स्पेनची राजधानी माद्रिद येथे, २ ते १३ डिसेंबर-२०१९ अशी एकूण बारा दिवस सुरु असलेल्या UNFCCC च्या (युनायटेड नेशन्स् फ्रेमवर्क कन्व्हेंशन् ऑन् क्लायमेट् चेंज्) ‘‘जागतिक हवामान-बदला’’विषयक COP25 परिषदेच्या निमित्ताने…..
“We’ve sleepwalked past the ‘point of no return’… jeopardising the health and safety of everyone on this planet!” ……ANTONIO GUTERRES (UN Secretary General)
“March now or Swim later…. Since, our leaders are behaving like children, we will have to take the responsibility, they should have taken long ago… You have stolen our ‘dreams’ & ‘childhood’… How dare you???” ……Greta Thunberg (#FridaysForFuture movement)
औद्योगिकीकरण पूर्व काळातील (म्हणजे, वर्ष-१७५० पूर्वी) तापमानात आधुनिक-मानवाच्या निसर्गातील अक्षम्य बेबंद हस्तक्षेपामुळे होऊ घातलेली विनाशकारी जागतिक-तापमानवाढ १.५° ते २.०° सेंटिग्रेड ‘लक्ष्मणरेषे’च्या मर्यादेत रहावी म्हणून, पॅरिस-करारातील तरतुदींचं पालन व्हावं आणि त्याअंतर्गत, ‘कार्बन-ऊत्सर्जन’ ठरल्या उद्दिष्टांनुसार कमी करण्यासाठी निर्धारित राष्ट्रीय योगदानांचं (NDCs…. Nationally Determined Contributions) पालन व्हावं, हे या परिषदेचं खरं लक्ष्य (पुढील वर्ष-२०२०च्या प्रारंभापासून त्याची कडक देखरेख होणं, अपेक्षित आहे)…. दुर्दैवाने, परिषदेपश्चात, ही लक्ष्यपूर्ति होऊन मानवजातीसह संपूर्ण सजीवसृष्टीचा संहार टळेल, अशी आशादायक परिस्थिती फारशी शिल्लक राहीलेली नाही!
याचा सरळ सरळ अर्थ हा की, अवघ्या सजीवसृष्टीच्या दृष्टीकोनातून पहाता, ‘‘आधुनिक-माणूस, हा ‘सैतान’ तर आहेच’’… पण, ही त्याची ‘खलनायकी’ भूमिका, इथेच नाही थांबत…..
इथून पुढे, त्याचा पृथ्वीवरील रंगमंचावरचा, दुसरा खलनायकी-अंक सुरु होतो… तो म्हणजे, ‘‘आधुनिक माणूस, हा पृथ्वीच्याच गर्भात वाढलेला आणि पृथ्वीच्या पोटात शिरलेला भयंकर ‘विषाणू’ या रुपाने!’’
…असा एक विषाणू की, जो AIDS, अँथ्रॅक्स्, इबोला यापेक्षाही सहस्त्रपटीने खतरनाक व प्राणघातक ‘संसर्गजन्य विषाणू’ असून, त्याने
तो कसा घडेल, कशातून घडेल? तो घडेल असं नव्हे; तर, दररोज घडतोच आहे, तो घडतोय पंचमहाभूतांच्या (हवा, पाणी, जमीन, प्रकाश, आकाश) खवळण्यातून…. असह्य तापमानवाढ, वादळे, भूकंप, तूफान, चक्रीवादळे, ज्वालामुखींचे उद्रेक, ओझोन थराची भगदाडे, समुद्रीजलाचे आम्लीकरण, अतिवृष्टी, दुष्काळ, रासायनिक-आण्विक-विद्युतचुंबकीय प्रदूषण, जलप्रलय इ. इ.
…‘आधुनिक मानव’ नावाचा हा ‘सैतान’, हा ‘विषाणू’ रोखला तेव्हाच जाईल; जेव्हा, त्याची इतिश्री (शेवट) पृथ्वीमातेची सहनशीलता संपूर्णतया संपुष्टात आल्यानंतर होईल, तेव्हाच… तेव्हा, सगळंच संपलेलं असेल…. उरली असेल उजाड, विराण, एकाकी, विदग्ध पण, तरीही ‘रोगमुक्त’ पृथ्वी… जसं, संसर्गजन्य रोगानं जर्जर झालेलं एखादं कलेवर (प्रेत) भडाग्नीत भस्मसात होताच, रोगकारक सगळे जिवाणू-विषाणू जळून नष्ट व्हावेत अन् प्रेत ‘रोगमुक्त’ रक्षास्वरुप व्हावं… तद्वतच !!!
…. राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष…. भारतातील पहिलावहिला निसर्ग-पर्यावरणवादी हरित पक्ष)