगल्या पगाराच्या नोकऱ्या देत… त्या ‘न’ ‘बुडवता सक्षमपणे चालवायलासुद्धा ते लागले (जेव्हा, तुमचे मराठा नेते सहकारातून ‘स्वाहा:कार’ उभा करत होते आणि मागासवर्गीय पुढारी आरक्षणाचा ‘जप’ करत, मनुस्मृतीला आणि ब्राह्मणांना शिव्याशाप देण्यात धन्यता मानत होते), कित्येकांनी स्वकर्तृत्त्वावर अमेरिका युरोप- इंग्लंडचा ‘साता समुद्रापलीकडचा मार्ग, जो त्यांनी पूर्वी निषिद्ध म्हणून प्रतिपादला होता, तोच काळानुरुप धरला आणि काळाचं आव्हान निधड्या छातीनं स्विकारत, स्वतःची ‘आर्थिक प्रगती करुन घेतली. ज्या ब्राह्मण मुलाम लींनी ही कष्टदायक अभ्यास-संस्कृतीव उद्यमशीलता अंगी बाणवली नाही, ते आजही दरिद्री आहेत आणि पूर्वीही दरिद्री होते… म्हणूनच तर आपल्या कुठल्याही पौराणिक कथांची सुरुवातच आटपाट नगरीत एक गरीब ब्राह्मण रहात होता किंवा दारिद्र्यापोटी महाभारतातल्या अश्वत्थाम्याला त्याची आई, दूध म्हणून पीठ पाण्यात कालवून द्यायची”, असे उल्लेख आढळतात (मी हे सगळं माझ्या तरुण मराठी, मुस्लिम व मागासवर्गीय मुला-लामुलींना प्रेरणा मिळावी म्हणून, कुणाचीही कुठल्याही प्रकारे जातीय भलामण न करता, वस्तुस्थिती निदर्शक म्हणून सांगतोयं. प्रतिस्पर्ध्याकडूनही चांगले गुण घेण्याची आपली सकस मानसिकता नसेल, तर आपल्या समाजाची प्रगती खुंटलेलीच राहील. श्रीकृष्णानेही महाभारत युद्धाप्रसंगी पितामह भीष्म शरपंजरी पडले असताना, धर्मराजाला त्यांच्याकडून ‘राजधर्मा’चं गुह्यज्ञान घ्यायला सांगितलं होतच की! तसेच, या उच्चवर्णीयांनी स्विकारलेल्या प्रदूषण व कार्बनकेंद्री’ पाश्चात्य विकासाच्या प्रारुपाचे व आधुनिक चंगळवादी जीवनशैलीचे निसर्ग-पर्यावरणीय आयाम, त्याचे सामाजिक व कौटुंबिक भलेबुरे परिणाम, त्यांची संघीय तुसडी व शोषक मनोवृत्ती…. या बाबी, मी क्षणभर बाजूला ठेऊन लिहतोयं, हे कृपया ध्यानात घ्या ! )

८) खेडेगावात मराठा राजकारणाने आणि शहरात मराठी-राजकारणाने दगाबाजी करुन मराठ्यांच्या पाठीत केला वार……

१९७२च्या दुष्काळाने खेडोपाड्यातले उरलेसुरले ब्राह्मण शहरांकडे वळले आणि ज्या मराठाशेतकऱ्यांवर खडी फोडायची वेळ आली, ते मराठे नाईलाजापोटी शहरात कामगारम्हणून दाखल झाले….. तोपर्यंत, महाराष्ट्रात १९७० सालानंतर फसफसलेल्या, “मराठी माणसांच्या नांवाने गळे काढणाऱ्या; पण, प्रत्यक्षात मराठी माणसांचे गळे कापणाऱ्या, दगाबाज मराठीराजकारणाने मुंबई-ठाण्यात हातपाय पसरलेले होते. शहरात दाखल झालेल्या या मराठाकामगारांचा, ‘मराठी-राजकारणाकडून भांडवलदारांशी हातमिळवणी करत सर्रास विश्वासघात केला जाऊ लागला. फसवे पगार बोनसवाढीचे करार करुन मराठी कामगारांना भीकेसलावूनच, ‘बीकेससारख्या कामगारसंघटना स्वस्थ बसल्या नाहीत; तर मोठ्या भांडवलदारी नजराण्याच्या पेट्या वर पोहोचवत, त्यांना थेट कंत्राटीकामगारबनवून मोकळ्या झाल्या. प्रथम मुंबई-ठाण्यात आणि पुणे-नाशिक, नागपूर, रायगड, पुणे पिंपरी-चिंचवडमध्ये मराठी कामगारांच्या गुलामगिरीत ढकलून दिल्या गेलेल्या आणि ‘कंत्राटी कामगार/कर्मचारी’ नांवाचा भाळी शिक्का मारलेल्या, ‘नव-अस्पृश्यां’च्या पलटणीच्या पलटणी, महाराष्ट्रभर उभ्या राहू लागल्या (त्यातल्या त्यात, ठाणे-मुंबईतले ‘मराठा’ डबेवाल्यांची आणि माथाडी कामगारांची त्यांच्या संघटनशक्तिच्या बळावर बरी परिस्थिती म्हणायची). असुरक्षिततेची डोक्यावर कायमची टांगती तलवार आणि तुटपुंजं वेतन (बहुश: बेकार भत्याच्याही लायकीचं नसलेलं किमानवेतन) याच्या कात्रीत सापडलेल्या मराठा तरुणाईला, भविष्यात वाढून ठेवलेलं अंधाराचं ताटहळूहळू दिसू लागलं. जैनगुज्जूमारवाडी मालक, मराठी कामगारांचं शोषण करत आले… ते निदान भांडवल गोळा करून, यंत्रसामुग्री उभारुन, व्यवस्थापक म्हणून उत्पादन काढून तरी; पण, १९७० नंतर मराठी माणसांच्या नांवाने गळे काढणाऱ्यांनी, जे मराठी माणसांचं बिनभांडवलीशोषण चालवलयं, ते जास्त घातकी आहे आणि ते उशिरा का होईना, पण उध्वस्ततेकडे वाटचाल करणाऱ्या सैराटमराठी तरुणाईला हळूहळू समजायला उमगायला लागलयं, नशीबच म्हणायचं!

शहर-उपनगरात राहत्या घरांच्या किंमती मासिक पगाराच्या हजारपटीत पोहोचलेल्या घरातल्या एखाद्या मोठ्या आजारपणाच्या खर्चाच्या ओझ्यानं जेमतेम शर्थीनं उभं केलेलं ‘घरकुल’ डोळ्यासमोर कोसळू लागलेलं…. मुलांच्या मोठ्या शिक्षणाच्या खर्चाएवढा धड पगार नसल्यानं छातीवरचं दडपण सतत वाढलेलं! मग अशा वैफल्यग्रस्त मनोवस्थेत, आपल्या सामायिक बुद्धी व समजुतीने प्रथम महाराष्ट्राची नव-उद्योगनगरी औरंगाबाद (संभाजीनगर) व नंतर पुढे उस्मानाबाद, बीड, परभणी… असे करत करत उत्फूर्तपणे लाखोंचे ‘महामोर्चे’ महाराष्ट्राच्या रस्तोरस्ती अत्यंत शिस्तबद्धपणे व शांततेने धडकू लागले.

