“चाहे देश बरबाद हो या और कुछ भी हो, हम तो वोट, मोदी को ही देंगे….” अकल के दुश्मन और अंध मोदी-भक्तों की पुकार!

उठताबसता भ्रष्टाचारावर अत्यंत दांभिकतेनं रेटून खोटी बोंबाबोंब करणाऱ्या ‘‘मोदी-शहा’’ या दुकलीने आजवर केंद्रात सक्षम ‘लोकपाल-यंत्रणा’ निर्माण केली का? आणि, त्यांच्या गुजराथमध्येही सक्षम ‘लोकायुक्त’ आणला का?? शेकडो कोटींचे घोटाळे करुन देशाबाहेर पळणारे बहुतेक सगळे धनदांडगे गुजराथी; तर, सैन्यदलात किती गुजराथी? …मांडा बघू त्रैराशिक आणि शोधा, स्वतःच त्याचं उत्तर !!!

तब्बल सहा वर्षे उलटून गेली…. ‘‘लोकपाल आणि लोकायुक्त कायदा-२०१३’’ संसदेत पारित होऊन! पण, आजही त्यातल्या कुठल्याही प्रमुख तरतुदी, का नाही हो कार्यान्वित करण्यात आलेल्या, …नरेंद्रभाई और अमितभाई ??? आजही, ‘‘भ्रष्टाचारविरोधी अशी देशातील सर्वात प्रभावी व सक्षम यंत्रणा म्हणून गणल्या जाऊ शकणाऱ्या ‘लोकपाला’कडे भ्रष्टाचाराची चौकशी करणारी व संबंधितांवर गुन्हेगारी खटले दाखल करणारी यंत्रणाच नाही. हे सर्व अतिशय जाणिवपूर्वक, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या ढोंगी व स्वतःच भ्रष्टाचारात अग्रेसर असणाऱ्या, या सरकारने घडवलेलं आहे!!’’… अशी धक्कादायक माहिती नुकतीच एका माहिती अधिकार अर्जाद्वारे उपलब्ध झालेली आहे! मोदी-शहा दुकलीद्वारे, मुद्दामच नामधारी व नाममात्र ठेवल्या गेलेल्या या ‘लोकपाला’चा कारभार कुठून चालतोय; तर, तो दिल्लीच्या पंचतारांकित हाॅटेल ‘अशोक’मधून. शिवाय, या ‘लोकपाला’कडे कुणाला, केंद्र सरकारच्या नोकरांविषयी, सनदी अधिकाऱ्यांविषयी, मंत्र्याविषयी भ्रष्टाचाराची तक्रार करायची असेल; तर, त्याचा साधा विहीत नमुनाही उपलब्ध नाही. त्यांना तो तसा बनवू देण्यात केंद्र सरकारने पद्धतशीररित्या अनेक प्रशासकिय अडथळे आजवर जागोजागी उभे केलेत, हे ही या अंजली भारद्वाज नावाच्या चळवळीतल्या कार्यकर्तीने दाखल केलेल्या माहिती-अधिकारात ढळढळीतरित्या उघड झालय. या एवढ्या गंभीर त्रुटींविषयी राज्यसभेत साधा ‘कृति-अहवाल’देखील (ATR) दाखल करण्याची, अजूनही या मोदी-शहांच्या बेदरकार व मस्तवाल केंद्रशासनाला आवश्यकता भासत नाही… याचा अर्थ, शेंबड्या पोरालाही कळावा!

धनदांडग्या जैन-गुज्जू-मारवाड्यांच्या आर्थिक-हितसंबंधांसाठी अहमदाबाद-मुंबई बुलेटट्रेनचा कारभार जोरजबरदस्तीने बुलेटच्या वेगाने हाकू पहाणाऱ्या मोदी-शहांचा कारभार भ्रष्टाचार-रोखण्याबाबत मात्र एकदम, मुंबईच्या ‘लोकल स्लो-ट्रेन’पेक्षाही मंदगतीने कसा काय चालू आहे… हा प्रश्न, आपण तारस्वरात विचारायला नको?

आपण सारेच इतके मठ्ठ, निगरगट्ट झालेलो आहोत की, मोदी-शहा सरकारच्या अशा धक्कादायक व संतापजनक वर्तनाचा पुरेसा धि:क्कार किंवा संतापही जनसामान्यांना येईनासा झालेला आहे की, काय…. खरंच कळेनासे झालंय! आम्हाला राममंदिर, ३७०, बालासोर या मतांसाठी मुद्दाम घडवलेल्या व जीवनावर कुठलाही साधकबाधक परिणामही करु न शकणाऱ्या भावनिक बाबींपलिकडे खूप काही असतं, असायला हवं… याचीच भूल पडत चाललीय बहुधा. आपली ही अवस्था… मग, अंध-बदमाष ‘मोदीभक्तां’ची काय कथा??? ते म्हणणारचं, ‘‘चाहे कुछ भी हो, हम तो वोट, मोदी को ही देंगे!’’

IIजय महाराष्ट्र, जय हिंद II

….राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)