कालची लोकसभेची काय किंवा आजची महाराष्ट्र-विधानसभेची काय…दोन्ही निवडणुका; तसेच, देशाच्या इतर राज्यांतील निवडणुका, या कमालीच्या विषम पातळीवरील लढती होत्या व आहेत….
लोकसभा-निवडणुकीनंतर जर, दुसर्या क्रमांकाचं महत्त्व कशाला असेल; तर ते आहे, महाराष्ट्राच्या विधानसभा-निवडणुकीला! अमेरिकेत न्यूयाॅर्कचं, जे राजधानी ‘वॉशिंग्टन’पेक्षाही मोठं असं अनन्यसाधारण महत्त्व…तेच, मुंबई-महाराष्ट्राचं दिल्लीहूनही कितीतरी पटीने अधिक महत्त्व…म्हणूनच, ‘गुजराथ-नागपूर’ परिवारातल्या ‘वासवी’ भांडवली-‘संघ’शक्ति एकत्र येऊन (हा ही एक ‘सांघिक-प्रयोग’च) मुंबई-महाराष्ट्राचा घास घेऊ पहातायत.
अशा समरप्रसंगी, मराठी-आत्मसन्मानाला साद घालत…मतं विकत घेऊ पहाणाऱ्या व त्याकामी पाण्यासारख्या वहाणार्या काळ्यापैशाला लाथ मारुन झुगारुन देणं, नितांत गरजेचं आहे.
“ही न्यायव्यवस्था काहीकांची रखेल झाली…ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली”, …अशा जळजळीत शब्दांत वस्तुस्थिती मांडणाऱ्या लोकशाहीर अणाभाऊ साठेंचा पदोपदी ‘आठव’ (त्या ‘दामदास’ आठवलेंचा मात्र, अजिबात नकोच) व्हावा…अशी भयावह परिस्थिती देशभरात आजमितीस मौजूद असताना होणारं, आजचं महाराष्ट्र-विधानसभेचं मतदान हे…१२ करोड नव्हे; तर, १२० करोड मोलाचं ‘मतदान‘ होय!
संपूर्ण भारतभर विद्वेषाचा विखार पसरवत ‘जातधर्मीय-ध्रुवीकरणा‘च्या काळ्या पडद्याआडून,
** अत्यंत महागड्या, लुटेर्या खाजगी-शिक्षणाद्वारे शिक्षणक्षेत्रात नवी ‘चातुर्वर्ण्य-व्यवस्था’ उभी करणाऱ्या….
** ४ काळ्या कामगार-कायद्यांनी बनलेली ‘काळी कामगार-संहिता’ (Black Labour-Code) लादणार्या; तसेच, ‘कंत्राटी-कामगार पद्धती’द्वारे ‘निळ्या काॅलर’वाल्या तमाम कष्टकर्यांना (व आता तर, ‘पांढऱ्या काॅलर’वाल्या सुशिक्षित पांढरपेशांना देखील) ‘गुलामगिरी व नव-अस्पृश्यते’त ढकलणार्या….
** शेतकऱ्यांवर ३ काळे कायदे लादू पहाण्याचा अघोर प्रयोग करुन थकलेल्या (व त्यासाठी पुन्हा, योग्य संधिची वाट पहात ‘दबा’ धरुन बसलेल्या) व अजूनही शेतकऱ्यांना सन्मानजनक ‘किमान हमी भाव’ (Minimum Support Price…MSP) नाकारणाऱ्या….
** गोरगरीब मराठी स्त्रियांवर ‘गुलाबी रिक्षा’वाली व ‘दिड हजार’वाली ‘गुलामी’ लादून, त्यांना जगण्याचा सन्मान नाकारणाऱ्या. ..’बदलापूर-घटने’सारख्या असंख्य घटनांतून महिला-बालिकांची सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या….
** निरंकुश भ्रष्टाचारातून मालवणातील शिवछत्रपतींचा तकलादू पुतळा उभारणाऱ्या….
** ‘नागरिकत्व‘ अथवा ‘प्रजासत्ताकत्व‘ (म्हणूनच तर आपण २६ जानेवारीला ‘प्रजासत्ताक दिन‘, हा १५ ऑगस्ट या ‘स्वातंत्र्यदिना‘हून वेगळा असा दिन साजरा करतो) म्हणजे, “जगण्याचे मूलभूत हक्क-अधिकार प्रत्येक भारतीय-नागरिकाला देण्याची ‘घटनादत्त‘ हमी, असं असताना देखील…अल्पसंख्याक समाजाच्या व्यक्तिंच्या जगण्यात ‘अस्थिरता व असुरक्षितता’ निर्माण करणाऱ्या व त्यांचे माणुसपणाचे हक्क धोक्यात आणणाऱ्या….