अवघं भावविश्वच उध्वस्त झालेल्या करोडो आत्म्यांचा ‘मूक-आक्रोश’ आपल्या अनाहत स्पंदनांनी आसंमताला चिरत, रस्तोरस्ती फिरू लागला. मराठा क्रांतिमोर्चाचा चेहरामोहरा सकृतदर्शनी आक्रमक वाटत असला, तरी त्या पुढेमागे कोपऱ्यात, रांगेत खाली मान घालून सहभागी झालेले गोरगरीब उन्हात रापलेले चेहरे बारकाईने बघितले तर सहजी आकळेल की, ते सगळे पिचलेले, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले, मुलांच्या शिक्षणाच्या चिंतेने खचलेले आमचे मराठाशेतकरी बांधव आहेत व त्यांची तरुण महाविद्यालयीन मुलमुली आहेत आणि शहरातले रक्तपिपासूशोषक व्यवस्थेच्या वरवंट्याखाली दोन पिढ्या भरडले गेलेले कंत्राटीकामगार/कर्मचारी आहेत.

आळीपाळीने प्रत्येक राजकीय पक्षावर विश्वास ठेऊन थकलेल्या…. फसगत झालेल्या या लोकांची, महाराष्ट्राने आपल्या हलाखीकडे…. सातत्याने होत असलेल्या आपल्यावरील अन्यायाकडे लक्ष द्यावं, ही एवढीचं प्रामाणिक इच्छा आहे. एकवार, या शिवरायांच्या महाराष्ट्राने डोळ्यातली स्वप्न विझलेल्या आपल्या तरुणपोरांकडे पहावं, आपल्या वापरुन विशविशीत झालेल्या जीर्ण वस्त्रांकडे…. पाण्याविना फाटलेल्या-भेगाळलेल्या जमिनीकडे पहावं, एवढ्याचसाठी त्यांची उन्हातान्हातपावसापाण्यात तडफड चालू आहे! हे एवढे उत्पात घडत असतानाही मराठी-टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांना, हा करोडो मराठा- आत्म्यांचा मूकआक्रोश…. चित्रपटातला मुकावाटतो, यातूनच त्यांच्या पांढरपेशा श्रीमंती थाटाच्या कार्यालयांमधल्या आणि महागड्या गाड्यांमधल्या राजकीय भूकाकिती बेगडी व संवेदनाशून्य होत्या व आहेत, ते मराठी शेंबड्या पोरालाही या निमित्ताने कळलं, हे उत्तमच !

९) सौ चूहे खाके, बिल्ली चली हाज को

आज, मराठवाडा, विदर्भ, पुणे, कोकणापासून मुंबईठाण्यापर्यंत मराठा राजकारणी सरंजामदारसुभेदार, मराठाआरक्षणाच्या गर्जना करत महामोर्चाचं आयोजन करताना दिसतायतं…. ते किंवा त्यांची राजकारणात धुडगूस घालणारी धनदांडगी-मुजोर मुलं, किती मराठी रक्त आणि घाम, मंत्रालयापासून कारखाने कार्यालयांपर्यंत कंत्राटदारबनून विकतायतं, ते एकदा मराठातरुणाईनं जरा अभ्यासून पहावचं. आपल्याच मतदारसंघापुरतं प्रमाणाबाहेर अप्पलपोट्या वृत्तीने पहात, ‘मतदारसंघांची कायमची बांधाबांध करणाऱ्या स्मार्टघराणेबाज नेत्यांवर अंकुशलावला गेलाच पाहीजे. कारण, त्यातूनच, या छोट्यामोठ्या सर्वपक्षीय नेत्यांची आपापसात संगनमत करुन (Coalition Of Connected People), स्वतःच्या मतदारसंघांची नजरेत सहजी भरणारी अतिरेकी बांधबंदिस्ती व बाकी मतदारसंघांची किंवा विभागांची (यातूनच, विदर्भ-मराठवाडा-कोकणासारखे प्रश्न उभे राहीले आहेत) पिळवणूक होत राहते. त्यांच्या तथाकथित विकसित मतदारसंघांचा उदोउदो केला जाऊन, ती हवा डोक्यात शिरलेले हे नेते मग, सतत निवडणूका जिंकत रहातात आणि काही काळातच देशातले ‘नवे संस्थानिक’ बनतात ! स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बॅ. वल्लभभाई पटेलांनी स्वातंत्र्यापूर्वीची संस्थानेमोडीत काढली; पण स्वातंत्र्यापश्चात महाराष्ट्रात १६८ मराठा राजकारणी घराणी नवेसंस्थानिकम्हणून उदयाला आली…. याच सरंजामदारसुभेदारांनी आपल्या जातीजमातीला मतांसाठी वापरुन घेत, त्यांची घोर फसणूक-पिळवणूक करुन त्यांना रस्त्यावर आणलयं. तरी, गेंड्याची कातडी पांघरुन ते निर्लज्जपणे, त्या महामोर्चाची पिछाडी सांभाळत व मराठाआरक्षणाची तारस्वरात मागणी करत माध्यमांवर बिनदिक्कत वावरतायतं.

१०) श. प.म्हणजे, मराठा-समाजाला मिळालेला शाप’, असं आज मराठा तरुणाई समाजमाध्यमांतून का बरसतेयं….???

