जागतिक हवामान बदलाचा एक दृष्य परिणाम

“जागतिक तापमानवाढ आणि त्यातून अटळपणे उद्भवलेल्या अनाकलनीय जागतिक हवामान बदलाचा एक दृष्य परिणाम” म्हणून, संपूर्ण पूर्व युरोपच्या अवकाशात ‘मंगळ ग्रहा’ सारखं ‘भगवे’मय वातावरण!!!

रशियाच्या सोचि प्रदेशातील पर्वतशिखरांवर, जाॅर्जियातील अद्झारिया भागात आणि रुमानियाच्या(गलाटी) डान्यूब बंदरातील परिसरात, सध्या (मार्च २७-२०१८)  ‘भगव्या’ रंगाच्या बर्फाची चादर, सर्वत्र पसरलेली दिसतेयं!

शेकडो मैलांचं अंतर कापून घडलेल्या, सहारा वाळवंटातील वालुकामय तप्त वारे आणि सैबेरियातील संततची बर्फवृष्टी, या  ‘अपूर्व’ मिलाफातून, हा ‘नैसर्गिक चमत्कार’ घडून आल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे!

त्यातून, भारतातील समस्त ‘मोदीभक्तां’ना युरोपात ‘हिंदुत्वा’ची नैसर्गिक लाट आल्याचं भासू शकेल…. पण, प्रत्यक्षात तो नियतीनं युध्दपातळीवर ‘कार्बनऊत्सर्जन’ रोखण्याबाबत दिलेला, अजून एक गंभीर इशारा आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे, “मानवजातीनं, शेखचिल्लीसारखं आपल्याचं अस्तित्वावर कुऱ्हाडं चालवणं, कालही आणि आजही सुरुच ठेवणं मात्र होईल”!!!

….. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष…. भारतातील पहिलावहिला निसर्ग-पर्यावरणवादी पक्ष)