टोकाची ‘आर्थिक-विषमता’ ही, केवळ सापाच्या ‘विषा’समानच नव्हे; तर, तो ‘काळसर्प’च आहे….

टोकाची आर्थिक-विषमता, हे भारतीय-समाजातील एक अत्यंत खळबळजनक, धोकादायक आणि प्रस्थापित ‘रक्तपिपासू-शोषक’ राजकीय-व्यवस्थेला अतिशय अडचणीचं ठरणारं उघडंनागडं ‘सत्य’ आहे!

त्यामुळेच, ‘गरिबी-हटाव’चा ‘नारा’ सद्यस्थितीत महत्त्वाचा नसून ‘आर्थिक-विषमते’वर युद्धपातळीवरुन हल्लाबोल करणं, ही काळाची गरज आहे… तरीही, तारस्वरात ‘गरिबी-हटाव’चेच नारे देशात दिले जातायतं….. ‘धर्मराज्य पक्ष’ वगळता एकही राजकीय पक्ष, या मुद्द्यावर ना गांभीर्याने विचार करताना…. ना कुठली कृति करताना, ‘युगपुरुष’ शिवछत्रपतींच्या या महाराष्ट्रात कोणी दिसतोयं.

टोकाची ‘आर्थिक-विषमता’ ही, केवळ सापाच्या ‘विषा’समानच नव्हे; तर, तो ‘काळसर्प’च आहे…. वाढती आर्थिक-विषमता, ही नैसर्गिक मानवी-संवेदना मारुन टाकत, सजीवसृष्टी व निसर्ग-पर्यावरणाचा विध्वंसाला आणि अपार मानवी दुःखाला फार मोठ्याप्रमाणावर चालना देणारी ठरते, हे दुर्दैवी ‘वैश्विक-सत्य’ आहे!

“सब घोडा बारा टक्का”, हे ‘कम्युनिझम्’चं तत्त्व, कितीही अनैसर्गिक व मानवी-प्रतिभेला मारक भासलं; तरी, जसा हाताच्या बोटांमधला फरक, हा फक्त ‘मिलीमीटर-सेंटिमीटर’मधला असतो… ‘मीटर-किलोमीटर’मधला कधिच नसतो! तद्वतच, गरीबी आणि श्रीमंती यातला फरक, सर्वंकष प्रयत्न करुन विशिष्ट मर्यादेत राखला गेलाच पाहीजे. ‘दारिद्र्यरेषे’सोबत ‘श्रीमंतीची रेषा’ही आखली जाणं आणि त्यातलं गुणोत्तर विशिष्ट मर्यादेत राखणं; हे कुठल्याही ‘किंमती’वर एकदा ठरवायलाच हवं…. ‘काॅर्पोरेट-क्षेत्रा’त तळागाळातील कामगार-कर्मचार्‍यांचं निम्नतम वेतनमान आणि CEO सारख्या पदांचं सर्वोच्च वेतनमान, यांचं गुणोत्तर १:१२ ते १:२० या मर्यादेत राखायलाच हवं!!

“एक ऐश्वर्यात लोळत असेल तर, दुसर्‍याला निदान सन्मानाने जगण्याचा हक्क आहेच आणि तो नजिकच्या भविष्यात ‘धर्मराज्य पक्ष’ मिळवून देणारच!!!”

संयुक्त महाराष्ट्रानंतर…. स्वायत्त-महाराष्ट्र’! …..राष्ट्रांतर्गत राष्ट्र, ‘स्वायत्त-महाराष्ट्र’!! ….. ‘शिवछत्रपतीराष्ट्र’ !!!”

 झोपी गेल्या मराठी माणसा ऊठ….. धर्मराज्य के अलावा बाकी सब झूठ !”

जय महाराष्ट्र ।  जय हिंद ।।

 …राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)