चीनचे आजन्म हुकूमशहा शी जिनपिंग यांना भारतातल्या ‘एक्झिट-पोल’च्या निकालाने (खरंतरं, तद्दन बनावट), एवढा ऊरभरला आनंद होण्यामागचं नेमकं कारण काय?
गलवान-खोर्यातील भारताचा ४००० चौ. कि. मी.हून अधिक भूभाग जबरदस्तीने बळकवणार्या शी जिनपिंग यांच्याविरुद्ध बोलताना पं. नरेंद्र मोदींची जीभ का अडखळते व पं. नरेंद्र मोदी बालीसारख्या दूरवरच्या ठिकाणी, १७व्या G-20 बैठकीचं निमित्त साधून, याच शी जिनपिंग यांना अर्धा-पाऊण तास भेटतात, ती भेट भारत-सरकार आणि ‘गोदी-मिडीया’तून लपवली का जाते??
चीनच्या १९६२च्या आक्रमणाबाबत नेहरुंवर उठसूठ तोंडसुख घेणाऱ्या भाजपाई-संघीय लोकांची, चीनची भारतासंबंधी अत्यंत आक्रमक भूमिका व जोरजबरदस्ती पाहूनही, त्याविरुद्ध ब्र काढताना बोबडी का वळते???
“घोडा का अडला, पानं का सडली व भाकरी का करपली”, या तिन्ही प्रश्नांचं उत्तर जसं एकच, ‘न फिरवल्यामुळे’ हे आहे…तसंच, चीनसंदर्भातील वरील तिन्ही प्रश्नांचं एकच उत्तर आहे आहे, ते म्हणजे, “दिल्लीश्वरां’च्या खासमखास गुजराथी-भांडवलदारवर्गाच्या आर्थिक-हितसंबंधांच्या सुरक्षेसाठीच केवळ (भारत देशाच्या नव्हे)”!
चीनच्या ‘ग्लोबल-टाईम्स’मध्ये या तथाकथित एक्झिट-पोलबाबत चीनने अतिशय आनंद प्रकट केला असून, “भारताचे चीनबाबतचे परराष्ट्र-धोरण पूर्वीसारखेच (म्हणजे, चीनच्या व ‘दिल्लीश्वरांना प्रिय’ अशा मोजक्या उद्योगपतींच्या हिताचं…मग, देश आणि देशाचे हितसंबंध, देशाचं कल्याण व सुरक्षितता चुलीत गेली तरी हरकत नाही, अशी देशविघातक-देशद्रोही वृत्ती) कुठल्याही राजकीय अडथळ्यांविना तसेच चालू राहील”…याबाबत, समाधान व्यक्त केलंय.
जगात पूर्वीसारखे ‘अमेरिका-रशिया’ असे दोन गटतट नसून, चीन मध्यंतरीच्या काळात जगातल्या स्वस्त उत्पादनाचं केंद्र बनून व आपलं लष्करी-सामर्थ्य प्रचंड वाढवून एवढा मोठा झालाय की, आता जगात ‘अमेरिका विरुद्ध चीन’, असे दोन गट तयार झालेत आणि अगदी, रशियाला सुद्धा चीनला सांभाळून घ्यावं लागतं (रशियन तेलाच्या विनिमय दराबाबत चीनची दादागिरी खपवून घ्यावी लागते), त्याचा सतत आधार घ्यावा लागतोय. चीनचा छुपा अजेंडा व मुखवटा, जगासमोर उघडा होण्याअगोदर, जागतिक-शांतताप्रिय अलिप्ततावादी परराष्ट्र-धोरण राबवणार्या पं. जवाहरलाल नेहरुंनी चीनवर विश्वास टाकणं, अगदी स्वाभाविक होतं. पण, चीनची रसातळाला गेलेली विश्वासार्हता व षडयंत्री कारभार, सूर्यप्रकाशासारखा जगासमोर सातत्याने उघडा पडत असतानाही…आपल्या ‘भांडवलदार-मित्रपरिवारा’चे आर्थिक-हितसंबंध जपण्यासाठी (Crony-Capitalists) देशाचं हित गहाण टाकणं, हा ‘देशद्रोह’ नव्हे काय? केवळ चीनशीच नव्हे; तर, ज्याविषयी भारत-सरकार व ‘गोदी-मिडीया’ मूग गिळून गप्प बसलेला असतो; त्या चीनच्याच ताब्यातील ‘हाँगकाँग’शी (जो अर्थव्यवहार, चीनपासून स्वतंत्रपणे वेगळा दाखवला जातो) आपल्या देशाचा अर्थव्यवहार काळजीपूर्वक तपासून पहाणाऱ्याला ‘हिरा-उद्योगा’तून होणारे करोडो-करोडोंचे ‘हवाला-व्यवहार’ व त्या व्यवहारांचे छुपे ‘लाभार्थी’ कोण, याचं सामान्य ज्ञान होईल व जबरदस्त धक्का बसेल!
…राजन राजे