“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १६

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं… “इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १६

—————————————————————————

स्वतःच्या १० वर्षांच्या राजवटीबद्दल तोंडून ब्र काढायचा नाही; उलटपक्षी, वादळ आल्यावर वाळूत चोच खुपसून बसणाऱ्या शहामृगासारखं, मागील ७० वर्षांच्याच नव्हे; तर, ७०० वर्षांच्या इतिहासाच्या वाळूत तोंड खुपसून बसायचं आणि एखाद्या कुडमुड्या ज्योतिषासारखं पुढील २५-५० नव्हे; तर, हजार वर्षांचं भविष्यकथन करायचं…जणू हनुमान, परशुराम, बिभीषण, अश्वत्थामा, कृपाचार्य वगैरेंसारखे हे गृहस्थ, ‘आठवे चिरंजीव’च!

लोकशाही, ही अगदी ‘आदर्श’ अशी व्यवस्था नसली…तरीही, हुकूमशाही-लष्करशाहीसारखी जुलमी-निर्दयी व कमालीची शोषक व्यवस्था नक्कीच नव्हे! अगदी कल्पनातीत अशी, भाजपाई मोदी-शहा सरकारची आजची ‘जुलूमशाही’ पाहताना, आपल्याला हे वाटल्यावाचून रहात नाही की, यापेक्षा ब्रिटीश-राजवट काय वाईट होती? कशासाठी भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, मंगल पांडे, अशफाक उल्ला खान, शिरीषकुमार, बाबू गेनू यासारख्या आपल्या शेकडो स्वातंत्र्यवीरांनी आपले प्राण गमावले…लो. टिळक, म. गांधी, पं. नेहरु वगैरे कशासाठी वर्षानुवर्ष ब्रिटीश तुरुंगातून खितपत पडले होते??

या भाजपाई-संघीय मनोवृत्तीच्या लोकांना, इतर कोणी नव्हे; पण, म. गांधी, म्हणूनच कायम शत्रू नं. १ वाटत आला; कारण, तो महात्मा, मुळातूनच गदगदा हलवून लोकांना जागं करत होता…लोकशाहीची सवय नसलेल्या आपल्या देशात, लोकशाहीचा ‘जागर’ निर्माण करत होता! म. गांधी नसते तर, अजून आपण ‘गुलामी’तच खितपत पडलो असतो.

…आणि, हे डँबिस लोकं काय म्हणतात; तर, म्हणे म. गांधींच्या अहिंसेमुळेच आपल्याला स्वातंत्र्य ३०-३५ वर्ष उशिरा मिळालं…अरे, वर्ष उलटी मोजा आणि मग बघा, यांना कोणी अडवलं होतं ते…करायची होती वि. दा. सावरकरांच्या नेतृत्त्वाखाली हवी तेवढी हिंसा आणि मिळवून द्यायचं होतं, देशाला लवकरात लवकर स्वातंत्र्य…उगीच आपलं काहीही बडबडायचं! स्वातंत्र्य-चळवळीत यांचा काडीमात्र सहभाग नाही…१९४२च्या ‘भारत छोडो’ (Quit India Movement) आंदोलनालाही यांनी अपशकून केलेला, हा जिताजागता इतिहास आहे.

सध्याचं वर्तमान पहायचं तर, सीताराम केसरींच्या १९९४-९५ जमान्यातील आयकर-भरणा करण्यातल्या काँग्रेसच्या किरकोळ तांत्रिक त्रुटी दाखवत, आयकरखात्याकडून (अर्थातच, मोदी-शहांच्या इशाऱ्यावरच) दिडशे पट दंड आकारलाय…याच गतीने, हे म. गांधी, वल्लभभाई पटेलांनी जमनालाल बजाज यांच्यासारख्या धनवानांकडून घेतलेल्या देणग्यांमध्ये देखील काही अनियमितता दाखवून, अव्वाच्या सव्वा दंड आकारायला कमी करणार नाहीत. उद्या ‘इंडिया-आघाडी’ सत्तेवर आली; आणि समजा, अगदी सूड उगवायचा म्हणून बीजेपीच्या संदर्भात, असा काही हिशोबातल्या खूप जुन्या त्रुटी दाखवण्याचा खेळ, काँग्रेस कधि करु शकेल? तसं करुच शकणार नाही…कारण, म. गांघी, पं. जवाहरलाल नेहरु, वल्लभभाई पटेल यांच्यासारखी आभाळाएवढी मोठी माणसं, जेव्हा ब्रिटीशांविरुद्ध स्वातंत्र्ययुद्ध लढत होती…तेव्हा हिंदूमहासभेचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते व पाठीराखे (‘भाजपा’चे पूर्वसुरी) शेपूट घालून बसले होते; मग, स्वातंत्र्ययुद्ध लढण्यासाठी निधी उभारण्याचा व त्याचा हिशोब राखण्याचा प्रश्नच कुठे उद्भवतो? उलट, यांचे माफिवीर, ब्रिटीशांपुढे शरणागत होत, त्यांच्यापुढे लाळ घोळत होते…जिल्हाधिकाऱ्याच्या वेतनाहून अधिक भरभक्कम निवृत्तीवेतन (Pension) मिळवत होते.

…आणि म्हणे, ५०० वर्षांची राममंदिर बांधण्याची भारतीय जनतेची आम्ही मनोकामना पूर्ण केली…५०० वर्ष सोडाच, १०० वर्षांपूर्वी तरी तुम्ही कुठे होतात? तुमचे पूर्वज, तुमचे पूर्वसुरी गेल्या १०० वर्षांत, कधि स्वातंत्र्य-चळवळीत-स्वातंत्र्य युद्धात भाग घेताना दिसले नाहीत ते? थापाडे बाता करतायत…५०० वर्षांच्या!

तेव्हा, लोकसभा-निवडणुकीच्या मतपेटीतून ‘इंडिया-आघाडी’ला सत्तेवर आणण्यासाठी, एकच आवाज उठवा आणि येऊ घातलेल्या ‘गुलामगिरी’ला वेळीच ठोकरा….

“ये ख़ामोश मिज़ाजी तुम्हें जीने नहीं देगी…

इस दौर में जीना हैं, तो कोहराम मचा दो!”

 …राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)  (क्रमशः)