महाराष्ट्राचे तथाकथित ‘जाणते राजे’ (की, तेल लावलेले पेहेलवान ???) शरद पवारांनी काय केलं…. तर, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले जनतेला लुटणारे आणि भुलवणारे राजकीय सरंजामदार सुभेदार उचलले आणि थेट त्यांची मोट बांधत काँग्रेमधून फुटून निघून एक ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ (त्यातही, ‘काँग्रेस’ हे नांव त्यांनी ‘कुंकवाचा आधार’ म्हणून वापरलच…. अनेकवार, अनेक काँग्रेसजनांकडून आव्हान दिलं गेल्यानंतरही, ते जोडनांव बदलण्याची त्यांची कधि हिंमत झाली नाही, हे उघड गुपितच) नांवाचा सरंजाम दार- सुभेदारांचा गोळाबेरीज छाप (पवारांचं हेच सामान्यांसाठी घातकी असललं राजकारण, ‘बेरजेचं राजकारण’ या गोंडस नांवाखाली कायमचं कुप्रसिद्ध झालं) ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ काढला… ज्याची कटू फळे शेवटी सामान्य मराठी जनतेला (त्यात मराठा, बिगर मराठा सारेच मराठी आले) दीर्घकाळ भोगावी लागणार आहेत. १९७० सालानंतरच्या पवार ठाकरे घराण्यांच्या राजकारणाने, महाराष्ट्राच्या तरुणाईचं सामाजिक भानआणि नीतिमत्ताच अवघी नासवून टाकलीयं… त्यामुळेच आजचं राजकारण म्हणजे, ‘माफियांचं आणि भ्रष्टाचाराचं उघड उघड माहेरघर बनलयं… परिणामतः, नेसूचं सोडून डोक्याला बांधलेली ही सैराटराजकीय फौज लुटत सुटली ती, जैन-गुज्जूमारवाडीसिंधी भांडवलदारांचे हात धरून, आपल्याचं हाडामांसाच्या मराठा शेतकऱ्याला आणि मराठी कामगाराला! निवडणुकांच्या तोंडावर आणि एरव्ही सार्वजनिक सण-उत्सव-पूजा साजरे करण्याकामी, ही मंडळी आपल्या या भयानक लुटमारीच्या हिश्श्यातला काही भाग, मराठी सामान्य जनतेचे आत्मेखरीदण्यासाठी सर्रास वापरु लागले… सामान्यजनांना लुटणारे नोकरशहा कष्ट घेऊन ‘शिकत’ तरी वर आले; पण हे राजकारणी, लोकांचे आत्मे बोली लावून ‘विकत’ घेत वर आले. ‘रॉबिनहूड’सारखी आपली एक फसवी प्रतिमा स्थानिकांमध्ये रंगविण्यात आजवर यशस्वी झाले. तरी, आज ते ‘रॉबिनहूड’ नव्हेत तर, ‘रॉबिंगहूड’ आहेत, हे विदारक ‘सत्य’ शेवटी जनतेसमोर ‘मराठा क्रांतिमोर्चा’ च्या स्वरुपात आलचं. कोकणात एक म्हणं आहे, “रात्रीच्या अंधारातला समुद्रातला ‘हाग’, सकाळी तरंगताना दिसल्याशिवाय रहात नाही” ! तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईकांनी उल्हासनगरच्या पप्पू कलानीसारख्या माफिया राजकारण्याचे गैरधंदे उध्वस्त करत (तेव्हाचे ठाणे जिल्हाधिकारी मधुकर पाटील यांनी, पप्पू कलानीचे काळ्या गुन्हेगारी धंद्यांतून उभारलेलं काँक्रिटचं साम्राज्य, मुख्यमंत्री सुधाकरराव नाईकांच्या आशिर्वादाने ग्रॅनाईटचे सुरुंग लावून उध्वस्त करायला घेतलं होतं…. तेव्हा, याच शरद पवारांचे ठाण्यातील वसंत डावखरेंसारखे चेले, पप्पू कलानी नांवाच्या माफियाच्या मदतीसाठी माशासारखी तडफड करत होते) त्याला जेरीला आणल्यानंतर, त्यांची वाढती लोकप्रियता पाहून शरद पवारांनी मुंबईतील १९९२-९३च्या दंगलीचं निमित्त साधून (मुंबईच्या १९९२-९३च्या दंगलीत सुधाकरराव नाईक सरकार, दंगेखोरांचा समाचार चांगल्याप्रकारे घेत असतानाही), सुधाकरराव नाईकांचं सरकार पाडण्याचं पातक केलं व केंद्रातलं मंत्रिपद सोडून, पप्पू कलानीसारख्या आपल्या बगलबच्च्यांना वाचविण्यासाठी स्वतः पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनल्याची चर्चा, त्यावेळेस सगळ्याच वर्तमानपत्रांतून चांगलीच रंगली होती. सध्या शरदरावांना छगनरावांची आणि त्यांच्या कुटुंबकबिल्याची नसली तरी, भ्रष्टाचाराच्या ‘सिंचना’चे, कथितरित्या आरोप असणाऱ्या आपल्या कुटुंबियांची (उदा. अजित पवार) व सुनिल तटकरेंसह (ज्यांनी, रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वेडावाकडा गैरवापर करुन रोह्यातील आमचा सँम्पट्रॉन निरलॉन कंपनीतील प्रदीर्घ ऐतिहासिक संघर्ष, राष्ट्रवादीचे स्थानिक गुंड व पोलीसांची दंडुकेशाही बेकायदा वापरत जबरदस्तीने संपवला होता) सगळ्या बगलबच्च्यांची काळजी आहेच. सुनिल तटकरे, अजित पवार कुठल्या जातीचे ??? हे अजित पवार, गेल्यावर्षी दुष्काळाने होरपळणाऱ्यांच्या भळभळणाऱ्या जखमांवर मीठ चोळत, “कोरड्याठाक धरणात पाणी आणण्यासाठी, मी लघुशंका करु काय”, अशी अत्यंत असभ्य व संवेदनाशून्य भाषा वापरत होते; तेव्हा, दुसऱ्या बाजुला त्यांच्या काकांच्या क्रिकेटच्या साम न्यांसाठी मुंबईमहाराष्ट्रात करोडो करोडो लिटर पाणी निरर्गलपणे मैदानात ओतण्याचा घाट घातला जात होता! केवळ आणि केवळ, न्यायालयीनहस्तक्षेपामुळेच या संतापजनक गोष्टी थांबल्या. ज्या ‘बीसीसीआय’चे रोज धिंडवडे निघतायतं (बघा, ‘बीसीसीआय’ ला सुद्धा कसा ‘संगति संग दोषेण’ लागला तो), त्या बीसीसीआयच्या सर्वोच्च पदावरुन अजित पवारांच्या काकांना पायउतार व्हाव लागलं, तेही सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यामुळेच स्वतःहून नव्हे! मनमोहनसिंगांच्या पंतप्रधानकीच्या अखेरच्या काळात, शेतकऱ्यांच्या ७० हजार कोटींच्या सार्वत्रिक कर्जमाफीला आणि साधारण तेवढ्याच रकमेच्या ‘अन्न सुरक्षा विधेयका ला ‘छुपा’ विरोध करणारे शरद पवार, हे विरोधाचं राजकारण अंगलट येतयं म्हटल्यावर ती धोरणं आपणच आणल्याचा, तद्दन बनावट राजकीय आभास निर्माण करु लागल्याचं वाचकांच्या स्मरणात असेलच ! शरद पवारांचं ‘अंगूर की बेटी’ असलेलं ‘दारु धोरण’ आठवा….

“शेतकऱ्यांनो, वर्तमानपत्र वाचत जाऊ नका” (म्हणजे, थोडक्यात कधि शहाणे होऊ नका…. आमचे ‘गुलाम’च रहा. शरद पवारांसारख्या राजकारण्यांच्या पायातल्या ‘वहाणा’च बनून रहा), हे शरद पवारकृत कथन आठवा! अर्धवट कच्च्या भाजलेल्या विटा आणि माठ, जसे बिनकामाचे असतात; तशी पहाता पहाता, अशा धोरणांमुळे अपरिपक्व व व्यसनाधीन झालेली, ‘बिनकामा’ची सैराट मराठी तरुणाई महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दारु-जुगार सार्वजनिक सण-उत्सवछाप ‘टाईमपास’ करत स्वतःला व कुटुंबियांना बरबाद करताना दिसू लागली…. जसा, तथाकथित ‘जाणता राजा’ आणि ‘हृदयसम्राट’ घडवतील, तशी ‘प्रजा’ घडायला लागली! जैन-गुजूमारवाडी उद्योगपती-व्यापारी हे, पवार-ठाकरेंचे खास दोस्त’.. त्यातून गोरगरीब आदिवासीमराठी सातबाराधारकांना साफ नकोसाअसलेला; पण, शरद पवारांना हवाहवासाअसलेला, अमेरिकनाज्ड् लवासायासारखे सामान्यांच्या अंगावर येणारे प्रकल्प उभे राहू लागले (सध्या याच गोष्टीला धरुन सोशल मिडीयात, बगलबच्च्यांच्या आपमतलबी स्वार्थाच्या पणत्यापेटवणाऱ्या जाणत्याराजांबाबत, “पाकव्याप्त काश्मीरात लवासा-फेज२ तयार करण्याचा प्रस्तावा”च्या रुपात एक मोठा विनोद, प्रचंड व्हायरलझालेला दिसतोयं, तो अशा कृष्णकृत्यांमुळेच)…. शेतकरी-शेतमजूरकामगार हा तळागाळातील वर्ग जणू यांचा शत्रूच! महाराष्ट्रातील जवळपास सर्वच्यासर्व ‘कामगार मंत्री शरद पवारांच्या राष्ट्रवादीवाले होते (गणेश नाईक, नवाब मलिक, हसन मुश्रीफ इ.) ‘मालक’ उपाधी न लावता ‘मालक मंत्री’ कसा बनता येतं, याचा ‘आदर्श’ (पवारांच्या ‘खाशा मर्जी’तल्या जितेंद्र आव्हाड नावाच्या ठाण्यातील राष्ट्रवादीच्या रासवट सुभेदाराचा, याच ‘आदर्श’ नांवाच्या मुंबईतील बेकायदेशीर सोसायटीत फ्लॅट होता, याची लिहीता लिहीता आठवण झाली) या राष्ट्रवादीवाल्या मंत्र्यांनी घालून दिला ! मालकवर्गाच्या याच दलाल-ठेकेदारांनी महाराष्ट्राच्या उद्योग सेवा क्षेत्रात ‘कंत्राटी कामगार / कर्मचारी पद्धत’ राबवून, लागोपाठ दोन मराठी पिढ्यांचं, गेल्या दोनतीन दशकात साफ उध्वस्तीकरण केलं. तिच उध्वस्तीला लागलेली पुढची ‘मराठा-पिढी’ आज रस्त्यावर उतरलीयं (मराठी कामगारांमध्ये ७०-८०% एवढा मोठा ‘मराठा’ जातीचा समावेश असतो). तेव्हा, गीतेतला श्रीकृष्णाचा ‘कर्मसिद्धांता’चा संदेश ध्यानात ठेवा… “ज्याचं कर्म, तो स्वतः करत असतो आणि ज्याचा त्याला, जो तो स्वतः जबाबदार असतो…. त्याचा ना संबंध फारसा जातीशी, ना पातीशी”! आपण ज्या क्षणी, व्यक्तिचा जातपातधर्म पहात बसण्याऐवजी, सार्वजनिक जीवनात त्याच्या ‘प्रवृत्तीं’ कडे लक्ष केंद्रित करायला सुरुवात करु….. त्याक्षणीच, ‘सिम सिम खुल जा’ अशी, आपल्या जगड्याळ प्रश्नांची सोडवणूक व्हायला नक्कीच सुरुवात होईल.

