“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक ९: ४ जून रोजी कोमलणार, अंतरी धर्मविद्वेषाचा ‘मळ’ बाळगणारं भाजपाई ‘कमळ’!

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं… “इंडिया, एक आयडिया” , मालिकेतील लेख-अनुक्रमांक ९

——————————————————————————————

रोज उठून भाषणात मु’सल’मान द्वेषाचा ‘सल’…देश बुडला तरी चालेल; पण, बुडत्या देशाची सत्ता, आपल्याच हाती राखण्याकडचा नृशंस ‘कल’…४ जून रोजी कोमलणार, अंतरी धर्मविद्वेषाचा ‘मळ’ बाळगणारं भाजपाई ‘कमळ’!

मुळातून, इंडिया-आघाडीच्या विजयानंतर भाजपाच्या ‘कमळ’ निशाणीवर पुनश्च नव्याने जोरदार ‘आक्षेप’ घेतला गेलाच पाहिजे…’गायवासरु’, ही काँग्रेसची निशाणी भारतीय-अध्यात्माचं प्रतिक म्हणून, जर चालू शकत नाही; तर, अध्यात्माचं उच्चतम प्रतिक असलेलं ‘कमळ’…भाजपाची ‘निवडणूक-निशाणी’ म्हणून, कसं काय चालू शकतं?

त्यातून, ज्या घृणास्पद व संतापजनक पद्धतीने भाजपाई नेत्यांचा, मतांचं ‘ध्रुवीकरण’ करण्यासाठी देशात धार्मिक दंगली किंवा दंगलप्रवण वातावरण निर्माण करण्याचा, जो अश्लाघ्य प्रयत्न आटोकाट चाललेला दिसतोय…तो पहाता, त्यांची ‘कमळ’ निशाणी, लवकरात लवकर कायमची बाद करायला लावलीच पाहिजे.

यांना, भारताची २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश, यात आपली सत्ता येते किंवा जाते…याने मोठा फरक पडत नाही, पण त्यांना कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही मार्गाने लोकसभा-निवडणूक जिंकायचीय… EVMची हेराफेरी करुन, निवडणूक-आयोगाला ताटाखालचं मांजर बनवून, इलेक्टोरल-बॉंडचे हजारो कोटींचे घोटाळे करुन, ईडी-आयटी-सीबीआय या दमनकारी केंद्रीय यंत्रणांचा बेलगाम-बेकायदेशीर गैरवापर करुन, निवडणुकीची आदर्श-आचारसंहिता सरळ सरळ धाब्यावर बसवून धर्माच्या-धर्मप्रतिकांच्या नावावर मते मागून, देशभरात हिंदू-मुस्लिम, ओबीसी-मराठा-आदिवासी असा दंगलप्रवण जातधर्मविद्वेष पसरवून किंवा देशातील जनतेवर ‘सरकारी-दहशत’ बसवून…वाटेल त्या अनैतिक व बेकायदेशीर मार्गांनी का होईना; पण, त्यांना लोकसभेची निवडणूक जिंकायचीय!

…कारण उघड आहे की, देशाचं अर्थकारण, सैन्यदले, केंद्रिय निमलष्करी दले…ईडी, सीबीआय, आयटी अशा सगळ्याच दमनकारी केंद्रीय-यंत्रणा यांना केंद्रात सत्ता आणून ताब्यात ठेवायच्यात…ज्यातून, देशभरात ‘सरकारी-दहशत’ निर्माण करुन न्यायालयांसकट सर्वांवरच ‘वचक’ बसवता येतो व ‘अनियंत्रित सत्ता’ त्यांच्या हातात येते.

“वारांगनेव नृतनीतिरनेकरुपा” यानुसार, रोज नवनवे ‘खोटे मुखवटे’ धारण करणाऱ्या ‘जुमले’बाजांचं सरकार आलं की, जनतेला ‘जुलूम’ सहन करण्याखेरीज गत्यंतर रहात नाही, जे गेले १० वर्ष ‘मोदी-शहा’, या व्यापारी-जमातीच्या राजवटीत आपण पहात आलो!

खलील जिब्रान म्हणून गेलेलाच आहे, “जिस देशका राजा ‘बेपारी’, उस देशकी प्रजा भिखारी!”

‘मोदी-शहां’च्या बीजेपीची, गेल्या १० वर्षांची राजवट, ही एकप्रकारे भारतीयांसाठी ‘इष्टापत्ती’च म्हणायची…ती या अर्थाने की, ही भाजपाई-संघीय १० वर्षांची एकाधिकारशाही, हुकूमशाही व जुलूमशाहीची रासवट राजवट एकदाची भारतीय जनतेनं अनुभवल्यानंतर… पुढल्या ‘अमृतकाळा’पर्यंत, म्हणजेच २१वं शतक संपेपर्यंत तरी, भारतीय जनता…या असल्या नकली बीजेपीला जोड्याशी उभी करणार नाही… ट्रेलरच एवढा भयंकर होता, तर कोण मूर्ख पूर्ण चित्रपट पाहू धजावेल?

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)  (क्रमशः)