“इंडिया एक आयडिया” या शीर्षकाखाली, सादर एक खास जनजागरण-लेखमालिका…

पार्श्वभूमी…लोकसभा-निवडणुकीच्या धुमश्चक्रीत इंडिया-आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की, भाषणं करण्याला आता फारसा अर्थ उरलेला नाही…ज्यांना एकदा देशाची सध्याची अवघड परिस्थिती नीट समजली, त्यांना ती समजलीच; म्हणूनच तर ते निष्ठेनं ‘इंडिया-आघाडी’च्या नेत्यांसोबत आहेत. पण, जे बीजेपीवाले, संघवाले आहेत…ते काही तिथे नसतात आणि सर्वसाधारण जनताही हल्ली फारशी राजकीय सभांना वगैरे नसतेच. म्हणूनच लेख लिहून, संदेश लिहून भाजपाई हिंदुत्वाची सोंगंढोंगं, त्यांची राजकीय-बदमाषी उघडी पाडणं…हे सध्या फार फार महत्त्वाचं काम आहे आणि हाती घेतलेल्या एखाद्या असिधारा-व्रतासारखं, ते मी पार पाडत आलोय, याहीपुढे पार पाडेनच…त्याला, तुमची साथ मिळेल, ही अपेक्षा बाळगतो. कारण, जिथून त्यांनी या देशातल्या ‘लोकशाहीची पवित्र गंगा’ मैली केलीय; त्या समाजमाध्यमांतूनच, मग ते व्हाॅट्सॲप असो, फेसबुक असो, युट्यूब असो…तिथे जाऊनच, या ‘मैल्या-गंगे’च्या शुद्धीकरणासाठी आपल्याला इलाज करावा लागेल. म्हणूनच, तर ते इतरांवर तुटून पडतात; पण, माझ्याविषयी त्यांना कितीही संताप आला (त्यांच्या ‘हिट-लिस्ट’वर तर, मी केव्हाचाच आहे आणि म्हणूनच, अनेक खोट्या खटल्यांना व नको नको त्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं आहे, न डगमगता तोंड देणारच) तरी, समाजमाध्यमांतून व्यक्तिशः माझ्याविषयी फारसं बोलत नाहीत…कारण, जरा जरी, ते माझ्या अंगावर आले (ज्याची, मी वाटच बघतोय) तर, मी त्यांना अशातऱ्हेनं शिंगावर घेऊन आपटीन की, त्यांना साधं स्वतःच्या पायावर उभं रहाणं देखील मुश्किल होईल! त्यासाठीच, तुम्ही माझे संदेश सर्वत्र पाठवले पाहिजेत, पाठवत असालच…त्याला काही दिडक्या लागत नाहीत आणि खास मेहनतही लागत नाही, पण तोच अक्सीर इलाज आहे…त्यांना ते लेख, ते संदेश फार फार झोंबतात…त्यावर ते उत्तर देऊ शकत नाहीत, ‘सहन होत नाही आणि सांगताही येत नाही’ अशी फार मोठी पंचाईत आहे त्यांची. त्यातूनच मराठमोळ्या जनतेत मुळातून जागृती होऊ पहातेय…ती चेतना, तो वन्ही; असाच धगधगता, पेटता राहू द्या…”एकदा का ‘इंडिया-आघाडी’ सत्तेवर आली की, तुम्हाला-आम्हाला सामान्य मराठी-माणसांसाठी फार मोठं काम करावं लागणार तर आहेच….धन्यवाद!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)


महाराष्ट्र राज्य, यंदाच्या लोकसभा-निवडणुकीत, सत्तापालट करण्यात निर्णायक भूमिका बजावणार, हे निःसंशयच!
देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी…’NDA’ला का गाडायचं आणि ‘इंडिया-आघाडी’ला का निवडायचं…याचं बिनतोड-सडेतोड दिग्दर्शन, “इंडिया एक आयडिया” या शीर्षकाखाली, सादर करीत आहोत एक खास जनजागरण-लेखमालिका…सादरकर्ते-राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)
—————————————————————————————————