जो समाज, मग तो मागासवर्गीय, मुस्लिम, मराठाकुणबी, आगरी-कोळी-कराडी असो, तो समाज किंवा त्या समाजाचा लहानमोठा घटक जेव्हा, काळाच्या घोडदौडीत मागे पडतो वा मागासलेला राहतो….. तेव्हा, त्या जमातीतही कालौघात मोठे दोष तयार झालेले असतात, म्हणूनही ते घडत असतं”. पण, आंधळ्या जमातप्रेमामुळे आम्ही ते कवटाळून चालत रहातो. १९७० नंतरचे आमचे राजकारणातील तथाकथित जमातप्रमुख तर, अशा समाजदोषांना ‘राजकीय कौशल्या ने वाढवत नेत, आपली ‘राजकीय दुकानदारी’ तूफान बरकत चालवत राहीलेले आपल्याला दिसताततच!

११) मराठी-राजकारणाची अवसानघातकी व उफराटी चाल….

मुंबई-ठाण्यासारख्या शहरातल्या मराठीचं ढोंगी-फसवं राजकारण करणाऱ्या मराठी नेत्यांनी दिलेल्या आदेशानुसार, बहुजन तरुण पुढचामागचा विचार न करता ‘दगड’ फेकत गेले… तेच, फेकलेले ‘दगड’ गोळा करून, ‘आदेश संस्कृति’ रुजवणारे मराठी नेते समृद्धीचे ‘गड’ बांधत गेले ! “कारखाना जगला, तरच कामगार जगेल”, असं सांगत एका बाजुला, कारखान्यात घाम गाळणाऱ्या आपल्याच जम तीला घाबरवून सोडलं. तर, दुसऱ्या बाजुला धर्मविद्वेषाच्या भावनिक राजकारणाचा ‘अनेस्थेशिया’ देत राहीले… “मराठा तरुणाईचे मेंदू बधीर करणारी, ही ‘राजकीय-रेसिपी’ कमालीची यशस्वी ठरली आणि मराठी श्रमिकांची चळवळ संपविण्याची, भांडवलदारांची घेतलेली सुपारी, पांढरपेशा दगाबाज ‘मराठी- राजकारणाने अशातर्हेनं एकदम ‘फूल टू’ वाजवली…. आणि ‘महाराष्ट्र’ अवघा, बघता बघता गुजरात मारवाडचा ‘बटिक’ बनवला… संबंधित मराठी छोटेमोठे राजकारणी बघता बघता ‘ऐश्वर्या’त; तर, सामान्य मराठी जनता ‘माती’त लोळायला लागली!”

मराठी कामगारकर्मचारी सन्मानाने जगला, तरच कारखाना महाराष्ट्रात जगेल”, अशी भीमगर्जनाकरण्याऐवजी, खुज्या शहरी मराठी राजकीय नेतृत्त्वानं भांडवलदारांच्या इशाऱ्याने, “कारखाना जगला, तरच कामगार जगेल”, असा एक मोठा न्यूनगंडसगळीकडे पसरवून दिला. ज्यामुळे, ९० टक्के सामान्य मराठी माणसाच्या (त्यात मोठ्याप्रमाणावर मराठाजातीचे कामगार आलेच) आत्मविश्वासाचं जाणिवपूर्वक व पद्धतशीररित्या खच्चीकरणकरण्यात आलं. कामगार आंदोलनं इतिहासजमा झाली. सवयीनं आणि सरावानं म राठी तरुणाई जय भवानी, जय शिवाजीपुटपुटत राह्यली; पण, आता त्यातलं मावळेपणसंपलं होतं. नोकरी जाण्याच्या भितीनं उंदरासारखी भेदरलेली मराठी तरुणाई, महाराष्ट्रात घुसलेल्या उत्तरभारतीय कामगारांसारखीच आंदोलनं व नीतिमत्तेशी काडीमोड घेतं, केवळ, ‘अस्तित्ववादीबनली. ‘कामगार’ नांवाचं सावज, असं टप्प्यात आलेलं पाह्यल्यावर घटतं वेतनमान, नोकरीत टोकाची असुरक्षितता, कंत्राटी पद्धतीचा सार्वत्रिक फैलाव, बेलगाम मनमानी…. अशी, सर्व अस्त्रशस्त्र भांडवलदारांनी आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी उपसून बाहेर काढली. निवडणुकीच्या काळात, हीच मराठी राजकारणी टोळी ‘धार्मिक तेढ’ निर्माण करते व वाढवते…. निवडणुकी पुरता कट्टरवाद फैलावायचा, त्यासाठी भडक भाषणं-आंदोलनं दंगली घडवायच्या आणि धार्मिक कट्टरतावादाचं राजकारण करुन “परस्परम् निंदयती, अहो शत्रुम्, अहो द्रोहीम्” असं नाटक करत मतांचं जातधर्मीय ध्रुवीकरण करून भोळसट जनतेला फसवून निवडून यायचं आणि नंतर मात्र एकदिलाने ‘सत्ते’ च्या राजकारणाचा ‘सट्टा’ खेळायचा…. ‘धर्मराज्य पक्षा’ सारखे सत्प्रवृत्त पक्ष, मग दुर्लक्षितच रहातात!…. आणि हा प्रस्थापित राजकारणीवर्ग, आपल्याच लोकांच्या टाळूवरचं लोणी खायला आणि महाराष्ट्राचा ‘आत्मा’ आणि तुमचा ‘आत्मविश्वास’, दोन्ही जैन गुज्जू मारवाड्यांच्या दुकान कारखान्यांतून बोली लावून विकायला मोकळे होतात.

