२०२४ लोकसभा-निवडणुकीतील धक्कादायक राजकीय परिस्थितीचा विश्लेषण – उत्तरेत हाफ दक्षिणेत साफ

“उत्तरेत हाफ आणि दक्षिणेत साफ” अशा, २०२४च्या लोकसभा-निवडणुकीच्या पहिल्याच चरणात दिसायला लागलेल्या सुस्पष्ट संकेतांनंतर…गुजराथी पंतप्रधानांना भयंकर मिरची झोंबलीय आणि ते, पंतप्रधानपदाची इभ्रत तर सोडाच; पण सामान्य भारतीय-नागरिक म्हणूनही जो काही आब, जी काही मानमर्यादा असते… ते सगळं सोडून, कालचं काँग्रेसचं मनमोहनसिंग सरकार व आजचं काँग्रेसचं न्यायपत्र…यासंदर्भात, पं. नरेंद्र मोदी, वाटेल ते खोटंनाटं व देशात दंगलप्रवण वातावरण निर्माण होऊ शकेल…अशा धोकादायक पद्धतीने बरळायला लागलेत…सत्तेच्या लालसेपोटी आणि राज्यात व केंद्रात सत्तेवर असताना केलेल्या कुकर्मांची फळं भोगायला लागण्याच्या साद्यंत भितीपोटी, पंतप्रधानांनी केलेली ती बेजबाबदार विधानं, इथे आम्ही पुन्हा बिलकूल उद्धृत करु इच्छित नाही आणि कोणीही ती करु नयेत; एवढी, ती कमालीची आक्षेपार्ह आहेत. त्याबाबत, पंतप्रधानांवर IPC 153A अंतर्गत ३ वर्षांच्या तुरुंगवासाची सजा होऊ शकणारा गुन्हा दाखल व्हायलाच हवा, अशी ‘धर्मराज्य पक्षा’ची ठाम मागणी आहे.

‘Rule of law’ आणि ‘Equality before the law’…या घटनात्मक सूत्रांनुसार व तरतुदींनुसार, या वाक्ताडनावर गंभीर स्वरुपाची कारवाई, ही तत्काळ व्हायलाच हवी!

…फक्त, १% असलेल्या, प्रामुख्याने धनदांडग्या-माजोर्‍या गुजराथी-भाषिक भांडवलदारवर्गाने, आजवर संघटितपणे व संगनमताने स्वतःकडे गोळा केलेली देशाची ४०% साधनसंपत्ती, भारतीय-जनतेच्या डोळ्यात, खूप उशिरा का होईना, आता चांगलीच खुपायला लागलीय… हे चांगलं लक्षण आहे. त्यातूनच, या रक्तपिपासू-निर्मम-शोषक ‘भांडवली-व्यवस्थे’ला (Vampire-State System) घरघर लावण्याचा कायदेशीर मार्ग, भारतीय जनतेला खात्रीने सापडेल!

हिंदू धर्माने अथवा भारतीय अध्यात्माने लक्ष्मीला ‘देवत्व’ बहाल जरुर केलंय; पण, त्याचबरोबर, समाजाच्या सर्वांगीण व सर्वंकष उत्कर्षासाठी ‘त्येन त्यक्तेन भुंजिथा’ किंवा ‘त्यागातून भोग वा भोगातून त्याग’ हे मार्गदर्शक सूत्रही घालून दिलेलं आहे व तो आपदधर्म म्हणून सक्तिने पाळायला सांगितलेला आहे.

भाजपाच्या बेगडी-बनावट हिंदुत्वात, फक्त ‘देव देव’ करणं, देवळं बांधणं, आरत्या ओवाळणं… हेच केवळ, ‘हिंदुत्व’ म्हणून गणलं जातं असावं. बर्‍याचदा, हे जे जास्त ‘देव देव’ करणारे असतात ना… तेच व्यवहारात लुटालुटीची ‘देवघेव’ करणारे असतात!

‘भांडवली-व्यवस्थेच्या राक्षसी बळावर, सुसंघटितपणे उर्वरित समाजाची संपत्ती ओरबाडून आपल्याकडे व आपल्या जमातीकडे अन्यायकारकरित्या केंद्रित, संग्रहित करणं… याला ‘हिंदुत्व’ म्हणायचं? जातिवंत हिंदुत्वात, संपत्तीचा ‘अतिसंचय’ झाला की, वेळोवेळी आपली संपूर्ण संपत्ती गोरगरीब-गरजूंना दान करणं (निदानपक्षी, मोठ्या प्रमाणावर दान करणं) अभिप्रेत असतं.

कुणीही कुणाचं तरी, खूप काही लुटल्याखेरीज, ओरबाडल्याखेरीज… कुणाकुणाचंच नव्हे; तर, अवघ्या समाजाचं खूप काही देणं नाकारल्याखेरीज आणि निसर्ग-पर्यावरणावर मोठे अत्याचार केल्याखेरीज ‘अतिश्रीमंत’ (Blood Billioners) होऊच शकत नाही!” 

…या सगळ्याचा साकल्याने विचार करता, नरेंद्र मोदी आणि त्यांचे ‘अंधभक्त’ हे हिंदुधर्माला लांछन आहेत, भारतीय-अध्यात्माला लागलेला काळिमा आहे हा… ते लांछन, तो काळिमा…२०२४च्या लोकसभा-निवडणुकीत ‘इंडिया-आघाडी’ला भरघोस मतदान करत, राजकारणातून साफ मिटवून टाकलाच पाहिजे…जय हो!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)