१८व्या लोकसभेची निवडणूक, ही अनेक अर्थांनी ‘लोकविलक्षण’ आहे….

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं…“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक ७

———————————————-

१८व्या लोकसभेची निवडणूक, ही अनेक अर्थांनी ‘लोकविलक्षण’ आहे….

भारतीय-अध्यात्मात १८ या आकड्याला विशेष महत्त्व आहे…१८ पुराणं, गीतेचे १८ अध्याय, १८ दिवस चाललेलं महाभारत युद्ध वगैरे वगैरे!

…त्याचबरोबर, ही स्वातंत्र्याची तिसरी लढाई देखील आहे. पहिली स्वातंत्र्याची लढाई, आपण १९४७ साली लाल-बाल-पाल, म. गांधी, पं. नेहरु, वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस इत्यादींच्या नेतृत्त्वातून, त्यागातून आणि भगतसिंग, सुखदेव, राजगुरु, अश्फाक उल्ला खान, मंगल पांडे, शिरीषकुमार, बाबू गेनू वगैरे अनेक नरवीरांच्या बलिदानातून ब्रिटीशांविरुद्ध लढलो आणि अखेर स्वतंत्र झालो…त्यानंतर, स्वातंत्र्याची दुसरी लढाई, आपण स्व. इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीविरुद्ध १९७७ साली लढलो आणि आता, त्यानंतर बरोबर ४७ वर्षांनी, ही मोदी-शहा भाजपाई-संघीय सरकारने लादलेल्या अघोषित-बेकायदेशीर आणीबाणीविरुद्ध तिसरी स्वातंत्र्याची लढाई लढतो आहोत. १९७७ साली इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी, ‘कायदेशीर मार्गाने आली व कायदेशीर मार्गानेच गेली’…त्यांनी काही विरोधीपक्ष नेत्यांना जरुर तुरुंगात टाकलं होतं; पण, तेव्हा त्या नेत्यांच्याही हातून काही गंभीर अपराध-गुन्हे घडले होते, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. पण, इंदिरा गांधींनी कुठल्याही विरोधी पक्षाची बँक-खाती गोठवून त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न नव्हता केला आणि एकदा लोकसभा-निवडणूक जाहीर केल्यानंतर, त्यांनी एकूणएक सर्व विरोधकांची सन्मानाने तुरुंगातून सुटका केली आणि लोकशाही-स्वातंत्र्याची बूज राखण्याकामी, देशभरात निवडणुकीसाठी, अगदी मोकळंढाक वातावरण जाणिवपूर्वक ठेवलं. पण, आज जी अघोषित-बेकायदेशीर आणीबाणी भाजपा-सरकारने देशभरात लादलेली आहे; ती वस्तुतः, इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीपेक्षा कैकपटीने भयंकर व देशाच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून खूपच भयावह आहे!

‘हा लढा भारतीय जनता पक्ष विरुद्ध INDIA आघाडी असा नसून भारतीय जनता पक्ष विरुद्ध भारतीय जनता’ असाच आहे…जे अंधभक्त त्यांच्या पाठीशी आहेत, त्यांचं काय? अहो, ती खरीखुरी देशभक्त भारतीय ‘जनता’ वगैरे नव्हे; तर ते, वळवळणारे जातधर्मविद्वेषी ‘जंत’ आहेत…वळवळू द्या खुशाल त्यांना.

प्रथम शेतकरी, मग मुसलमान, त्यानंतर अगिपथावरचे नवतरुण अग्निवीर आणि सरतेशेवटी कामगार…अशा सगळ्याच तळागाळातल्या लोकांना, हे होरपळून टाकणार आहेत, बरबाद करणार आहेत. त्यात बरेचसे तळागाळातले ‘नमोभक्त’ किंवा ‘अंधभक्त’ देखील आलेच; पण, येऊ घातलेल्या भीषण भविष्याबद्दल ते ‘अंधभक्त’ मनोरुग्ण व नमोरुग्ण झालेले असल्याने त्याबद्दल ‘अनभिज्ञ’ आहेत… पण, जे सूज्ञ आहेत, ते ‘इंडिया-आघाडी’सोबत आहेत.

आपल्या देशाच्या पंतप्रधानाला ‘इंडिया’ शब्दाची ‘ॲलर्जी’ आहे का हो? इंडिया शब्द उच्चारताना लाज वाटते की काय त्यांना की, मूळव्याधीसारखा ‘सहन होत नाही आणि सांगता येत नाही’, असा त्रास होतो?

…’इंडिया’ नाही म्हणत, ‘इंडी इंडी’ करतात…अरे, ती ईडी-आयटी-सीबीआयचा धाक दाखवून आणि सरकारी-कंत्राटांतल्या खोक्यांचं आमिष दाखवून लाटलेली… हजारो कोटींची ‘इलेक्टोरल-बाॅण्ड’ची ‘हंडी’, पंतप्रधानांच्या डोक्यात एवढी ‘फीट’ बसलीय की, त्यामुळेच ते सारखे ‘इंडी इंडी’ करतात!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष) (क्रमशः)