अशातर्हेने, “शिवरायांचं नांव उठताबसता तोंडी जपणाऱ्यांच्या नापाक हातानेच, शिवरायांचे ‘मर्दमराठे’ मावळे आयुष्यातून उठले… खेड्यातल्या मराठा राजकारणाने आणि शहरातल्या मराठी-राजकारणाने, दगाबाजी करत त्यांना नव्या व्यवस्थेतले नव-अस्पृश्यबनवले. पण, जन्माची जातमागास नाही; म्हणून आरक्षणमात्र या नव्या अस्पृश्यतेला मिळू शकलं नाही… मिळू शकत नाही आणि मिळालं तरी त्याचा आता फारसा उपयोग नाही. कारण, सरकारी वा सार्वजनिक उपक्रमातील नोकऱ्या खाजगीकरणामुळे, संगणकीय तंत्रज्ञानामुळे आणि नोकऱ्यांच्या कंत्राटीकरणामुळे एकतर संपल्यात किवा त्यांची रयासाफ निघून गेलीय!” फारतर, कुणा दुसऱ्या गुणी मराठी विद्यार्थी-विद्यार्थीनींचा हक्क ओरबाडून घेऊन, उच्चशिक्षणासाठी काही प्रमाणात मराठा मुलामुलींना प्रवेश मिळेलही….. पण, “ उच्चशिक्षण घेतलं, आता पुढे काय”, हा प्रश्न तेव्हाही ‘आ वासून’ उभा असेलच !

१२) मराठा-महामोर्चानंतर पुढे काय???….

मित्रांनो, आपण त्याच त्याच गोष्टी करत राहीलो तर, मग वेगळ्या निकालाची अपेक्षा करता येणार नाही…. समस्या सोडवणुकीसाठी, ती विचारसरणी कुचकामी ठरते; जी, आपण समस्या निर्माण होताना बाळगली होती… दुर्दैव हे आहे की, वीस वर्षाच्या जैनगुज्जूमारवाडी तरुणाला जी व्यावहारिक समज आहे; तेवढी आमच्या साठ वर्षाच्या मराठी प्रौढालाही नाही!” शहाणपणगमावून बसलेल्या दिशाहीन समाजाला जिथे, खुद्द परमेश्वर मदत करु शकत नाही…. तिथे सरकार आणि विधिमंडळांचं काय घेऊन बसलात ?

लोकशाहीत तुमचं तुम्हालाच शहाणं, स्वच्छ आणि नीतिमान व्हावं लागेलं. कुणी शिवछत्रपतीराजा येणार नाही… की, राजर्षि शाहू महाराजही… ते फक्त राजेशाहीतच शक्य आहे, आजच्या लोकशाहीत नव्हे”! तेव्हा, “तुझा तू वाढविशी राजा महाराष्ट्रात मराठी भाषेचा वापर जर अनिवार्य झाला नाही… आणि, आमची मातृभाषा आमची ताकदबनण्याऐवजी कमजोरीबनली… तर, भविष्यात ग्रामीण मराठी पिढीला महाराष्ट्रात भयानक स्वरुपाच्या अखंड गुलामगिरीला सामोरं जावं लागेलं…. ज्या गुलामगिरीला मराठा, कुणबी, आगरी-कोळी-कराडी, ब्राह्मण, मागासवर्गीय, मुस्लिम असा कुठलाही ‘जातीय रंग’ नसेल; पण, बोलणाऱ्यांची भाषा एकच असेल… ती असेल मायमराठी !!!

या महामोर्चाच्या सव्यापसव्यातून राजकीय परिवर्तन होणार की, फक्त जुन्या बाटल्या बदलल्या जाऊन, आमजनतेला झोपाळ्यावाचून झुलायला लावणारी’, ‘नव्याबाटल्यांमध्ये जुनीराजकीय दारुभरली जाणार आहे ? जी, ‘तुझ्या गळा, माझ्या गळाम्हणतं, एकमेकांच्या हातात हात गुंफून असणारी शे-दिडशे राजघराणी नव्याने पाजत रहाणार आहेत मराठासमाजाला?? हा आजचा खरा सवाल आहे. आपल्या समस्या काय आहेत आणि या समस्यांचा उदभव कुठून झाला आहे… हेच, मराठा तरुणाईला कळलं नाही तर, ती अशीच अंधारात चाचपडत राहीलं…. ‘मोर्चाचे महामोर्चे’ होत रहातील, पण त्यातून राजकीय जागृति’ निर्माण होऊन, आजवरची प्रस्थापित मराठा ‘राजकीय मोर्चेबंदी’ जर, मतपेटीतून तुम्ही ढासळवून टाकली नाहीत; तर, ते ‘महामोर्चे’ फक्त एक ‘अरुण्यरुदन’ ठरेलं…. एक असं ‘मराठी-आक्रंदन’ असेल की, जे या व्यवस्थेच्या ठार बहिया कानांना ना ऐकू येईल… ना, ऐकण्याची त्यांना कधि गरज उरलेली असेल!

लक्ष इकडे असू द्या की, महाराष्ट्रात खूप गर्दी झालीयं…. ती कमी होण्याची गरज आहे. आमची मराठी मुलंमुली उच्चशिक्षण घेऊन डॉक्टर, वकील, आर्किटेक्टस्, इंजिनियर्स, अकाऊंटंट्स्, एमबीए झालीयतं; पण, त्यांना त्यांच्याच हक्काच्या राज्यात परप्रांतीयांच्या घुसखोरीमुळे, आता फारसा व्यवसायकरण्याचा वाव उरलेला नाही. या आमच्या उच्चशिक्षित मुलामुलींना काय शेठजीसंस्कृतिचे पाय चेपत, आयुष्यभर त्यांची नोकरी करत, ‘गुलामीकरत बसायचं? तेव्हा, केवळ नोकरीतच नव्हे; तर, व्यवसायातसुद्धा गुणवान मराठी मुलामुलींसाठी आता जागा मोकळ्या करुन घ्याव्या लागतील… त्यासाठी राज्यघटनेत मोठे फेरबदल करुन काश्मीरची ‘काश्मि रियत’ अबाधित राखणाऱ्या ३७० कलमासारख्या कठोर तरतूदी कराव्या लागतील… दुसरातिसरा कुठलाही पर्याय नाही !

कंत्राटी कामगार/कर्मचारी पद्धतीचं उच्चाटन करुन दरमहा रु. २५,००० किमानवेतन, मराठीभाषा धोरण व रु.४०,०००रु. पर्यंतच्या १००% नोकऱ्या शेवटचा मराठी तरुण-तरुणी कामाला लागेपर्यंत मराठी माणसांनाच… यासारख्या बाबींमुळे, जे उद्योगव्यवसायसेवाक्षेत्रे इतर प्रांतात वळतील. त्यांना खुशाल जाऊ द्या…. त्यातून, अख्खा भारतच महाराष्ट्रात ओतला गेल्यामुळे झालेली महाराष्ट्रातील भयावह गर्दीथोडी कमी होईल… महाराष्ट्राचं मग काय होईल, याची कुणा बदमाष हितसंबंधियांना काळजी करण्याचं कारण नाही. महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची गरीबी वेगळी आणि सुखसम धान वेगळं, जे आता आम्ही कुणालाही हिरावू देणार नाही… हा, खरंतरं मराठा ‘महामोर्चां’ चा क्रांतिकारक संदेश असायला हवा !

