“लबाड लांडगं ढाँग करतंय…लगीन करायचं साँग करतंय!”

एकापाठोपाठ एक परिस्थितीवशात ‘माफीचा रतीब’ घालणाऱ्यांनो,

आम्ही मतदार म्हणून अनेकदा मूर्ख बनत असतो…कधि ‘सब का साथ, सब का विकासा’च्या नादानं; तर, कधि ‘बालासोर सर्जिकल-स्ट्राईक’च्या रुपानं…आम्ही सहजी मूर्ख बनवले जात असतो…आणि, प्रत्येक निवडणुकीदरम्यान ‘उल्लू’ तर पिढ्यानपिढ्या बनलेलो असतोच (सध्या, आम्ही सत्ताधाऱ्यांचे अचानक ‘लाडके भाऊबहिण’ झालोत)…पण, आम्हाला एवढेही ‘बिनडोक’ समजू नका की, आमच्या ‘महाराष्ट्र-पुरुषा’चा पुतळा, तुमच्या किळसवाण्या राजकारणाने अल्पावधीत कोसळून पडावा आणि तरी आम्ही, तुमच्या ‘कोरड्या माफी’च्या नक्राश्रूंनी विरघळून जावं!

“पुतळ्याबाबत ‘राजकारण’ करु नका” म्हणता…वा रे व्वा! अहो, तुमच्या राजकारणाची दळभद्री घाई, आम्ही २०१४नंतर उघड्या डोळ्यांनी पहातो आहोत…”नोटंबदी-GST लागू करण्यापासून सुरु झालेली घाई, गळकं राममंदिर-संसदभवन बांधण्याचा वेडावाकडा टप्पा पार करत, थेट शिवछत्रपतींच्या सिंधुदुर्गातल्या पुतळा उभारणीपर्यंत मजल गाठती झाली!
केलेली ही सगळीच निवडणूक-मुहूर्त गाठण्याची घाई आणि त्यातली बेपर्वाई…निवडणुकीत ‘राजकीय-लाभ’ उठवण्यासाठी नव्हती; तर, कुठला अलौकिक स्वरुपाचा दानधर्म-पुण्यकर्म करण्यासाठी होती काय? एकापाठोपाठ एक अत्यंत हिणकस अशी ही लगीनघाईची ‘मालिका’, तुमच्या घृणास्पद राजकीय-डावपेचांचाच एक भाग नव्हती; तर, मग काय होती?
…त्याकामी, शिवछत्रपतींसारख्या राष्ट्रपुरुषालाही वेठीला धरताना तुम्हाला जराही शरम वाटली नाही? ‘चटावरचं श्राद्ध उरकावं’ इतक्या घिसाडघाईने, ते तुम्ही लोकांनी, पुतळा-उभारणीचं काम अत्यंत बेजबाबदारपणे उरकलंत!
पुतळा कोसळून पडल्यावर तरी तुमच्या चेहर्‍यावर पश्चातापाचं थोडं तरी निशाण, कुणाला दिसलं का टीव्हीवर? ते तर, सोडाच; वरुन, “ताशी ४५ कि. मी. वेगाने वारा सुटला काय आणि पुतळा त्या वेगानं पडला काय (ज्या वार्‍याच्या वेगाने थोड्याबहूत झाडांच्या फांद्याच फक्त हलाव्यात); त्यात काय मोठंस, नवा मोठा पुतळा बांधू”, ही पैशाचिक-मस्ती तुम्हा सर्व सत्ताधाऱ्यांमध्ये दिसत होती…आणि त्यापोटीच, दुसर्‍याच दिवशी ‘गोविंदा गोविंदा’ करत तुम्ही सगळ्यांना थोडं आवरण्याऐवजी, थयथया नाचवलंत! नाहीतरी आम्ही मराठी-माणसं, नको तेवढी ‘उत्सवप्रिय’चं.
“एकवेळ पोटाला नाही मिळालं तरी चालेल; पण, नाचायला मिळायला पाहिजे”, या अवसानघातकी वृत्तीची! एकवेळ ताटात जेवायला ‘दही’ परवडत नसलं तरी चालेल; पण, ‘दहीहंडी’ फोडायला हवीच…ही मराठी फाजिल-उत्सवप्रियता, आपल्यापेक्षा अधिक चांगली कोण जाणतो? तेव्हा, त्या ‘गोविंदा’च्या नाचगाण्यात लोकं, पुतळा कोसळण्याची दुर्घटना, विसरतायत का ते पाहूया…हा तुमचा ‘राजकीय-आडाखा’ होता आणि पुतळ्यापेक्षाही अधिक वेगाने तो आडाखा कोसळला…म्हणूनच, हे ‘माफिचक्र’ आता गरगर फिरायला लागलंय!

…लक्षात ठेवा, या शिवबा-संतांच्या महाराष्ट्राचा ताणाबाणा म. ज्योतिबा फुले, छ. राजर्षी शाहू महाराज, गोपाळ गणेश आगरकर, हमीद दलवाई, अण्णाभाऊ साठे, प्रबोधनकार ठाकरे, डाॅ. नरेंद्र दाभोळकर वगैरे अनेक समाजसुधारकांनी आपल्या त्यागातून, परिश्रमातून घट्ट विणलेला आहे…त्याचा धागा नक्कीच एवढा कच्चा नाही!

…राजन राजे