“मराठा समाजाने आंदोलनात कारखान्यांची नासधूस करु नये”… इति शरद पवार

औरंगाबादला कारखान्यांवर संतप्त मराठा-कंत्राटी कामगारांचा मोर्चा वळताच…. शरद पवार कळवळले. मराठा-आंदोलनात दुर्दैवाने आजवर, सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचं एवढं नुकसान होत होतं, तरी असा कळवळा शरद पवारांना फुटला नव्हता, तो एकदम कारखान्यांकडेच शोषित मराठा तरुणाईच्या संतापाचा रोख वळताच फुटला… हे, उद्योग जगतावरचं शरद पवारप्रणित ‘पाॅवरफूल प्रेम’ नव्हे काय?

पवार-ठाकरे परिवारांच्या दळभद्री राजकारणामुळेच धनदांडग्या जैन-गुज्जू-मारवाड्यांनी महाराष्ट्रात सर्वत्र वेडेवाकडे हातपाय पसरले आणि सर्वसामान्य मराठी माणूस पराकोटीच्या आर्थिक-शोषणाने देशोधडीला लागला. या दोन्ही परिवारांची  उद्योगपती-व्यापाऱ्यांशी असलेली अर्थपूर्ण ‘हातमिळवणी’ वा साटंलोटं (मिलीभगत… Fixed Match) ही काही लपून राहिलेली गोष्ट कधिच नव्हती… जणू, मराठी कामगार म्हणजे यांचे जन्मजात शत्रूच! गणेश नाईकांपासून ते हसन मुश्रीफ-नबाब मलिकांपर्यंत सगळेच कामगार मंत्री‘ (खरं म्हणजे, ‘मालक-मंत्री‘) शरद पवारांच्या राष्ट्रवादीपक्षाचे…. यातच कामगारांनो, सगळं काही आलं! या दोन राजकारणी घराण्यांनी औद्योगिक जगताच्या स्विकारलेल्या सुपारीमुळेच महाराष्ट्रात कंत्राटी-कामगार/कर्मचारीनावाची नव-अस्पृश्यता व गुलामगिरी नुसती रुजलीच नव्हे; तर बेफाम फोफावली (सध्या, त्या कंत्राटी-कामगारपद्धतीचाच एक नवा अवतार म्हणून FTE (Fixed Term Employee) म्हणजे खरंतरं Bonded-Labour, हंगामी वा कालबद्ध गुलाम वा वेठबिगार कामगार-कर्मचारी ही तेवढीच घातकी संकल्पना, या देशात मूळ धरु पहायतेय!) ….आणि पहाता पहाता दोनतीन मराठी पिढ्या ती, कायमच्या उध्वस्त करती झाली…. आणि त्याचीच कटू, विषारी फळं म्हणून ‘मराठा समाज’ आज दिशाहीन होऊन रस्तोरस्ती आरक्षणाचा ‘जोगवा’ मागत फिरतोय… तर, कुठे औरंगाबादसारखा वेडावाकडा उद्रेक करतोय.

दिशाहीन आणि हिनदीन मराठा‘, या वास्तवाच्या महापातकाचे धनी म्हणून तुम्हाला महाराष्ट्रात, या दोन घराण्यांच्या दलालीच्या आणि टक्केवारीच्या  राजकारणाकडेच पहावं लागेल… अन्यत्र कुठेही नव्हे!