मातीशी नाळ तोडलेला समाज कुठलीही क्रांती करु शकत नाही… आयुष्याची मातीमात्र करुन घेऊ शकतो, जी पंजाबच्या तरुणाईनं स्वतः ची केलीयं… उडता पंजाबसारखा उडताबुडता महाराष्ट्रनको असेल; तर, आपल्या लालकाळ्या आईचा पदर धरुन शाश्वतशेतीचा सेंद्रिय मार्गच स्विकारायला पाहीजे. कालचं काळंगोरं चित्र रंगवत समाजात दुभंग निर्माण करणारा ‘इतिहास’ आणि उद्याचं गुलाबी चित्र रंगवणारा, सध्याचा अशाश्वत ‘विकास’ यापासून दूर जात… वर्तमानकाळात जगायला आपण प्रेरित व्हायला हवं. सरतेशेवटी काळ-वेळही अतिशय कठोर न्यायाधीश असते. त्यानं तुम्हाला आता सगळ्याच परिस्थितीचं ज्वलंत दर्शन घडवलयं… आपले कोण आणि लुटणारे कोण (विशेषतः, आपल्याच जातीतले), हे ही तुम्हाला उशिरा का होईना एव्हाना चांगलचं ध्यानात आलयं…. पण, महामोर्चा-शृंखलेच्या महासमाप्तीपश्चात घरी जालं, तेव्हा हे जागृतीचे निखारेजपून ठेवा…. त्यावर, राखेची पुटं चढू देऊ नका !

१३) मराठा तितुका मेळवावा…..

‘मराठा-जात’ ही, ‘जन्माची जात’ न राहाता ‘कर्माची प्रत ‘ बनली पाहीजे…. जात न पाहता फक्त गुणवत्तेस ध्यानात ठेऊन तुम्ही, “कुठल्याही आमिषाला वा भूलथापांना बळी न पडता”, मतदान करण्यास ज्या दिवशी सुरुवात कराल ; त्यादिवसापासून, महाराष्ट्राचं राजकीय चित्र बदलू लागेलं. तुम्हाला आजवर वापरुन घेणारेमहाराष्ट्रभर पसरलेले सहकारसम्राटशिक्षणसम्राट-आरोग्यसम्राट….. भ्रष्ट लुटेरे साहेब, दादा, बाबा, भाई, कर्मवीर, धर्मवीर तुमच्या पाया पडून गयावया करायला लागतील; पण, त्यांची भ्रष्ट अक्कल ताळ्यावर येईल, ही मात्र खुळी आशा कधिही बाळगू नका, अन्यथा, स्वतःच स्वतःची फसवणूक करुन घ्याल… जशी, आजवर करुन घेतलीत, मराठाजातीच्या नांवावर! आधारासाठी कुणा जातीपातीच्या नेत्यांचे खांदे शोधू नका…. ते तुमच्या उज्ज्वल भविष्याला आधार देण्याऐवजी, तुमच्या भविष्याच्या तिरडीलाच आधार देतील… स्वत:लाच बुलंद करा, स्वयंसिद्ध व्हा! माझ्यासाठी मराठाही जात नाही…. तो, शिवछत्रपतींचा महाराष्ट्र-धर्मआहे…. प्रत्येक मराठी माणूसहा माझ्यासाठी मराठाआहे! आम्हा मराठ्यांना श्रीमंतीची ओढअसू शकेल; पण त्यासाठी, ‘नीतितत्त्वाशी आणि आत्मसन्मानाशी तडजोडनाही…. सुखसमृद्धी ऐश्वर्यापेक्षाही, आम्हाला आमची ‘मनःशांति आणि सुखसमाधान’ जास्त महत्त्वाचं आहे…. “जगा, जगवा आणि जगू द्या”, ही आमची महन्मंगल ‘मराठी-संस्कृति’ कितीही उदात्त असली; तरी, त्याचा गैरफायदा घेऊन आम्हा मराठी भूमिपुत्रांनाच, तुम्ही देशोधडीला लावून, इथे सुखाने राज्य नाही करु शकत…. मग ते, उच्चभ्रू मराठा राज्यकर्ते असोत वा गुजरात-मारवाडचे शेठ असोत वा असोत उत्तरभारतीय भैय्ये! या साऱ्यांनीच, एकदाचा हा महामोर्चा’ चा इशारा वेळीच नीट ध्यानात घ्यावा ! ‘मराठा ज्यावेळेस, महाराष्ट्रात मराठा महामोर्चाची धामधूम चालू होती, त्याच सुमारास ‘उरी’ येथील दहशतवादी हल्ल्यात ‘शहीद’ झालेल्या सातारच्या माण तालुक्यातील जाशी गावतील चंद्रकांत गलांडे, नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील खडांगळी गावातील संदीप ठोक, यवतमाळ येथील विकास कुळमेथे आणि अमरावती येथील विकास उईके या भारतमातेच्या सुपुत्रांवर अंत्यसंस्कार होत होते…. देशात तीस टक्के लोक असे आहेत की, ज्यांना जगण्यासाठी मरायला तयार व्हावे लागते. म्हणून ते लष्करात, पोलिसात, निमलष्करी दलात भरती होऊन सीमेवर जातात. परकीय सैन्याशी लढतात… दहशतवाद्यांशी दोनहात करतात… नक्षलवाद्यांना भिडतात. हा बहुजनसमाज एका पायावर मरायला तयार असतो; म्हणूनच, या देशातील हिंदुत्ववाद्यांना इंचइंच लढवू म्हणणाऱ्या उच्चभ्रूना राष्ट्रवादाची चैन भागविता येते. अभिजन आणि उच्चभ्रू सैन्यात जातात ते सगळे वरच्या पदावर ब्राह्मणांनी स्वातंत्र्यलढ्यात वैयक्तिकरित्या गाजवलेल्या शौर्याला निश्चितच सलाम ठोकावा लागेल. पण, लष्करात एखादी ब्राह्मण रेजिमेंटअसू शकते काय? मरायचा मक्ता काय फक्त मराठ्यांनी, मागासवर्गीयांनीच घेतलाय काय ?? लष्करात एखादी तरी ब्राह्मण, मारवाडी, जैन, गुज्जू व्यापारीवर्गाची (शहा, पटेल, अग्रवाल, पारेख वगैरे) रेजिमेंट आजपर्यंत का नाही ??? आतापर्यंत, स्वातंत्र्यानंतर किती ब्राह्मण, जैन, गुज्जू, मारवाडी, सिंध्यांनी देशासाठी रक्त सांडलयं ?… त्या रक्ताचा कुणी हिशोब देऊ शकेल काय ??…. की, नुकत्याच ‘जितं मया’ म्हणतं, ६५ हजार कोटींचा काळा पैसा नरेंद्र मोदी सरकारच्या ‘व्हॉलंटरी डिस्क्लोजर स्किम खाली जाहीर करण्यात आला; पण, त्यातील जवळपास सगळीच नांव गुजरात – मारवाडशी नातं सांगणारी असल्याने, त्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे… तशी, या रक्ताचा हिशोब सांगण्यात बाळगणार आहात ???

यातून, बहुजनांना फार मोठा धडा घेता येण्याजोगा आहे. आपण आपली ‘लोकसंख्या’, चीन देशाप्रमाणे उशिरा का होईना पण, कठोरपणे नियंत्रित ठेवली तर, ना अंबानी अदानी सारख्या पडद्यामागून राज्य करणाऱ्या भांडवलदारांना स्वस्तातले ‘कंत्राटी कामगार’ नांवाचे ‘गुलाम’ मिळतील…. ना पोटासाठी नाईलाजास्तव मराठा-मागासवर्गीयांना जीवावर उदार होत सशस्त्र दलात दाखल व्हावं लागेल! मग, राष्ट्रवादाची खाज व खुमखुमी असणाऱ्या प्रत्येकाला, इस्रायल देशामधील नागरिकांप्रमाणे, मरण्याची जोखीम पत्करण्याचीही तयारी दाखवावी लागेल. मग, प्रत्येक कुटुंबातील एकाला लष्करात भरती करणे सक्तीचे करावे लागेल. म्हणजे, या अतिरेकी राष्ट्रवाद्यांना आणि त्यांच्या पांढरपेशा कुटुंबियांना, अवकाळी मरणाची धग कशी उभ्या कुटुंबाला जिवंतपणे भाजून काढते, ते कळेल!

