“वेडसर अमेरिकनांचा, वेडसर अमेरिकनांकडून, वेडसर अमेरिकनांसाठी…निवडला गेलेला ‘वेडसर’ अध्यक्ष”…

“वेडसर अमेरिकनांचा, वेडसर अमेरिकनांकडून, वेडसर अमेरिकनांसाठी…निवडला गेलेला ‘वेडसर’ अध्यक्ष”, असं ज्या निवडणुकीचं एका वाक्यात वर्णन करता येईल; अशा ‘अंकल सॅम’च्या नुकत्याच लागलेल्या निवडणूक-निकालानंतर तर, भांडवली-व्यवस्थेसंदर्भातील अनेक गंभीर प्रश्न आता सातत्याने ऐरणीवर येत राहतील. ८ वर्षांपूर्वी ‘अमेरिका फर्स्ट’, हे अमेरिकेची ताकद, सुरक्षा व वर्चस्व जगभरात अव्वल नंबरवर राखण्याबाबतचं वक्तव्य करणाऱ्या डोनाल्ड ट्रंप नावाच्या अब्जाधीश उद्योगपतीची, याहीवेळेस प्रचारात जवळपास तिचं भाषा होती…फरक, एवढाच होता की, याखेपेस त्याच्यासोबत एलिऑन मस्क नावाचा एक अत्यंत बुद्धिमान; पण, वेडसर-विक्षिप्त उद्योगपती, आपल्या धंद्या-व्यवसायाचं जगभरातील वर्चस्व कायम राखण्यासाठी, त्यांच्यामागे ठाम उभा होता!

…{काल दुपारी ३वा.१८मि. रोजीचं राजन राजे, अध्यक्ष-धर्मराज्य पक्ष, यांचं व्हाॅटस्ॲपवरचं STATUS}