एकटा राहुल लढतोय, प्रियंका गांधी लढतेय…राष्ट्रीय स्तरावर पवन खेरा, सुप्रिया स्रिनेट, जयराम रमेश, कुमार केतकर यांच्यासारखे काही काँग्रेस नेते जीवाच्या कराराने लढतायत…पण, ठाणे-मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पहावं, तर सगळ्याच काँग्रेस नेत्यांच्याबाबत अगदी ‘आनंदीआनंद’ आहे. फारसे हातपाय न हलवताच राहुल गांधींच्या पुण्याईवर निवडणुका जिंकायच्या आणि ‘महाविकास आघाडी’ची सत्ता भोगायची, अशी स्वप्न पहाण्यात ते मश्गुल आहेत!
महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, ज्यापद्धतीने मोदी-शाह भाजप सरकार आणि संघवाल्यांना थेट नेमकेपणाने अंगावर घेतायत, त्यांच्यावर मर्मभेदक प्रहार करतायत… त्याच्या जवळपास देखील काँग्रेसवाल्यांचा राजकीय प्रचाराचा ‘मारा’ दिसत नाही. ते अजूनही ‘राजकीय-फोटोसेशन’ करण्यातच दंग आहेत…एकूणच राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांची ‘HardPower’ आणि उर्वरित काँग्रेस-शिवसेनावाल्यांची ‘SoftPower’, असा हा विचित्र, दिशा हरवत चाललेला राजकीय-लढा दिसतोय!
तेव्हा, सगळ्यांनाच विचार करायला भाग पाडणारा हा विश्वास उटगी यांचा व्हिडीओ आहे, जरुर पहा….
**आयसीआयसीआय बँक व्यवस्थापन, अमेरिकेच्या भांडवल-बाजार नियामक संस्थेला (The Securities and Exchange Commission…SEC) माधवी बूचला ICICIकडून मिळालेल्या संपूर्ण आर्थिक-लाभांची माहिती देते…पण, भारतातल्या तशीच यंत्रणा असलेल्था SEBI ला मात्र परिपूर्ण माहिती देते नाही,
सरकार हर्षद मेहता-केतन पारेख प्रकरणाप्रमाणे ‘संयुक्त संसदीय समिती’ (Joint Parliamentary Committee…JPC) हिंडेनबर्ग-अदानी आणि आता ‘सेबी’च्या प्रमुख माधवी बूच यांच्या संदर्भात नेमत नाही, “भारतात जातीयजनगणना हवी किंवा नको” यावर नेमकेपणाने भाष्य न करणारे (पूर्वी तर स्पष्टच विरोध दर्शवला होता) आणि बांगलादेशी हिंदुंबद्दल ‘नक्राश्रू’ ढाळणारे; पण, इथे भारतात गुलामगिरी व नवअस्पृश्यता भोगणाऱ्या ९९.९९% हिंदू कंत्राटी कामगार-कर्मचारीवर्गाबद्दल ‘ब्र’ न काढणारे…रा.स्व.संघाचे मोहन भागवत आर्थिक-घोटाळ्यात अडकलेल्या गौतम अदानीला मात्र लागलीच सुस्पष्ट पाठिंबा जाहीर करतात…याचा नेमका काय अर्थ लावायचा?
…या सर्व राष्ट्राच्या आर्थिक व सामाजिक आरोग्याच्या आसाला भिडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी विश्वास उटगी तसेच, रवीश कुमार, दिनेश गोस्वामी, 4pmचे संजय मिश्रा, पुण्यप्रसून बाजपेयी, अशोक वानखेडे, दीपक शर्मा, अभिषेककुमार वगैरेंचे जमतील तसे व्हिडीओ जरुर पहा आणि देशात आर्थिक-घोटाळ्यांचा काय नंगानाच चाललाय, तो जबाबदार नागरिक म्हणून जाणून घ्या…धन्यवाद!
…राजन राजे