मराठा समाजासह बहुजन समाजातील तरुणाई काही गोष्टी तत्काळ करु शकेल व त्या त्यांनी स्वहितासाठी केल्याच पाहीजेत, त्या अशा…..

१) लोकसंख्या नियंत्रण २) कुठल्याही परिस्थितीत घराणेबाजीला मतदान करायचं नाही ३) कर्ज काढणे टाळून लग्नखर्च / घरबांधणीखर्च आटोक्यात ठेवायचेच…. हुंडा बिलकूल घ्यायचा द्यायचा नाही…. गावी पारंपारिक घरांऐवजी काँक्रिटची घरं बांधण्याचा नाद सोडायचा ४) शेती विकायची तर नाहीच; उलट जमेल तसा, शाश्वत नैसर्गिक वा सेंद्रिय शेतीचा ध्यास धरायचा….ज्या शेतीला फक्त गावोगावी श्रमदानातून सहकार्याने सरकारी योजनांचा आधार घेऊन शेकडो शेततळी, पाझर तलाव, पाणलोट क्षेत्रात लहानमोठे बंधाऱ्यांचं राज्यभर जाळं व पारंपारिक विहीरींची मोठ्याप्रमाणावर निर्मिती… एवढाच किमान ‘मानवी हस्तक्षेप’ अपेक्षित आहे ५) ‘कंत्राटी कामगारा’सारख्या गुलामाशी किंवा तुटपुंज्या पगाराच्या कामगाराशी लग्न करण्यापेक्षा, कष्टकरी शेतकऱ्याशी लग्न करण्याची सकस ‘मानसिकता’ तरुणींनी बाळगली पाहिजे… जशी पंजाबच्या मुली सैनिक आणि शेतकऱ्याशी जाणिवपूर्वक लग्न करताना बाळगतात तशी ६) स्वतः नीतिमान होऊन… आपल्यातील नीतिमान, प्रामाणिक, समाजहितैषी व ज्ञानी मराठी तरुण-तरुणींचा तडफेनं शोध घ्या (जसा, तो वरवधू संशोधनाच्या वेळेस घेतला जातो) व अतिशय कमीतकमी खर्चात वर्गणी काढून व सोशल मिडीयाचा ‘महामोर्चां’साठी घेतलात, तसाच प्रभावी आधार घेऊन, तुम्हीच त्यांना निवडणुका लढवायला प्रेरित करा व स्थानिकस्वराज्य संस्थांत व विधिमंडळात संसदेत पाठवा…

१४) एक मराठा, लाख मराठा…. धुमसत्या असंतोषाच्या, धगधगत्या वाटा !!!

या घडीला, असंतोषाचा हा महापूर सैराटहोऊ न देणं, हे फार महत्त्वाचं आहे…. तापल्या तव्यावर पोळी भाजून घ्यायला तेल लावलेले राजकारणी पेहेलवानतयार आहेतच! सुरुवातीचे उत्स्फूर्त मोर्चे आणि त्याचं झालेलं शानदार व जानदार अनुकरण याला अलिकडच्या काळातल्या राजकीय इतिहासात तोड नाही! सकृतदर्शनी, कुठलंही प्रस्थापित नेतृत्त्व नाही…. मोर्चाची व्यावसायिक आखीवरेखीव नियोजन करुन केलेली मांडणी नाही. तरीही, मोर्चे एवढे कम लीचे शिस्तबद्ध व कुठलीही आक्रस्ताळी घोषणाबाजी न करता (अगदी “शिवछत्रपती महाराज की जय”, म्हणण्याचा सुद्धा अनेकठिकाणी मोह टाळून) एवढ्या मूकपणे पवित्र शांततेत व्हावेत, हा चमत्कारच होय ! गुजरातच्या पटेल आंदोलनात झालेला मोठ्या प्रमाणावरील हिंसाचार आणि नाहक बळी गेलेले तरुण पहाता, हे यश फारच अलौकिक आहे…. त्यातील लाखो महाविद्यालयीन युवतींचा व गृहिणींचा उत्स्फूर्त सहभाग तर, तोंडात बोटं घालायला लावणारा…. अंध, अपंग, म्हातारेकोतारे सारेच सहभागी झाल्याचे पाहून थेट बीबीसीसारख्या ख्याती आंतरराष्ट्रीय माध्यमालाही सकल मराठा क्रांतिमोर्चा’ ची अखेर दखल घ्यावी लागलीच. त्यासाठीच, या “मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा…. धर्म मराठा, कर्म मराठा” अशा एकूणएक सर्वच ‘महामोर्चा’ ना ‘धर्मराज्य पक्षा’चा सलाम !!!

प्रस्थापितांपर्यंत, ही वादळा पूर्वीची शांतता” आहे, असा गर्भित इशारा एव्हाना पोहोचला असेलच…. जनतेचं लक्ष भ्रष्टाचार-अन्याय-अत्याचारशोषणासारख्या मूलभूत समस्यांवरुन दूर वळविण्यासाठी, या जाज्वल्य जनआंदोलनाला आरक्षणाची उफराटी दिशा देण्यासोबतच, त्यात सहभागी होऊन खुबीने मतांची शेतीकरता येता का, हे पाहण्यासाठी ते प्रस्थापितटीव्हीच्या पडद्यावर चमकत आहेतच. शिवाय, ‘भजनकिर्तन-प्रवचनासारख्या दुसऱ्या निरुपद्रवी बाबींकडे वळवून संतप्त जनतेला गपगुमानकरण्याचे, त्यांचे प्रयत्न पूर्वीपेक्षाही अधिक जोमाने सुरु होतील. राजकारण्यांसाठी, “समाजाच्या असंतोषाच्या कोंडलेल्या वाफ ‘ला ‘थंड’ करण्याचं हुकमी माध्यम” म्हणजे, महाराष्ट्रा पसरलेले विविध सद्गुरु व बाबाजींचे लाखो भक्तांचे कळप असणारे मोठमोठे धर्मसंप्रदाय! या सर्वच धर्मसंप्रदायांशी प्रस्थापित राजकारण्यांची पडद्याआड असलेली हातमिळवणी, क्वचितच कधि जनतेच्या नजरेस पडते (उदा. धर्मसंप्रदायांच्या सद्गुरूंनी प्रस्थापित राजकारण्यांचा किंवा या राजकारण्यांनी सद्गुरू वा बाबाजींचा जाहीर सत्कार करणं; तसेच, अशा राजकारण्यांचा सद्गुरू वा बाबाजींच्या आसपास नजरेत भरणारा वावर असणे इ. वेळेसच). लोकांना षंढ व थंड बनवणे आणि भोळ्या भक्तांची हजारो-लाखो मते मिळवणे या, ज्या हिणकस व संधिसाधू दृष्टीकोनातून विविध सद्गुरु किंवा बाबाजींच्या संप्रदायांतील लाखोंच्या मेळ्यांकडे प्रस्थापितराजकारणीपहात असतात; त्याच नजरेने प्रस्थापितराजकारणीया महामोर्च्यांकडे सुद्धा पहाणार असतील; तर, ते नजिकच्या भविष्यात भयानकरित्या पस्तावतील (त्यादृष्टीनं, शिवछत्रपतींचे वंशज असलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलेला, “जी जनता नेत्यांना डोक्यावर घेते, ती जनताच वेळ आलीच तर, त्यांना पायाखाली तुडवायलाही मागेपुढे पहात नाही”, हा इशारा प्रस्थापितराजकारण्यांनी गांभीर्याने घ्यायलाच हवा)!

