‘सॅमसंग’ संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….(लेख अनुक्रमांक २)

…जरी, CPM सत्तारूढ स्टॅलिन-सरकारचा घटक-पक्ष असला; तरी, फारशा राजकीय-पाठबळाविनाच निव्वळ कामगारांच्या पोलादी एकजुटीच्या व वज्रनिर्धाराच्या बळावर…उन्मत्त झालेल्या ‘सॅमसंग-व्यवस्थापना’ला, ज्यापद्धतीने सॅमसंगच्या लढाऊ कामगारांनी (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची ‘CITU’/’सिटू’ युनियन) नमवलंय …त्याला, महाराष्ट्रभरातील कामगारांतर्फे “धर्मराज्य-सलाम”!
हा, दाक्षिणात्य (विशेषतः, केरळ, तामीळनाडुमधील) आणि बंगाली कामगार-कर्मचारीवर्गाचा ज्वलंत-जाज्वल्य लढाऊ बाणा, ‘मराठी-कामगारां’च्या रक्तात कधि उतरणार?
…चार शतकांपूर्वी एक ‘शिवाजी’ जन्माला येतो काय अन् आमची पिढ्यापिढ्यांची ‘पराभूत’ मराठी-मानसिकता बदलून टाकतो काय… सगळंच केवढं स्फूर्तिदायक! पण, शिवाजी जन्माला घालायला नियती, किमान हजार एक वर्षे तरी घेतेच… तेव्हा, मराठी जनतेच्या दिमतीला, शिवछत्रपतींची ‘प्रेरणा’ असताना… तो तलवारीच्या पातीसारखा धारदार असणारा ‘आदर्श’ ठेऊनच आपण पुढील वाटचाल स्वतःच्या हिंमतीच्या बळावर करायची असते, इतिहासाचा हा दाखला-संदेश मराठी-कामगार विसरला…आणि, काॅर्पोरेटीय (विशेषतः, बहुराष्ट्रीय म्हणजेच, मल्टीनॅशनल) ‘दहशतवादा’समोर (Corporate-Terrorism) गुडघे टेकत दोनअडीच दशकांपूर्वीच शरणागतीचं पांढरं निशाण फडकावून बसला!
…जरी काहीशी वादग्रस्त असली; तरी, डाॅ. दत्ता सामंतांच्या कारकीर्दीचा ‘अपवाद’ वगळता (अर्थात, त्याकाळात कामगार-चळवळीला मिळणारा भक्कम ‘राजकीय-आधार’, FERA कायदा, एका कंपनी-छत्राखाली शेकडो कामगार असणे वगैरे अनेक स्थानीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाबी अनुकूल होत्याच, हे विसरुन चालणार नाही)…तद्नंतरची बहुतांश कामगार-चळवळ म्हणजे, ‘गांडुळांची वळवळच म्हणावी लागेल, अशा पराभूत मानसिकतेत अडकली!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ) (क्रमशः)