“चौकीदार चोर पकड ने का काम कर रहा है”…. हे धडं ‘अर्धसत्य’ही नव्हे… ‘पूर्ण सत्य’ तर असं आहे की, “चौकीदार कभी कभार चोर पकडता होगा… मगर, अपने पार्टी-परिवारसंबंधी ‘डकैतों’ को सिर्फ सरे आम छोडताही नहीं बल्कि, उन्हे प्रोटेक्ट भी करता है!!!”
मोदी-जेटलीज् “टू ब्लू आईड बाॅईज्” (Mody-Jaitley’s two blue-eyed boys)…. एक, ‘अनिल अंबानी’ (वाचवण्याचे सगळे अर्थसंकल्पीय व राजकीय उपाय थकल्यावर दिवाळखोरी जाहीर करता झाला) आणि दुसरा, मोदी-जेटलींनी मध्यंतरी राफेल-भ्रष्टाचाराची निःपक्षपातीपणे कठोर चौकशी करणाऱ्या अलोक वर्मांना २३ ऑक्टोबर-२०१८च्या उत्तररात्री जबरदस्तीने हटवून, नेमलेला माजी हंगामी सीबीआय संचालक ‘एम्. नागेश्वर राव’ (ज्याचं, सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा ठोठावून साफ नाकच कापलं…अर्थात, तरीही हा गेंड्याच्या कातडीचा प्राणी राजीनामा देईलसं लक्षण, अजून तरी दिसत नाही)…. असे दोघेही “लाडले” सध्या देशात तोंडावर आपटलेत… कुठल्या लायकीचं मोदी-जेटली सरकार आहे, त्यासाठी आता “हातच्या कंकणाला आरसा कशाला”?
…. ‘कंकण’, अनीतिनं काळवंडलेलं आहे आणि भ्रष्टाचारानं भरलेलं आहे, ते डोळ्यात जनतेच्या थेट खुपतंच आहे… असो, लोकसभा-२०१९ निवडणूक, जवळच येऊन ठेपलीय!!!
…. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)