या ‘महामोर्चाद्वारे, मराठी तरुणाईच्या ऊरात दडलेल्या असंतोषाची कोंडलेली वाफ (जशी स्वयंपाकघरातल्या कुकरची शिटी वाजून बाहेर पडते तशी) एकदाची बाहेर पडून गेलेली आहे, तेव्हा आता दीर्घकाळ आरामात आपण, तेच लुटालुटीचं आणि दलाली दगलबाजीचं राजकारण करायला मोकळे झालोत; अशी सोयिस्कर समजूत जर, हे ‘जातीची माती खाणारे’ मराठा समाजातील प्रस्थापित घराणेबाज राजकारणी करुन घेणार असतील…. तर, ते एका धगधगत्या ज्वालामुखीच्या तोंडावर सत्तेची ‘आरामखुर्ची’ टाकून बसलेत, असचं म्हणावं लागेल!

मुंबईतील अबू आझमीसारखा जातीय व आक्रस्ताळी नेता, या तापल्या मराठातव्यावर मुस्लिम आरक्षणाच्याही पुढे जाऊन, मुस्लिमांसाठी स्वतंत्र अॅट्रॉसिटीकायद्याची मागणी करु लागलायं…. हळूहळू सगळेच राजकारणातील जातधम साप, संतशिवबांच्या महाराष्ट्राच्या पवित्र भूमित, चारही दिशांनी वळवळायला लागतील.

सुरुवातीच्या ‘मराठा क्रांतिमोर्चा’तील (औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड) उत्स्फूर्तततेची जागा, पुढे सोशल मिडीयाच्या प्रभावी वापराने मोर्चांचं संख्याबळ वाढविण्याच्या ऊर्मिने घेतली आणि ‘क्रांतिमोर्चा’चं रुपांतरण ‘महामोर्चा’त झालं! उर्वरित जनतेच्या मनात धडकी भरवण्याचं काम तर, या ‘मराठा महामोर्चा’ मधून झालचं; पण, त्यातूनच एका जातधम य ध्रुवीकरणाला चालना मिळालीयं. आज मराठा, उद्या मागासवर्गीय, परवा मुस्लिम, नंतर आगरी-कोळीकराडी मोर्चे-प्रतिमोर्चे निघतील… आज, कोपर्डी घटना आणि सैराट चित्रपट यामुळे आतून दुखावला गेलेल्या मराठा समाजाच्या दुःखाच्या आगीत दलितद्वेषाचं पुरेपूर छुपंतेल ओतण्याचं काम, हा प्रस्थापितवर्ग करत, आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा अश्लाघ्य प्रयत्न करु पहातोयं… तो प्रयत्न, भयानकरित्या त्यांच्याही अंगलट येऊ शकतो. या विषातून विद्वेषातून मागासवर्गीयांवर चुकून कुठे हल्ले झाले किंवा अमानुष लैंगिक अत्याचारांची विषवल्ली चुकूनमाकून पुन्हा कुठे डोकं वर काढती झाली (किंवा, याच मराठा प्रस्थापितवर्गाकरवी पुन्हा सत्तासंपादनासाठी, हे षडयंत्र ‘घडवलं’ गेल्यास); तर, मग मागासवर्गीय समाजात स्थान व विश्वासार्हता साफ गमावून बसलेले व ‘बाबासाहेबां’च्या नांवाने गलिच्छ राजकारण करणारे ‘दुकानदारसाहेब’ व ‘दलित बिगबॉस’…. “जय भीम के नारे पे खून बहता है, तो बहने दो”, असं म्हणतं, हिंसाचाराचा वडवानल पेटवायला मोकळे होतील…. दलितांचे ‘प्रतिमोर्चे’ मराठ्यांच्या ‘क्रांतिमोर्चा’वर कुरघोडी करायला घुमू लागतील…. दोन्हीकडचे फक्त गरीब व वंचित दंगलीत मरतील वा मारले जातील…. खेड्यापाड्यात तर, अल्पसंख्याक मागासवर्गीयांविरुद्ध हिंसाचाराच्या थैम नाला आणि क्रौर्याला पारावार उरणार नाही… आणि इकडे शहरांच्या ‘हस्तीदंती – मनोच्या ‘तील सुरक्षित ‘मचाणा’वर बसून मागासवर्गीयांमधील तथाकथित बुद्धिमंत संस्थानिक, सुरक्षित स्वतंत्र वसाहती (दलितस्थान वगैरे) व मागासवर्गीयांसाठी सर्रास शस्त्रपुरवठ्याची मागणी करत, आपण दलितवर्गाचे किती कैवारी आहोत वा वंचितांचा कैवार घेणारे आहोत, हे सिद्ध करायला वळवळू लागतील…. तोपर्यंत कदाचित, हा सगळाच संबंधित प्रस्थापित राजकारणीवर्ग जनक्षोभाला घाबरुन कुटुंबकबिल्यासह व आपल्या खास बगलबच्च्यांसह विदेशात विमानमार्गे पळून गेलेला असेल, ही काळ्या दगडावरची ‘पांढरी रेघ’ आहे (जसा, गुजरातच्या जुनागढचा संस्थानिक वल्लभभाई पटेलांनी लष्करी कारवाई करताच पाकिस्तानात पळून गेला होता आणि आजचे विजय मल्लूया, ललित मोदींसारखे बदमाष उद्योगपती लंडनला पळून गेले तसे) !

तेव्हा, जातीय-अस्मितेचं राजकारण नजिकच्या भविष्यात कुठलं वळणं घेईल, हे साक्षात ब्रह्मदेवदेखील सांगू शकणार नाही. पण मग, जे काही होईल ते कुणाच्याही नियंत्रणात रहाणार नाही आणि याअगोदरच, मराठी माणसाच्या मुठीतून निसटून जाऊन शेठजी संस्कृतिची अचाट धनसंपदा आणि उत्तरभारतीयांचं अफाट संख्याबळ, यांच्या कात्रीत सापडलेला महाराष्ट्र व महाराष्ट्रातील मराठी माणूससाफ छिन्नभिन्न होईल…. महाराष्ट्रात एक स्मशान शांतता पसरेल. आश्चर्य म्हणजे, “विदर्भ वेगळा होणं म्हणजे, महाराष्ट्राचे लचके तोडणं”, असं म्हणणारे मराठी नेतेच, भविष्यातल्या म हाराष्ट्रातील या सन्नाट्याला कारणीभूत असतील….

आज जागी झालेली ‘मराठा आणि मराठी तरुणाई’ हे सम जून घेईल काय ? महाराष्ट्रीय समाजरुपी द्रौपदीचं चाललेलं ‘वस्त्रहरण’ ती रोखू शकेल काय ?? जातधर्म-निरपेक्ष असा, शिवछत्रपतींचा’कल्याणकारी महाराष्ट्र’ पुन्हा घडवेल काय ??? धन्यवाद…..

जय महाराष्ट्र । जय हिंद ।।

राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)