ही राजा ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ नव्हे…

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं…”इंडिया, एक आयडिया”,* मालिकेतील लेख-अनुक्रमांक ४


ही राजा ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ नव्हे…
‘गुजराथी-लाॅबी’कडून चालवल्या जाणाऱ्या ‘हिंदुत्वा’च्या राजकीय-फॅक्टरीतून बाहेर पडणारा तयार-माल म्हणजे… “असत्य, अन्याय, अत्याचार आणि अमानुष शोषण”!

ही ‘गुजराथी-लाॅबी’, हिंदुत्वाच्या नावाखाली प्रथमतः मुसलमान, मग शेतकरी, नंतर लष्करी सेवेत जाऊ पहाणारे नवतरुण आणि आता कामगार, अशी सर्वांवरच हल्लाबोल करतेय… यांना तळागाळातील सगळ्यांचाच तिरस्कार आहे.
मोजक्या लोकांच्याच हातात सत्ता-संपत्ती ठेवायची, वर्णवर्चस्ववादी-शोषक मानसिकता त्यामागे आहे!
…चुकलेल्याला, गुन्हेगाराला शासन करणं, सजा देणं वेगळं आणि एखाददुसरा गुन्हेगार, दहशतवादी सापडला म्हणून त्यांच्या संपूर्ण जातधर्म-समाजाचाच तिरस्कार करणं वेगळं! जातधर्मीय दंगल घडवणारा कुणीही असो, हिंदू असो वा मुसलमान वा अन्य कुणी…कुठल्याही दंगेखोराचा, निःशस्त्र व निष्पाप नागरिकांवर उगारलेला शस्त्रधारी हात, खाली येण्यापूर्वीच त्याच्या छातीचा वेध पोलिसांच्या किंवा लष्कराच्या हातातील बंदुकीच्या गोळीने घेतलाच पाहिजे…शिवछत्रपतींच्या नीतिनुसार त्यात कुणालाही दयामाया दाखवण्याचा, भेदाभेद करण्याचा प्रश्नच कुठे उद्भवतो?
तेव्हा, “प्रतिकार वेगळा आणि तिरस्कार वेगळा…”
“जो एकाचा तिरस्कार करतो, तो सगळ्यांचाच तिरस्कार करत असतो आणि जो एकावर निरपेक्ष प्रेम करतो; तो अवघ्या मानवतेवर प्रेम करत असतो”, हे लक्षात ठेवा!
‘सत्यवचनी राम’ काय सांगतो? कृष्ण काय शिकवतो गीतेत…व्यक्तिवर की, प्रवृत्तीवर लक्ष केंद्रित करायला?
मोदी-शहा…अंबानी-अदानीसारख्यांनी, आपल्या ‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ अशा बकासुरी स्वार्थापोटी चालवलेली, हिंदुधर्माला ‘बदनाम’ करणारी, ही बनावट हिंदुत्वाची ‘फॅक्टरी’ आहे!

भारतीय-अध्यात्माचा पायाच मुळी ‘सत्यमेव जयते’ आहे…सुर्याच्या हिरण्यगर्भासारखं प्रखर-तेजस्वी असलेलं ‘सत्य’, हे भारतीय-अध्यात्मात सदैव, ‘परमेश्वरस्वरुप’ मानलेलं असताना… ‘असत्या’चा आधार घेत, सतत घृणास्पद राजकारण करणारे तथाकथित ‘हिंदुत्ववादी’, स्वतःला हिंदूदेखील म्हणवून घेण्याच्या देखील लायकीचे नाहीत!
या बनावट हिंदुत्ववाद्यांनी कधि राजा हरिश्चंद्राची” परंपरा, ओझरती तरी पाळलीय? सत्यवचनी रामाचं मंदिर बांधता, स्वप्नात दिलेलं वचन पाळणारा राजा हरिश्चंद्र आमचा म्हणता…आणि, तुमची एवढी वाईट अवस्था की, तुम्हाला साधं खरं बोलणं, सत्य सांगणं… अशक्यप्राय व्हावं? रोज रोज नवीन थापा, नवनवीन जुमले.

प्रेमळ-वत्सल-न्यायी व प्रजेप्रति नको तेवढा अतिसंवेदनशील असलेल्या रामाला रागीट, उग्र, क्रुद्ध ‘श्रीराम’ बनवता तुम्ही? ही रामाची सरळ सरळ बदनामी नव्हे तर काय??

“एकीकडे ‘गोमाता’ म्हणणार आणि “गाय हा फक्त, एक उपयुक्त पशू आहे”, हे सावरकरांचं वचन, त्यांच्या अनेक ‘माफीनाम्यां’सारखंच दडवून ठेवणार; शिवाय, दुसरीकडे ‘गोमांस’ (Beaf) विकणाऱ्या कंपन्यांकडून आणि पाकिस्तानच्या ‘हब-पाॅवर’ (HubPower) कंपनीकडून करोडोंचे इलेक्टोरल-बाॅण्ड्स् स्विकारणार” आणि वरुन, कुठल्या तोंडाने हे स्वतःला ‘हिंदुत्ववादी’ म्हणवणार?
…कसल्या हिंदुत्वाच्या गप्पा मारतायत हे, थापेबाज??

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)