ते भारताचा ‘पाकिस्तान’ करतायत की, काय…

पाकिस्तानचा उठताबसता उद्धार करणारे, पाकिस्तानला जिंकून ‘अखंड हिंदुस्थान’ची दिवास्वप्न पहाणारे आणि महामूर्ख ‘अंधभक्तां’ना ती स्वप्न दाखवणारे…ज्यापद्धतीने, सध्या निवडणूक-प्रक्रियेत बेफामपणे वागतायत, ते पहाता, ते भारताचा ‘पाकिस्तान’ करतायत की, काय…याची साद्यंत शंका यावी!

आपण पाकिस्तानमध्ये अलिकडेच पाहिलं की, निवडणूक-निकालानंतर तेथील लष्कर, निवडणूक-आयोग आणि न्यायसंस्था एकत्र येऊन…सर्वांनी मिळून जबरदस्तीने निवडणूक हरलेल्यांचं सरकार बनवलं!

“पाकिस्तानला, वर्षाचे बारा महिने दिवसरात्र शिव्याशाप देत रहायच्या; पण, गुपचूप ज्या कर्जबाजारी, लाचार पाकिस्तानची ‘Failed State’ म्हणून जगभर नाचक्की झालीय व जेथील जनता अत्यंत दुःखी, दरिद्री व संतप्त आहे…त्या पाकिस्तानचाच, ‘आदर्श’ डोळ्यासमोर ठेऊन, त्याच्याच पावलावर पाऊल ठेऊन वाटचाल सुरु ठेवायची”…ही यांची घृणास्पद कपटनीति आहे…तेव्हा, सावध राहून काळाच्या हाका ऐका!

…थोडक्यात, ‘मुँह में राम, बगल में छुरी’ (जी यांची खरीखुरी राजनीति मुळातून आहेच) उक्तिनुसार, ‘इनके मुँह में भारत और दिल में पाकिस्तान है’, असं म्हणायची अत्यंत वाईट वेळ, तमाम भारतीय जनतेवर आलीय…

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)