** म. गांधींनी ‘दरिद्री’ माणसाला ‘दरिद्री-नारायण’ आणि अस्पृश्यांना ‘हरिजन’ कल्पून… त्यांच्या जगण्यातल्या सन्मानाला आश्वस्त केलं असताना; त्यांना अठराविश्व दारिद्र्यात ढकलू पहाणारी ‘रक्तपिपासू-निर्मम-शोषक’ व्यवस्था (Vampire-State System) देशभरात (विशेषतः, महाराष्ट्रभरात) घट्ट रुजवणार्या….
** सहकारी महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक-छळ प्रकरणात आरोपित ‘रंजन गोगोई’ तर सोडाच; पण, ‘चंद्रचूड’सारख्या…”लोकशाहीची व राज्यघटनेची ‘संरक्षक’ मानल्या जाणाऱ्या” न्याय-व्यवस्थेच्या बुडालाच ‘चूड’ लावणार्या, अनेकोनेक न्यायाधीशांची पैदास करणाऱ्या….
** शिवबा-संतांचा, शाहू-फुले-आंबेडकरांचा ‘महाराष्ट्रधर्म’, ‘मैल्या गंगे’त बुडवणार्या….
भांडवली-डाकू, लुटेरे, दरोडेखोरांच्या आणि ‘रेशीमबागवानी‘ कपटकारस्थानी प्रवृत्तींच्या हाती, आपण आपला महाराष्ट्र सोपवणार आहोत काय?
…याचा, महाराष्ट्रीय सुबुद्ध मतदारांनी गंभीर होऊन आजच विचार करायचाय!
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतावादी समाज-संरचनेत, निखळ ‘लोकशाही’ला सर्वाधिक मौलिक स्थान आहे व असणारच…त्यालाच, आज ग्रहण लागलंय.
“जबाबदार लोकशाही म्हणजे प्रत्येक जबाबदार नागरिकाचं, जबाबदारीने टाकलं गेलेलं मत (कुठल्याही आमिषाला वा दडपणाला बळी न जाता) आणि एका मताला एक मूल्य”… ही धारणा, जाज्वल्य ‘जनवादी’ आहे!
इथे मुद्दाम लक्षात घेतलं गेलं पाहिजे की, देशाला स्वातंत्र्याची आस लागलेली असताना व ‘प्रत्येक नागरिकाला एक मत व एका मताचं एक मूल्य’ अशी मतदानाधारित लोकशाही, देशात अवतरत असतानाच…हाच ‘संघ-परिवार’ मतदारयाद्या बनवण्याच्या प्रक्रियेदरम्यान सरकारला पत्र लिहून “केवळ, २५ वर्षावरील पदवीधर ‘पुरुषा’लाच (म्हणजे, आपसूकच स्त्रियांना नव्हेच) मतदानाचा अधिकार असायला हवा”, अशी भयंकर समाजघातकी-लोकशाहीविरोधी मागणी करीत होता, हे कितीजणांना ज्ञात आहे?
तेव्हा, लोकशाही जिवंत ठेऊन ‘प्रजासत्ताक’वादी धारणा चिरायू ठेवायच्या असतील; तर ‘आज’ आपण नेमकी कोणाची निवड करतोय…ते ‘उद्यानंतरच्या उद्या’साठी, पुन्हा एकवार ‘लोकशाही-स्वातंत्र्या’च्या उद्घोषासाठी, मराठी-नवोन्मेषाच्या ‘उदया’साठीही महत्त्वाचं ठरणार आहे…!!!
“ले ‘मशालें‘ चल पड़े हैं लोग मेरे गाँव के ।
अब अँधेरा जीत लेंगे लोग मेरे गाँव के ।।”
|| जय महाराष्ट्र, जय हिंद ||
(संयुक्त-महाराष्ट्रानंतर आता, ‘स्वायत्त-महाराष्ट्र‘… राष्ट्रांतर्गत राष्ट्र, ‘स्वायत्त-महाराष्ट्र‘… ‘शिवछत्रपती-राष्ट्र‘!)
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)