अहो पवारसाहेब, ते औरंगाबादच्या डझनांवरी कारखान्यांवर धडकलेले तरुण, केवळ ‘मराठा’ जातकुळीचे नव्हते; ते मुळातून ‘कंत्राटी-कामगार’ होते…. पवारसाहेब, ते आंदोलन वरकरणी मराठ्यांचं दिसत असलं तरी, त्या आंदोलक मराठा अंतःकरणातली खदखद, संतप्तता अवघ्या कामगारवर्गाची होती, हे विसरु नका! कामगारांचं रुपांतर लढाऊ ‘मराठ्या’त झालं की, काय होतं, तेच केवळ आैरंगाबादेच्या नवउद्यम नगरीनं कालपरवा अनुभवलं! जे अनुभवलं तो विदारक अनुभव म्हणजे, कंत्राटी-पद्धतीतल्या तुटपुंज्या पगारावर, उद्याच्या दिवसाचा भरवसा नसलेल्या, बारा बारा तास मान मोडून काम करणाऱ्या आंदोलक मराठी कामगारांचा रौद्रभीषण उद्रेक होता… त्या उद्रेकानं ७८ कंपन्यांचा चुराडा केला आणि आपल्या अंतःकरणातल्या खदखदत्या ज्वालामुखीला मोकळी वाट करुन दिली. ज्या औरंगाबादच्या रस्त्यांना मारुती-८०० गाड्यासुद्धा धड अंगावर खेळविण्याची सवय नव्हती; त्या औरंगाबादी रस्त्यांवर, कामगारांचं पद्धतशीररित्या अतोनात शोषण करणाऱ्या, नवश्रीमंत व्यवस्थापकांच्या बीएमडब्ल्यू, मर्सिडीज बेंझसारख्या महागड्या गाड्या शेकड्याने बेगुमानपणे धावू लागल्या. ज्याच्या नावाने हे शहर ओळखलं जातं, त्या औरंगजेबाच्या शासनकाळातसुद्धा, अन्यायकारक ‘जिझिया करा’ ने धुमाकूळ घातला नसेल, एवढा हैदोस या ‘कंत्राटी-कामगार पद्धती’ ने महाराष्ट्रभर काही दशके घातलाय! हे सगळं वास्तव, असहाय्य होऊन तो ‘मराठा तरुण’ पहात होता आणि जोडीला आपल्या फाटक्या संसाराच्या चिंध्या गोळा करताना आतून ज्वालामुखीसारखा धगधगत होता…. त्या ज्वालामुखीचाच उद्रेक होत, तप्त ‘लाव्हा’, त्यादिवशी औरंगाबादी रस्त्यांवर प्रस्फूटित होऊन बाहेर लवंडला…. अन्याय, शोषण, अत्याचार, दडपशाही सहन करण्याची पण, एक शेवटची मर्यादा असते. व्यवस्थेचे कान ठार बहिरे नसतील तर आणि व्यवस्थेचे मेंदू चंगळवादाने साफ संवेदनाशून्य झाले नसतील तरच…. “रक्तपिपासू-शोषक” व्यवस्थेला, संतप्त ‘मराठा’ नव्हे; तर ‘मराठी’ तरुणाईनं दिलेला हा इशाराच समजावा!

तेव्हा… अन्याय, दडपशाही आणि शोषणाचा कहर करुन मराठी कामगार-कर्मचाऱ्यांच्या सहनशक्तिचा आजवर अंत पहाणाऱ्यांनो, अजूनही वेळ गेलेली नाही, तोवर तुमच्या उन्मत्त मस्तीतून भानावर या!!

जाता जाता, या निमित्ताने मराठा तरुणाईला सांगावसं वाटतं की, ही जी तुमची शरद पवार, नारायण राणेंसकट, मराठाजातीचं प्रछन्न राजकारण करत मोठी झालेली, जातभाई छोटीमोठी नेतेमंडळी आणि भ्रष्टाचारातून गब्बर झालेली सरकारी आजीमाजी जातभाई अधिकारी मंडळी आहेत ना…. त्या सगळ्याच मंडळींची, देशविदेशातली सगळी संपत्ती जरी तुम्ही संपादन करुन तुम्हाला वाटून घेऊ शकलात, तरी तुमच्या बहूतेक आर्थिक समस्या निश्चितच मार्गी लागतील…. ते शक्य नसेल तर, अल्पसंख्य, आरक्षण, अॅट्राॅसिटी असली अ, , , ई ची घातकी राजकीय बाराखडी सुस्पष्टपणे ठोकरणाऱ्या जातधर्मनिरपेक्षधर्मराज्य पक्षा सोबत स्वतःला जोडून घ्या आणि “स्वायत्त-महाराष्ट्रा”च्या बुलंद मागणीसह या रक्तपिपासू-शोषकव्यवस्थेवर राजकीय मर्माघात करा…. काश्मीरची काश्मिरियतटिकवून धरणाऱ्या ३७० कलमाचा महाराष्ट्रासह सर्व राज्यांमध्ये आग्रह धरा आणि महाराष्ट्राला लुटणाऱ्या गुजराथीभाषिक धनदांडग्या जमातींची आर्थिक व राजकीय कोंडीकरा आणि सध्याच्या जीवघेण्या परप्रांतीय दबावातून शिवबा-संतांच्या महाराष्ट्राचा श्वासएकदाचा मोकळा करा…. बघा, काय आणि कसं जमतय ते!!!

II जय महाराष्ट्र….जय हिंद II

…..राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष… “संयुक्त महाराष्ट्रानंतर आता, ‘स्वायत्त-महाराष्ट्र… राष्ट्रांतर्गत राष्ट्र ‘स्वायत्त-महाराष्ट्र’…. ‘शिवछत्रपतीराष्ट्र’!!!)